Skip to main content

द लास्ट अ‍ॅक्ट

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 17/12/2012 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
१२.१२.१२. ला साहेबांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींनी पेपरची पाने भरलेलली होती त्या टाळुन पुढे जात असताना एका चित्रपटाच्या जाहीरातीने नजर खेचुन घेतली होती. चित्रपटाचे नाव होते "The Last Act". चित्रपटाच्या प्रिमियर साठी निवडलेला दिवस होता १२.१२.१२ त्याचे कारण म्हणजे चित्रपटाच्या डायरेक्टर्स ची संख्या आहे १२ आणि चित्रपटाचे कथानक घडतेही १२ शहरात. द लास्ट अ‍ॅक्ट ही भारतातली पहिली कॉलॅबरेटीव्ह फिचर फिल्म आहे. "द लास्ट अ‍ॅक्ट" मागची कल्पना अगदी साधासोपी आहे.

प्रकाश आंबेडकर पाकिस्तान धार्जिणे आहेत का ?

लेखक बाबा पाटील यांनी रविवार, 16/12/2012 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश आंबेडकरांनी आज अफजल गुरुला फाशी दिल्यास काश्मीर वेगळा होईल अशी फुटीरतावादी,देशद्रोही भुमिका मांडली आहे (म.टा.च्या सौज्यन्याने-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17630720.cms)हे असे करुन अश्या माणसांना नक्की काय साध्य करावयाचे आहे,अशी अतिरेक्यांना साजेशी भुमिका स्विकारुन आणी ती मिडीयापुढे बोलुन हा प्राणी खरच निवडुन येणार आहे का ?अश्या टिप्पणी बद्दल खटला भरता येईल का ?

कथा - इरॉस आणि साइक

लेखक शुचि यांनी रविवार, 16/12/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा वाचनात आली. तिचा हा अनुवाद - खूप पूर्वी पृथ्वीवर एक राजा रहात होता. राजाला ३ मुली होत्या. सर्वात जी धाकटी होती ती अत्यंत मोहक होती. तिचे नाव होते "साइक" (psyc). साइक इतकी सुंदर होती की दूरदूरुन तिला पहाण्यासाठी लोकं येत आणि तिच्या सौंदर्याची स्तुती करत. ते म्हणत की साईक ही प्रत्यक्ष सौंदर्याची देवता "अ‍ॅफ्रोडाइट" (afrodite) पेक्षाही सुंदर आहे. अ‍ॅफ्रोडाइट ची साइकशी काय तुलना? अ‍ॅफ्रोडाइट ची मंदीरे ओस पडू लागली, लोक तिची पूजा करेनासे झाले. त्यामुळे झाले काय अ‍ॅफ्रोडाइट ची झोप उडाली, तिला साइकचा दुस्वास वाटू लागला.

(चावडीवरच्या गप्पा - अभिजात संगीतोत्सव)

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 16/12/2012 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
(सोत्री यांची क्षमा मागून). "उस्तादजींनी म्हणे कहर केला मैफिलीत, आणि त्या झिपर्‍या, स्मार्ट तबलजीशी जोरदार जुगलबंदी झाली त्यांची. पूर्वी मिथुनदांना गरिबांचा अमिताभ म्हणायचे, तसा गरिबांचा झाकिर हुसेनच म्हणायला हवा या तबलजीला.", चिंतोपंत जगप्रसिद्ध 'खिडकी वड्याच्या' स्टॉलजवळची नुकताच नजरेत भरलेला सौंदर्यफुफाटा नीट न्याहाळता येईल अशी जागा पकडत. "आजकाल काही राम राहिला नाही या मोठमोठ्या उस्तादांच्या आणि पंडितजींच्या मैफिलीत. असल्या वादनाला 'अभिजात' का म्हणायचे ते त्या शारदांबेलाच ठाउक. एक ना धड भाराभर चिंध्या.

