Skip to main content

काचेचा लोलक

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 05/03/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
काचेचा लोलक कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा .... दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा,राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा ..... कंटाळ्याचा ..देखील आता कंटाळा येतो ........... अरे...वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला ????? अरे....त्याला सुध्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक .... मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हंटले काहीतरी स्वतासाठी केले पाहिजे यार !! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले ...लगेच जाणवले कि कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये ....

श्रीराम

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 05/03/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव साठी रामाचे भजन केले आहे पहा तुम्हाला आवडते का श्रीराम विसावले मन माझे श्रीराम चरणी भास मात्र होतो खास माउलींचा मनी राम नाम घेता वाचे काया शुद्ध होई अमृताची गोडी अनुभवास येई वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेउनी १ नामाचा महिमा आहे अनंत अपार सारी सारी दुखे विघ्ने पळती फार दूर मोक्षं प्राप्ती होते तेव्हा नाम संजीवनी २. दिनांचा दयाळू मनाचा मवाळू तसा माझा सदगुरु नेई पैलपारू सदगुरुसी स्मरता नित्य राम दूर नाही ३. जय श्रीराम
काव्यरस

आठवणीतले ग्रीस - भाग ६

लेखक nishant यांनी मंगळवार, 05/03/2013 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ दिवस ५ आजचा पहिला ट्प्पा, कामारी समुद्रकिनारा पाहणे आणि तेथे पोचवणारी बस हॉटेल समोरील थांबावर येताच आम्ही त्यात सावर होऊन निघालो..

-पारिजातक -

लेखक फिझा यांनी मंगळवार, 05/03/2013 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
-पारिजातक - तुझ्या अंगणातली ती फुले, ओंजळ भरून घ्यायचे मी ... तू मात्र ती मोजून बघायचास , आणि त्या खोडावर लिहून ठेवायचास..... मग रागाने फेकून फुले ती, तुझ्याच अंगावर .. मी निघून जायचे .. तशीच ..!! दिवस बदलत गेले, अल्लडपणा संपत गेला ... मग चुकून समोर आलोच; तर अडखळत बोलायचो ... नाहीतर….एरवी नजरही टाळायचो आपण... ..पारिजातक मात्र बहरत राहिला ...तसाच ..!! मग बाबांची बदली झाली तेव्हा, "काहीतरी राहतंय " म्हणून; सामान भरत बसले होते मी ... "त्या " दिवसभर .. आणि तुझ्या घरातला एक दिवा सतत चालू बंद होत होता ...

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग २) - Basics आणि Format Cells

लेखक मोदक यांनी मंगळवार, 05/03/2013 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १) पहिल्या भागावर मिळालेल्या सर्वांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादांबद्दल आभार्स. एक सूचना - आपापल्या संगणकावरती एखाद्या सहज सापडणार्‍या ठिकाणी / Desktop वरती एक एक्सेल फाईल तयार करून त्यामध्ये डमी डेटा तयार करून यापुढील सर्व प्रयोग त्यामध्ये साठवून ठेवले तर सर्व संदर्भ लगेचच मिळतील. आज शिकूया एक्सेलच्या काही मूलभूत बाबी. कोणतीही एक्सेल शीट समोर आल्यानंतर पुढील कांही गोष्टी सर्वप्रथम तपासून पाहिल्या गेल्या तर आपल्याला एक्सेलशीट समजण्यास खूप सोपे जाते.

२६/११ - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 04/03/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम गोपाल वर्माचा २६/११ सिनेमा पाहिला .. - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य आहे हे ! अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत. d उत्सुकतेने पहायला गेलो . उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत. १) तांत्रिकता : उत्तम . साउंड - लाईट - केमेरा - तंत्र - एडिटिग वगैरे फार छान. या तंत्रामुळ हत्याकांडाचे प्रसंग ..

