Skip to main content

'वाढदिवस'

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 02/11/2013 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याच राघववेळी, उठण्याची घटिका झाली  दिवसाचे विझले डोळे, रात्रीस नीज ना आली वडिलांच्या कानी बोले, आवाज आज आईचा, "पुत्राच्या वाढदिनाचा, सोहळा खास घाईचा" "पाहता पाहता सरली, परि कैशी इतकी वर्षे?"  बाळाचे कौतुक दाटे, डोळ्यांतुन श्रावण बरसे औक्षणास उठते माता, वडिलांचा धरुनी बाहू  "उठवाया सोनूल्याला, दोघेजण मिळुनी जाऊ"   थरथरत्या हातांवरती, सावरती हार फुलाचा भिंतीवर सैनिकवेषी, हसतो चेहरा मुलाचा -- अमेय

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 01/11/2013 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. १) म.प्र.

परिपक्व

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 01/11/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
जाणीव एक कोण्या बीजापरीस असते संवेदना फळाची शाखेस भार नसते गंधास स्वाद जेंव्हा परिपक्व फूल होते शब्दात भावना अन सारीतेसामान झरते त्या ओढ अर्पणाची समिधा समर्पणाची व्हावा तृषार्थ कोणी आकंठ तृप्त ह्याची ………………… अज्ञात
काव्यरस

शरमेची बाब

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी तोंडावर आली असतानाच एक बातमी आली, अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे शेरीफ कार्यालयात काम करणाऱ्या आरती गुप्ते नामक NRI मराठी महिलेने जमीन विक्रीच्या पैशात अफरातफर केल्याने फेडरल कोर्टाने तिला ३ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे . प्रतिष्ठित INFOSYS ला देखील व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकन कोर्टाने ३० ० कोटी डॉलर्स चा दंड ठोठावला आहे . आयटी मध्ये देखील हैद्राबाद मधून मोठ्या प्रमाणावर बोगस अनुभव प्रमाणपत्रे देण्याचे प्रकरण उघडकीस आलेले होते. महाराष्ट्रीय NRI आज अमेरिका आणि इतर देशात उज्ज्वल यश मिळवून भारताचे नाव रोशन करत असताना अशा प्रकारच्या बातम्या ऐकून खेद वाटला .

दिवाळीचे विष्णूपूजन !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते. पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी.

पुणे तिथे काय उणे- (२nd होम) जागा सुचवा.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.

" दि पा व ली च्या हा र्दि क शु भे च्छा "

मला पुणे खूप आवडते. मुंबई च्या मानाने थोडे शांत जीवन कसली घाई नाही, सावकाश, आणि ट्रेनचे वेळा पत्रक सांभाळायला नको.

चलती का नाम कोरोला...

लेखक जुईचे फूल यांनी शुक्रवार, 01/11/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर मधली कुठल्यातरी वीकेंड ची कुठली तरी सकाळ... मी नेहमी प्रमाणे हिंदी सिनेमातल्या बायका कश्या नवऱ्याआधी उठून आटोपून वगैरे बसतात... तश्शी सगळं आटोपून व्हॉट्स ऍप वरचे मेसेजेस वाचत बसले होते. अश्याच एका ग्रूप मध्ये मैत्रिणीने लिहिले होते, "नवरा गाड्या बघायला गेलाय, मुलं पण अजून उठली नाहीत, एकटीच आहे, बोअर होतय." तो मेसेज वाचला मात्र आणि तिथे खरी ठिणगी पडली. मी तो मेसेज जसाच्या तसा स्त्रीसुलभ आणि त्यातही पत्निसुलभ लाडिक जिव्हाळ्याने बाजूलाच आढारलेल्या नवऱ्याला ऐकवला. "आपण इथे येऊन झाली की आता दोन वर्षं! कधी घ्यायची गाडी?" नवऱ्याने एक दिर्घ श्वास घेतला.

दीपावली

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 01/11/2013 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 3053 public://devi.jpg 3052 public://Diwali_2013_Saarthbodh.jpg

दिवाळी अंकः तुमची शिफारस

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 01/11/2013 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘दिवाळी अंक’ हे आपल्या दिवाळीचं आणि मराठी संस्कृतीचं अविभाज्य अंग. १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’ प्रसिद्ध झाला. शंभराहून अधिक वर्षांची परंपरा काळाच्या ओघात नामशेष झाली नाही हे विशेष. २०१२ मध्ये ८०० पेक्षा जास्त दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याची बातमी वाचल्याचं आठवतं. याच्या सोबत आता ‘ई दिवाळी अंक’ पण मोठ्या संख्येने निघत आहेत. बाकी महागाई वाढली तशा दिवाळी अंकांच्या किमतीही वाढल्या आहेत. मर्यादित बजेटमध्ये काही ठराविक दिवाळी अंक घेता येतात. ज्यांना वाचनालयात दिवाळी अंक मिळतात ते कदाचित अधिक दिवाळी अंक वाचत असतील.