Skip to main content

अभिप्राय पाहिजे

लेखक देवांग यांनी गुरुवार, 05/09/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मित्राकडून समजले कि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने तेथील रहिवास्यांसाठी हेल्प लाईन चालू केली आहे. तेथील ऑपरेटर तुम्ही ८ ८ ८ ८ ० ० ६ ६ ६ ६ वर फोन केला असता महानगर पालिकेच्या कामासंदर्भात माहिती हवी असेल तर देतो. तुमची काही तक्रार असेल तर ती नोंदवून घेतली जाते. तसेच त्या तक्रारीचा क्रमांक तुमच्या सेल फोन वर येतो. तसेच त्या तक्रारीचे त्वरित निवारण केले जाते. उदा. तुमच्या घरासमोर कचरा पडला आहे तर तुम्ही काय कराल? नगरसेवकाला फोन कराल मग त्याने काही केले तर ठीक नाही तर परत त्याला फोन कराल. त्या पेक्षा हेल्प लाईनला फोन करा ते त्वरित कारवाई करून घरासमोरून कचरा उचलून नेतील.

मोरया मोरया (चेन्नई एक्सप्रेस इश्टाईल)

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 05/09/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्लमी गाण्यांवर देवादिकांची भजनं (?) ऐकायला येणं तुम्हा आम्हाला नवीन नाही. कुठल्याही 'फेमस' देवळाच्या परिसरात अशा कलाकृती ऐकायला मिळतात. तर या संगीतप्रकारात माझ्याकडून एक भर पडण्याचा योग असावा; म्हणून मला हे जे गणपतीचं भजन (हा शब्द योग्य न वाटल्यास जो शब्द योग्य वाटेल तो इथे वाचावा) स्फुरलं, ते आपणापुढे मांडत आहे. चूक भूल माफ असावी. चेन्नई एक्सप्रेस च्या लुंगी डान्स या रचनेच्या चालीवर आधारित. कपाळावर; लावुनि गंध बाप्पाचा; घेऊनि छंद सेवा करू प्रेमभावाने म्हणू सारे एकमुखाने तूच अमुची शान... (रे बाप्पा) तूच अमुचा प्राण...(रे बाप्पा) तूच अमुची शान... (हे) तूच अमुचा प्राण...

RELIEF ?

लेखक देशपांडे विनायक यांनी गुरुवार, 05/09/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
राजा गेला . म्हणजे आमच्या वर्गातले गेल्या वर्षात सहाजण गेले . त्या आधीच्या वर्षी चार जण . आम्ही आता सुप्यातून जात्यात जायचेच बाकी राहिले ! आपल्यापाठी कुणाला त्रास होऊ नये म्हणून काय काय करावयाचे याची चर्चा मित्रामध्ये सतत होऊ लागल्या . आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे बायको मनावर घेत नव्हती मी तिच्याआधी जाऊ शकतो असल्या शक्यातावर विचारच करत नव्हती तिचे कसे होणार हा विचार जात नव्हता आणि एक दिवस SMS आला '' वर्षापुर्वी नवरा गेलेल्या मंजिरीने लग्न केले'' ! तिच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या . मंजीरीचे उदाहरण बायकोला मार्गदर्शक ठरू शकते या विचाराने RELIEF मिळाला .

शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

लेखक psajid यांनी गुरुवार, 05/09/2013 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सर्व सहकारी शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आज "शिक्षक दिन" ! हा दिवस भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्यानंतर झालेले द्वितीय राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साजरा केला जातो. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांच्यावर स्वातंत्रवीर सावरकर व विवेकानंद यांच्यासारख्या तत्ववेत्यांचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांनी तर्कशात्र या विषयात पदवीत्युर पदवी प्राप्त केली आणि मद्रास निवासी कॉलेज मध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले.

नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद

लेखक खटासि खट यांनी गुरुवार, 05/09/2013 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
( जी नावं या लेखात आली आहेत ती अत्यंत आदरणिय आहेत. या सर्वांबद्दल अतीव आदर आहे. एक विनोदी कल्पना म्हणून या सर्वांची माफी मागून हे धाडस करू पाहत आहे ). मराठी साहीत्य नेटवर लिहीता यायला लागल्यापासून फटाफट साहीत्य आणि खटाखट प्रतिक्रिया यांचा जालावर इतका सुकाळ जाहला कि मुद्रीत साहीत्य वाचण्यास अनुक्रमे फटाफट आणि खटाखट यांच्यापाशी समय शिल्लक न राहीला. फटाफट खटाखट इतके छान चालले कि लेखक कम प्रकाशक आणि प्रतिसादक कम टीकाकार कम साहीत्यिक हे कुठल्याही दडपणाविना मोकळे होऊ लागले.

Spanish Cherry !! नाही गं, बकुळ.

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी गुरुवार, 05/09/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाचीचा फोन ,मामा किती वेळ झाला तुझा फोनच लागत नाही. एवढे अर्जंट काम काय असावे हा तर्क करत असतानाच भाचीचे शब्द कानी पडले.मामा बकूळी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आणि खारीक च्या झाडाला काय म्हणतात ? दोन्ही प्रश्न ऐकून मी थोडासा हडबडलो ? तुला आत्त्ताच कशाला हवी हि माहिती ,बघून सांगतो असे म्हणताच नाहीरे सई चा प्रोजेक्ट आहे त्यासाठी हवी आहे. आता मलाही राहवेना ५/६ वर्षाच्या मुलीचा प्रोजेक्ट तो काय असणार आणि त्यासाठी आईची धावाधाव. मला सुद्धा पटकन आठवेना.

दप्तराचे ओझे कमी करा

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
दप्तराचे ओझे कमी करा कालच एका सामाजिक संस्थेने दप्तराचे ओझे या वर एक सर्वेक्षण करून त्याचे आलेले निष्कर्ष प्रसिध्द केला आणि सर्वांना विचार करायला भाग पाडले. मी ही एक साधा माध्यमिक शिक्षक गेली २२ वर्षे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे शिरगाव ( ता. देवगड ) च्या शिरगाव हायस्कूल शिरगाव मध्ये करत आहे. विद्यार्थ्यानी शिकायचे व शिक्षकानी शिकवायचे ही दोन्ही बाजूने चालणारी अखंड क्रिया. आज काल विद्यार्थ्याच्या पाटीवर असणार्या दप्तराचे ओझे इतके जास्त आहे की त्याच्या आरोग्यावर आणि पर्यायाने अध्ययनावर परिणाम होत आहे. या वर काही उपाय मी येथे देऊ इच्छितो.

भारतीय गणित काल, आज व उद्या

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय गणित काल, आज व उद्या विधात्याने पृथ्वीवर जो पहीला मानव पाहिला तो काहीसा भयचकित, भयचित्त मनाने दाही दिशांचा विश्वासा अफाट व बहुरंगी पसारा तो पाहू लागला. त्यालाच काहीच उमजेना आणि आकलनही होईना. तेव्हा उंच आवाजात त्याने स्वत:शिच एक प्रश्न केला, “ को हम? “ म्हणजे कॊण आहे मी? त्यावेळी त्याला त्या निळ्य़ाभोर, निरभ्र अवकाशात एक हसतमुख ईश्वराचे दर्शन झाले.

शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न परशुरामाचा प्रदेश म्हणजे बुद्दीवंताचा प्रदेश अशी ओळख कोकणाची आहे. याच कोकणातून विचारवंत खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेवक, स्वातंत्रसेनानी, कलाकार, लेखक अशा अनेक क्षेत्रांत कोकणपुत्रानी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. अशी ओळख असलेल्या कोकणाची मुंबई ला चाकरमाणी पुरवीणारा प्रदेश अशीही ओळख होती. मनिऑर्डवर चालणारी घरे आठवली तर आजची कोकणाची प्रगती पाहता आपसूक तोंडात बोटे जातात. शिक्षणामूळे व्यक्तीची , समाजाची व अनुशंगाने देशाची प्रगती होत असते.त्याच बरोवर दिशा देणारा पालकही असावा लागतो.

आम्हां घरी धन.....(३)

लेखक मोदक यांनी बुधवार, 04/09/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... आम्हां घरी धन ...(२) ---------------- धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते..