Skip to main content

नकोस विसरू

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 05/08/2022 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस विसरू- कोसळणार्‍या प्रपातातल्या जलबिंदूच्या खोल आतवर कल्लोळाच्या अब्जांशाचा निनाद असतो नकोस विसरू- माथ्यावरती ओणवलेल्या निळ्यासावळ्या घुमटावरल्या नक्षत्रांच्या दंतकथांना शेवट नसतो नकोस विसरू- दाट धुक्याच्या पल्याडचे जग धूसरताना अस्तित्वाच्या काचेवरती आभासाचा चरा उमटतो नकोस विसरू- पैलतिराच्या अनाहताशी ऐलतिराच्या कणाकणातील कोलाहलही रुणझुणणारे ध्रुपद साधतो

"राहुल द्रविड- The Unsung Hero Of Indian cricket"

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 04/08/2022 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.

"प्रचंडगड" तोरणा

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 04/08/2022 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
२४ जुलै २०२२ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित एक बळकट, भर-भक्कम, मोठा विस्तार असणारा प्रचंड किल्ला म्हणजे तोरणा. रायरेश्वरला स्वराज्य स्थापनेचा संकल्प केल्यानंतर शिवरायांनी पाय रोवलेला पहिला-वहिला किल्ला, समुद्रसपाटीपासून अदमासे चौदाशे मीटर इतकी धडकी भरवणारी उंची, दक्षिणेला वेळवंडी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे, उशाला काहीचं वर्षांपुर्वी झालेलं गुंजवणी धरण तर एका डोंगरधारेने विलग केलेली पायथ्याची घेरा वेल्हे आणि भट्टी ही गावं.

तृष्णा भयकथा भाग -३

लेखक साहना यांनी गुरुवार, 04/08/2022 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
तृष्णा भयकथा भाग -३ जुन्या शहरांत संदीपला जो अनुभव आला तो त्याने चित्राला कथन केला नाही. नक्की का ? ह्या प्रश्नाचे उत्तर खरे तर त्याला सुद्धा ठाऊक नव्हते. चित्रा तशी घाबरणारी नव्हती. पण त्या मुलीच्या संदर्भांत आपण तिच्या सोबत चहा वगैरे पिणे तिला नक्की कसे वाटले असते हे त्याला ठाऊक नव्हते. त्याशिवाय अपघात झाला हि गोष्ट सुद्धा त्याला लपवणे आवश्यक वाटल. तिचा फोन काय पण नाव सुद्धा मी विचारायला विसरलो ह्याची खंत त्याला होती. पण मेघदूत कॅफे मध्ये ती असते त्यामुळे पुन्हा तिथे जाण्याचा योग येणारच होता. संदीपने मफतलाल ला फोन करून तिच्या दुचाकीची चौकशी केली होती.

श्रीमंत राजगड

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 04/08/2022 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी २०२२ दुर्गराज राजगड हा तसा अगदी हृदयाच्या जवळचा किल्ला, रायगडापेक्षाही प्रिय.....नेहमीचं आपलासा वाटणारा, कोवळ्या वयात चालत सर केलेला व मुक्कामी राहिलेला हा पहिला किल्ला म्हणूनही असेल कदाचित पण राजगड हा नेहमीच सर्वात वेगळा वाटत आलाय.

कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ जांभळी गावाकडून

लेखक Vivek Phatak यांनी बुधवार, 03/08/2022 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ (जांभळी गावाकडून) खरं म्हणजे मी ह्याच दिवशीच्या दुसऱ्या ट्रेकला जाणार होतो. पण आदल्या दिवशीच विशालचा ह्या ट्रेक बद्दलचा मेसेज आला. हा TTMM ट्रेक, म्हणजे ट्रेकचा खर्च सर्व participant मधे विभागून होता. शिवाय बरोबर नेहमीची मित्र मंडळीही होती. त्यामुळे बुक केलेला ट्रेक कॅन्सल करून ह्या ट्रेकला जॉईन झालो. आमचा १४ जणांचा ग्रुप होता. १८ तारखेला सकाळी औरंगाबादहून रवाना झालो आणि बाणेरला पोचलो तेव्हा सध्याकाळचे ६ वाजले होते. बस रात्री ११.३० ला निघणार होती. माझ्याकडे वेळ भरपूर होता.

स्मरणरंजन : पिरसा

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 03/08/2022 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस सुरू झाला की मन आपोआप भूतकाळात जातं. सहावीत आम्ही चोरवणे मराठी शाळेतून नाणीज हायस्कुल ला गेलेलो. सकाळी साडेनऊ वाजता घरातून निघून दहापर्यंत शाळेत पोहोचायचो... पण ओलेचिंब होऊन... रेनकोट, छत्री जे काही असायचं ते जून जुलै मधल्या कोकणातल्या मुसळधार पावसापुढे कधीच धाराशायी ठरायचं... दफ्तरात एका प्लास्टिक पिशवीत सगळी वह्यापुस्तकं सुरक्षित असायची पण कपडे मात्र भिजायचेच... मग तसंच कुडकुडत शाळेत बसावं लागे... पण तसा मी काही एकटाच नव्हतो, सगळीच मुलं कमी अधिक भिजूनच शाळेत आलेली असत...मी रोज अडीच किलोमीटर चालतं शाळेत जायचा पण आमच्या शाळेत काही मुलं रोज आठ ते दहा किमी चालून शाळेत यायची त्यावेळी!

स्मरणरंजन : रेडियो

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 03/08/2022 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल... बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं. या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती... बाबांना नाट्यसंगीत खूप आवडायचं...