Skip to main content

छद्मयुद्ध -१

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 30/12/2013 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
एपीसोड १ :- रुटीन स्थळ :- प्रोफ़ेसर्स रेसिडेंट क्वार्टर्स,खान रिसर्च लेबॉरेटोरी, कहुटा, पाकीस्तान वेळ :- सकाळी ०८०० प्रो. रहीम खुर्रम आज फ़ुल मुड मधे होते, मुखात गुलाम अली साहेबांची " चुपके चुपके रात दिन आंसु बहाना याद है" गझल होती, त्याला कारण ही तसंच होतं त्यांची लाडकी परवीन आज चक्क त्यांच्याकडे पाहुन हसली होती, "खुदा तुझे लाख शुक्रिया" म्हणता म्हणता प्रोफ़ेसर साहेबांचे डोळे पाणावले, पाणावणार होतेच, २३ वर्षांचे होते ते फ़क्त बी. टेक झाले तेव्हा.

उळळागड्डी , एक अप्रतिम एकांकिका.

लेखक विशाल चंदाले यांनी सोमवार, 30/12/2013 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतच पुरोषोत्तम करंडक आणि इतर राज्य स्पर्धेत ह्या वर्षी अव्वल ठरलेली एकांकिका 'उळळागड्डी' पाहण्याचा योग आला. बरेचसे प्रेक्षक विचारत होते "उळळागड्डी म्हणजे काय हो?". कोणी विचारत होतं , " काय हो विनोदी आहे का एकांकिका?". पण आम्हीहि केवळ पुरोषोत्तम करंडक विजेती आणि उत्सुकता यापोटीच आलो होतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं. एकांकिका खरं तर दिलेल्या वेळेपेक्ष्या बऱ्याच उशिराने सुरु झाली त्यामुळे प्रेक्षक खूप वैतागले होते. त्या नाराजी मुळे प्रेक्षकांनी विनाकारण टाळ्या वाजऊन संयोजकांना हैराण करून सोडलं होतं. उठून निघून घरी येण्याचे विचारहि मनामध्ये येत होते (विनामूल्य असल्यामुळे).

टोपण नावे

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 30/12/2013 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का? १. कलंदर : अशोक जैन २. ठणठणपाळ : जयवंत दळवी ३. तंबी दुराई : ?? ४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर

कुंडलिनी

लेखक शरद यांनी सोमवार, 30/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत.

पायाखाली

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 30/12/2013 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या काळात कोमट्यांच्या घरांत ब्राह्मण भाडेकरूच चालायचे, लिंगायतांच्या घरांत जंगम भाडेकरूच चालायचे, त्या काळात बाबूराव खंदारेंचा वाडा प्रचंड कॉस्मोपॉलिटन म्हणायला हवा. एक बाजूला कौलारू शेडमधे लिंगायत बाबूराव आणि त्यांच्या सप्तकन्या यांचे कुटुंब. दुसर्‍या बाजूला काँक्रीटच्या छताखाली चार वेगवेगळी कुटुंबे. एका छोटेखानी खोलीत आमचे ब्राह्मण कुटुंब, आमच्या मागे थोड्या लांब खोलीत वारकाचे बालाजीमामा, त्यांच्याशेजारी यलमाच्या जिंदगानीचे दोन खोल्यांचे कुटुंब. भाडे वाढले तसे त्यांनी एकच खोली ठेवली आणि त्यांच्यापुढे थोडे भिडस्त मराठे कुटुंब राहायला आले.

दूध

लेखक कुमारकौस्तुभ यांनी सोमवार, 30/12/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की, राज्यातील बरीच मुले अन स्त्रिया कुपोषणाच्या जंजाळात अडकल्या असताना स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेण्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांचे कृत्य लज्जास्पद अन घृणास्पद असुन यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला एक प्रकारे ठेच पोहोचली आहे.

मिर्झा ग़ालिब...........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 30/12/2013 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मिर्झा ग़ालिब...........भाग-१ जेव्हा ग़ालिब दिल्लीत आला तेव्हा तो तसा तरुणच होता. म्हणजे त्याचे वय त्यावेळेस १९ असले तरीही कवी म्हणून त्याला थोडी फार प्रसिद्धी मिळाली होती. ती प्रसिद्धी पुढे वाढतच जाणार होती. पण त्याच्या लोकप्रियतेचे एकमेव कारण त्याचे काव्य नसून त्याचा स्वभाव हेही एक प्रमुख कारण होते.

बलिदान त्याविना हे ... (गझल)

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 30/12/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
असते मनात काही उमजून येत नाही वाटे किती फुलावे उगवून येत नाही घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी बलिदान त्याविना हे उजळून येत नाही तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला शब्दास अर्थ आता लगडून येत नाही -- अमेय

बाप माणुस

लेखक jaypal यांनी सोमवार, 30/12/2013 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाप माझा बाप बाप मानुस होता. फाटकी चड्डी मळकट बनियान मनाने मात्र तो साफ माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. टकलावर तुरा अन डोळ्यावर जाड काचा. आरे मोठठ व्हायच तर भरपुर वाचा. अस नेहमी ओरडणारा तो ताप माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. वयात आली जवानी घेऊन नवि उर्मी. स्वभावात रगेल पणा बोलण्यात उद्धट गुर्मी. दोस्तांच्या गप्पात मग एकेरी उल्लेख होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. आज जेंव्हा मी हळवा बाप होतो. लेकाला माझ्या घट्ट जवळ घेतो. फुटतो सारा बांध कारण समोर चेहरा त्याचा होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. तक्रार नाही केली की कधी नाही चिडला. आयुष्य भर झिजला संसाराचा गाडा ओढला. माझा बा