मोबाईलमधील वाय फाय कसे वापरावे?
मित्रांनो,
मला (आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना) मोबाईल मधील वाय-फाय नेमके कसे वापरावे याची माहिती हवी आहे. अलिकडेच मिपावर मोबाईल वरील दोनेक धाग्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. मिपावरील तज्ज्ञ मित्र मला नक्की मदत करतील याची खात्री वाटल्याने हा धागा सुरु करतो आहे.
तर माझी विनंती आहे की मोबाईलमधील वाय-फाय कसे वापरावे? (जे फुकट असते असा माझा समज आहे)
त्यासाठी काय करावे लागते? हा वापर किती सुरक्षित आहे? सुरक्षा जपण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? या व त्याअनुषंगाने अधिक माहिती कोणी देऊ शकेल तर खूप आभारी राहीन.
उदाहरणार्थ माझ्याकडे एन्ड्रॉईड ४ वर आधारित सोनी चा एक्सपेरिआ आहे.
मिसळपाव