Skip to main content

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2013 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २ अ‍ॅबिसिनिया.......

छमछम पुन्हा सुरु..

लेखक सचिन कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टाचा डान्स बार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय योग्य ठरविला आहे. जर राज्य सरकारची पुनर्विचार याचिका पण फेटाळली गेली(अजून केलेली नाही)तर ही छमछम officially पुन्हा सुरु होईल. नवी मुंबईत बरेच परिवार घरातील कर्त्या पुरुषाच्या या सवयींमुळे अक्षरश: रस्त्यावर आले होते आणि अश्या बर्याच केसेस दिसून आल्या होत्या म्हणून आबांनी डान्स बारवर बंदी घातली होती. आणि कधी नव्हे ते त्याला सर्वपक्षीय पाठींबा देखील मिळाला होता. मात्र हि बंदी आल्यावर बर्याच सामाजिक (?) संघटनानी आरडाओऱड केली होती.

सासर-पण-माहेर

लेखक Bhagwanta Wayal यांनी मंगळवार, 16/07/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
आहे ग आई मी सुखी समाधानी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं प्रेमळ पती मला जपे फुलावाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर आठवेल कसे आता मला ग माहेर जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी बाहेरची कामे मला नाही ग सांगत स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात जीव लावतात मला सर्व मुलीवाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नाही म्ह्टले तरी रोज आठवण येते तेंव्हा मात्र मन माझे कासाविस होते आठवत बसते तेंव्हा जुन्या आठवणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

मिपास्तोत्र

लेखक जेपी यांनी मंगळवार, 16/07/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
नम्स्कार , बरेच दिवस आम्चा मनात होते कि सर्वना उपयुक्त असेल असे 'मिपा स्तोत्र' येथे द्यावे . याचा स्तोत्राच फायदा मला झाला. तुम्हि हे स्तोत्र रोज वाचुन स्वतः अनुभव घ्याव.

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - २ अंतिम)

लेखक सुधीर यांनी मंगळवार, 16/07/2013 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १
व्यक्तिगत आयुष्यात प्रगती कडे नेण्यार्‍या सवयी कुठल्या हे आपण पहिल्या भागात पाहिले. या भागात आपण सामाजिक यश काय ते पाहू. व्यक्तिगत यश हे सर्वप्रथम येते त्यानंतरच मग सामाजिक यश! सामाजिक यशाशी निगडित असलेल्या पुढल्या सवयी ह्यात पुस्तकाचा खरा आत्मा आहे. या पुस्तकानंतर काही शब्द जनमानसात प्रचलित झाले. जसे विन-विन, पी-पिसी वर्क, पॅराडाईम शिफ्ट वगैरे. पुढल्या तीन सवयींची ओळख करून देण्याअगोदर काही संकल्पना समजवून घेऊ आणि मग उरलेल्या सवयी पाहू.

एक सूफी गीत ...

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 15/07/2013 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
(स्वैर भावानुवाद) हे साकी, वारूणीचा तो अमूल्य चषक माझ्याकडे सुपूर्त कर, जेणेकरून त्या आंतरिक आनंदाची मजा मला पुन्हा एकदा लुटता येईल, आणि बाकी सारी भिस्त पवित्र परमात्म्याच्या प्रेमावर ठेवता येईल, अशी प्रार्थना करत त्या अनोख्या मधुशालेच्या दरवाजात मी शांतपणे प्रतिक्षा करत होतो. माझ्या प्रिय पुत्रा, सर्वप्रथम तुला अहंतेने ग्रासलेल्या मनाप्रती मृत्यु स्वीकारावा लागेल, मग मी आशीर्वचन दिलेल्या तुझ्या वाग्दत्त वधूची साद तुला ऐकू येईल, त्या उंबरठ्यापलीकडे एक पाउल टाक, तिथेच तुझी प्रिया तुला सापडेल, मधुशालेतून शेखसाहेबांची साद ऐकू आली. चिखलात डुंबणार्‍या म्हशीसारखा ऐहिक सुखांच्या आधीन होउन लोळत प
काव्यरस

