भटकंती-लेण्याद्री, नाणेघाटाच्या परिसरात
जुलैभर धुव्वाधार पाऊस कोसळून गेला तरी यावेळी कुठेच भटकंती झाली नव्हती. असंच मित्रांशी गप्पा मारता मारता कुठेतरी जाऊन येऊ असे ठरले आणि ठिकाणही लगोलग निश्चित झाले ते म्हणजे जुन्नरच्या परिसरात भटकून यायचे, अर्थात लेण्याद्री आणि नाणेघाटात. रविवार म्हणजे वेळच वेळ होता. ही दोन्ही ठिकाणे अगदी आरामात करता येतील आणि वाटेत ठिकठिकाणी थांबत थांबत इथला बहरलेला निसर्ग भरभरुन पाहात जाऊ असे ठरले आणि त्यानुसार सकाळी निघाली. पुरोहितला नाष्टा करुन जुन्नरला आलो. वाटेत मानमोडी लेण्यांचा गट लक्ष वेधून घेत होता. शिवनेरीला साखळीच्या वाटेला हल्लीच रेलिंग लावल्याचे पायथ्यावरुनच दिसले.
मिसळपाव