बीट भाजी

लेखक प्रतिज्ञा यांनी सोमवार, 04/03/2013 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १ मोठा बीट, ३ तिखट हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून, कढीपत्ता १५ पान, कोथिंबीर १/२ वाटी स्वच्छ धुवून व चिरून , लसून ठेचून, जिरे, मोहरी, तेल, मीठ. कृती :- प्रथम बीटाची शेपूट व डोक कापून बीटाची वरची पातळ साल काढून घ्यायची. नंतर बीट स्वच्छ धुवून कोरडा करून किसणीवर किसून घ्या. कढईत तेलावर मोहरी व जीरा खमंग फोडणी करा नंतर त्यात टेच्लेला लसून, मिरची व कढीपत्ता खमंग परतवा. नंतर त्यात किसलेला बीट घालून परता. चवीपुरता मीठ घालून मंद आचेवर भाजी शिजवा. १५ मिनटात भाजी व्यवस्थित शिजते. शेवटी कोथांबीर घालून १ मिनिट परतावा. चविष्ट बीट भाजी तयार. टीप :- फोडणी खमंग व जरा जास्तच परतावी.

न्याय

लेखक धन्या यांनी सोमवार, 04/03/2013 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. मी घाईघाईने समोरच्या टेबलावरील फाईली आवरत होते. आम्हा वकिलांसाठी कुणी सॉफ्टवेअर बनवेल तो सुदिन म्हणायचा. सारी दुनिया डीजीटल झाली, आम्ही मात्र अजूनही फाईलींमध्ये अडकलो आहोत. संगणकाचा वापर फक्त टायपिंग आणि प्रिंट मारण्यासाठीच. दारावर ठकठक झाली. आता ऑफीस बंद करायच्या वेळी कोण आलं म्हणून माझ्या कपाळावर आठया उमटल्या. काहीशा नाखूशीनेच मी "येस कम ईन" म्हटलं. आणि समोरच्या व्यक्तीला पाहून मला धक्काच बसला. ती समिक्षा होती. आम्ही शाळेच्या दिवसांमध्ये ज्या काकांकडे भाडेकरु म्हणून राहायचो त्या काकांच्या मोठया भावाची मुलगी. तेव्हा अधून मधून काकांकडे यायची ती.

संवाद

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 04/03/2013 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद स्वरांशी माझा स्पंदन अविरत रागांचे हृदयी माया कंठी मार्दव ओठात जलद शब्दांचे .........सावल्या किती विझलेल्या .........झिजलेले कोळ कळांचे ..........नाळेत ओवलेली गांवे ..........अवशेष अमिट नात्यांचे वाहते प्रवाही गाथा पेरीत स्मरण मिथकांचे वादळे पूररेषांची अंतहीन क्षेत्र नभाचे ...........शत जन्म अधूरे नाथा ...........तोकडे वेध वेदांचे ...........स्तंभीत मती नत माथा ...........रण ओघळते ऋणकांचे .......................अज्ञात
काव्यरस

शनिवारवाडा (भाग २) : अवशेष वर्णन (तटबंदी, दरवाजे आणि नगारखाना)

लेखक सव्यसाची यांनी सोमवार, 04/03/2013 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारवाडा (भाग १) : इतिहास शनिवारवाडा: अवशेष वर्णन सध्या दिसणाऱ्या अवशेषांमध्ये पुढील ३ गोष्टींचा समावेश होतो. १. तटबंदी आणि बुरुज २. दरवाजे ३. नगारखाना आता या तिन्ही गोष्टींची थोडक्यात माहिती घेऊयात. १. तटबंदी आणि बुरुज शनिवारवाडा हा पुण्याच्या साधारणपणे मध्यावर वसला आहे. वाड्याची तटासह दक्षिणोत्तर लांबी १८४.२५ यार्ड आहे तर पूर्वपश्चिम लांबी १६४.२५ यार्ड आहे. या वाड्याने जवळपास ६.२५ एकर जमीन व्यापली आहे.