ग्लोबल पोजिशनिंग (GPS) म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी रविवार, 16/12/2012 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात फेसबुकवर मोबाइलवरून एक स्टेटस पोस्ट केला, त्यावेळी मोबाइलवर लोकेशन शेअर करणारा संकेत ऑन होता त्यामुळे पोस्ट कुठून केली हेही बहुतेक प्रकाशित झाले. नेमका त्यावेळी माझा एक जुना मित्र चेन्नैत आला होता. त्याने ती पोस्ट आणि लोकेशन वाचून, लगेच फोन करून तोही चेन्नैतच आहे असे सांगून भेटायचे ठरवले आणि बर्‍याच वर्षांनी आमची भेट झाली. त्याच्या हॉटेलवर जाण्यासाठी मोबाइलवर ए-जीपीएस (A-GPS) प्रणाली वापरून रस्ता शोधला. मागच्या महिन्यात गोव्यात फिरतानाही ए-जीपीएसचा (A-GPS) भरपूर वापर केला होता.

स्टफ्ड (लांब) मिरच्या

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 16/12/2012 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
mirchya साहित्यः १. लांब मिरच्या - ३ ते ४ २. बारिक चीरलेला कांदा - १ ३. मशरुम - २ ते ४ बारिक चीरुन ४. बारिक चीरलेला पाल़क - १/२ जुडी ५. बारिक चीरलेला लसुण - ४ ते ५ पाकळ्या ६. बारिक चीरलेली हिरवी मीरची - ३ ते ४ (तीखट असतील त्या प्रमाणात) ७. किसलेलं पनीर - ४ ते ५ क्युब्स ८. १/२ लींबाचा रस ९. चवीनुसार मीठ १०. तेल - १ पळि कृती: १. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन बारीक चीरलेला लसुण / कांदा / हिरवी मीरची घालावी २.

व्यायाम आणि प्रथिनांची आवश्यकता

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 16/12/2012 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे. त्याला पर्याय नाही. पण त्याच्या सोबतीला योग्य आहार गरजेचा आहे. भारतीय आहारामधे प्रथिनांची खुप कमतरता असते. शाकाहरी असेल तर विचारुच नका. उदाहरण द्यायचं झाल्यास एका अंड्यामधे फक्त ३-४ ग्राम प्रोटीन्स असतात. आणि आपल्या शरीराच्या किलोग्राम वजनाइतके ग्राम प्रथिन आहारात हवीच रोज. म्हणजे तुमचं वजन ८० किलो असेल तर रोज ८० ग्राम प्रथिनं खाणं गरजेचं आहे. प्रथिनांमुळे शरीरातील पेशींची निर्मीती होते. प्रथिनंच शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. दुसरं म्हणजे तुमच्या शरीरातील चरबीचं प्रमाण. पुरुषांसाठी १८-२२% च्या वर असेल लठ्ठ समजले जातात.

बॉम्बे टाईम्स बद्दल आपले काय मत आहे?

लेखक हिरवळ यांनी रविवार, 16/12/2012 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मीपाकर.. मी मीपाची निस्सीम चाहती..जवळ जवळ गेली ४ वर्षे मी जमेल तेव्हा मीपाच्या कट्यावर हजेरी लावत होते, पण कधी अधिक्रुत सदस्य व्हायचा योग येतच नव्हता... आता तो जुळुन आलाय.. बिल्डीन्गीन्च्या जगता मध्ये आणि आपल्या धकधकीचा आयुष्यामध्ये खर्‍या अर्थाने दिसणारा वा अनुभावायला मिळणारा हिरवा रंग आपल्या मनाला ताजेतवाने करुन जातो.. या हिरवाईची मनोमन आवड असणारी मी, म्हणुन माझे नाव "हिरवळ".. खालील सदराद्वारे मी मीपावर लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न करत आहे, त्यामुळे काही चुकभुल झाली असल्यास माफी असावी.. आपल्या सर्वान्च्या घरी Times of india येत असेलच....