नि:शब्द भावना
आपण आपल्या भावना, विचार दु:ख, आनंद, आदर, राग, प्रेम हे शब्दातून व्यक्त करत असतो. प्रसंगी आपण लिहितो, बोलतो, हावभाव करतो आणि आपले विचार व्यक्त करतो, समोरच्यापर्यंत पोहोचवतो. पण काही भावना अश्या असतात की ज्या शब्दात व्यक्त होत नाहीत.
याकरिता परमेश्वराने एक प्रभावी माध्यम दिले आहे आणि ते म्हणजे डोळे. डोळे; हे न बोलून बरेच काही सांगून जातात, याच डोळ्यात निर्माण होणारा ओलावा तर जाणिवेचे सगळ्यात प्रभावी माध्यम.
माणूस जन्माला येतानाच मुळी सोबत रडण्याची सनई घेउन येतो आणि आपण या जगात आल्याची जाणीव सर्वांना करून देतो.
मिसळपाव
मरिन लाईन्स पुलापलिकडे समुद्रालगत थेट समुद्राकडे पाहणाऱ्या मरिन लाईन्स ते चर्चगेट मध्ये असलेल्या बहुतेक रहिवासी इमारतींमधे इन्टरकॉन्टिनेन्टल सहज सामावले होते. पुढची रांग साधारण ४०-६० वर्ष जुन्या ५-७ मजली इमारतींची तर मागे उंचच उंच व्यापारी इमारती.