सर्वे आणि व्यवस्था

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 15/07/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापुर्वी एका सर्व्हेमधे सर्वेयर म्हणुन भाग घेतला. माझ्या जवळची व्यक्ती सर्व्हे ऑफिसर म्हणून काम करत होती. त्याबाबतची माझी काही विस्कळीत निरिक्षणे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे चालवल्या जाणार्‍या वसतिगृहांचा सर्व्हे. वसतिगृहातल्या सोयी सुविधा कशा आहेत? त्या पुरेशा आहेत का? हे जाणून घेण्यासाठी साधारण पाच-सहा पानी प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेतले जास्तीत जास्त प्रश्न हे बहुपर्यायी तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडावे ही अपेक्षा. याप्रकारचा एक सर्व्हे काही वर्षांपूर्वी झाला होता.

कौन बनेगा पी एम...

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 15/07/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानात क्रिकेट आणि राजकारण या विषयावर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करू नये म्हणतात. कोण कुणाचा सहानुभुतीदार असेल आणि कसा दुखावला जाइल ते सांगता येत नाही. उद्याचा पंतप्रधान कोण ? या प्रश्नावर एरवी कुणी विचारलं तर आम्ही गप्प राहणेच पसंत करतो. पण चर्चा केल्याशिवाय आणि विचारंथनाशिवाय अमृत हाताला कसे लागणार ? म्हणून हा काथ्याकूट... राहुल गांधी- ही व्यक्ती अशा घराण्यात जन्मली आहे की जिथे त्यांना काही कर्तुत्त्व गाजविण्यापूर्वी जन्मतःच एक ओळख मिळालेली आहे. कुणाचा नातू, कुणाचा सुपुत्र इ. अनेक वर्षे खासदार आहेत. पक्षाचे स्टार कँपेनर आहेत.

फिश फ्राय

लेखक त्रिवेणी यांनी सोमवार, 15/07/2013 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंड्ळी, माझ धनी ३ वर्षानंतर परत आता वशट खाऊ लागल्यात.(ही लाईन अपर्ना ताईंच्या मागच्या एका लेखातील लिखाणाची कापी) ही मागील कोकण सफरीची क्रुपा. तर म्ह्ट्ल चला आज फिश फ्राय करुया. साहित्य:- पापलेट - २ तंदुर मसाला- २ चमचे लाल तिखट- २ चमचे कांदा लसुन मसाला- २ चमचे ह्ळद- १ चमचा लिंबु- १ लसुण- ८ ते १० पाकळ्या मिठ- गरजेनुसार तेल- प्रत्येकाच्या डायट्नुसार रवा- २ चमचे बटर(चहा सोबत खातो ते)- ३Album 1 (मी स्वःतसाठी दिड पाव सुरमई सुध्दा घेतली होती.

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - १)

लेखक सुधीर यांनी सोमवार, 15/07/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाच्या दुकानात सेल्फ-हेल्प नावाचं एक दालन असतं, त्याच्या वाट्याला जाण्याचं फारसं काही कारण नव्हतं. केवळ कुतूहल म्हणून मी नुकतीच प्रकाशित झालेली काही पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला. पण का कुणास ठाऊक ज्ञानामृत का बोधामृताबरोबर झोपेचा डोसही फ्री मिळतो की काय असा प्रश्न पडायचा. म्हणजे नुकतीच पूर्ण झोप झाली आहे, चहा पाण्याचा कार्यक्रमही आटपलाय आणि यातल्या काही पुस्तकांपैकी एखादं हाती घेतली की हमखास अर्ध्या तासात डुलकी लागते. बरं त्यातून फारसं काही हाती गवसतं असही नाही आणि गवसलं तरी प्रत्यक्षात अमलात आणलं जातं का, हाही एक प्रश्न असतो.