'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..
सर्व मिपाकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मिपावरील 'उपटसुंभ) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे.
मिसळपाव
“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्या आवाजात.
“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय?