Skip to main content

सामान्य

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 04/01/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तसा कविता हा माझा प्रांत नाही. फार्फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी लिहिलेली ही कविता आज जुने कागद धुंडाळताना समोर आली. म्हटले टाकूया मिपावर.

अर्थक्षेत्र भाग - ४ - गुंतवणुक करण्यापूर्वीची तयारी.

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 04/01/2014 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण काही हजार वर्षांपूर्वी माणूस शेती ह्या विषयाच्या संपर्कात आला. (नक्की किती हजार वर्षापूर्वी ते आमचे इ.ए. साहेब सांगू शकतील.) तिथून तो स्थिरावला. वस्ती करून राहू लागला. तेव्हा त्याला शेतीचे नियम, थिअरीज काहीहि माहित नव्हते. त्याला फक्त एक जाणवले असावे की इथे तिथे शिकार करत पळत राहण्यापेक्षा हे च्यामारी बरय झाडे आहेतच, फळे येताहेत असेच राहू झाल! जमल्यास अगदी सहज शक्य झाल्यास ज्या बाबतीत आपण पारंगत आहोत ती शिकार हि करू पण आता ती दगदग, धावपळ थोडी कमी करू..... खूप रिस्क होती......

स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास भाग १: नरसिंह रावांची घोडचुक

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 04/01/2014 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपाववर २०१४ च्या लोकसभा निवडणुकविषयक वातावरण निर्माण करायला हातभार म्हणून स्वातंत्रोत्तर भारताच्या राजकीय आणि निवडणुकांच्या इतिहासावरील एकूण १२ भागांवरील या लेखमालेतील हा पहिला लेख सादर करत आहे.ही लेखमाला मी माझ्या फेसबुक भिंतीवर इंग्रजीत लिहिली होती.ही लेखमाला chronological order मध्ये नाही.

इतकेच मला जाताना...

लेखक चिन्मय खंडागळे यांनी शनिवार, 04/01/2014 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
(भटसाहेबांची जोरदार क्षमा मागून...) इतकेच मला जाताना घर सोडून कळले होते सजणाने केली सुटका, नवर्‍याने छळले होते लांबवलेल्या पैशांचा, मधुचंद्र गडे उरकू या, मी दागदागिने घरचे, पिशवीत टाकले होते मी ऐकवली दुनियेला माझी सगळी रडगाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच हसू आले की, दारू देता नवर्‍याला मी औषध जुलाबाचे ग्लासात मिसळले होते प्रेमिक माझा शोधाया मी भलती वणवण केली जे दार खुले दिसले ते, तुझ्या बंगल्याचे होते मी एकटीच त्या रात्री गच्चीवर जागत होते मी पळून गेले तेव्हा सासरचे घोरत होते...

बसल्यानंतर ची मजा,

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 04/01/2014 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्यानंतर ची मजा, दारू पिणाऱ्यानबरोबर बसण्याची मजा काही औरच असते. माझा मामे भावू आणि मेव्हणा अट्टल पिणारे. मी पीत नाही पण त्यांच्याबरोबर बसायला खूप आवडते. एक तर मी एक लंबर खवय्या, त्यात चकना आयटम चा चाहता. बऱ्याच वेळा मित्रांबरोबर बार मध्ये गेल्यावर, मी पीत नाही हे ऐकल्यावर येणाऱ्या प्रतिकियांचा सामना केला आहे. काही लोक "काय गावन्ढळ आहे?" या नजरेने बघतात. काही लोक आजकाल असा माणूस असू शकतो यावर अविश्वास दाखवतात.

मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 03/01/2014 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग- "त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता" संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक (पूर्वप्रकाशित)
वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला.

रेसिडेंट एरिया मधील इंडस्ट्री ...

लेखक mahajana cha ganya यांनी शुक्रवार, 03/01/2014 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सहा महिन्या पूर्वी नवीन फ्ल्याट घेतला . सोसायटी जवळ एक इंडस्ट्री आहे जिचा आवाज दिवस रात्र येत आसतो . त्यात काम करणारे कामगार दिवस रात्र एक मेकांची आई बहिण मोठ्या आवाजात काढत आसतात . आवाजाच्या त्रासाची कंपनी च्या मालक कडे तक्रार करून उपयोग झाला नाही ..कोणाकडे तक्रार करावी कुणाला माहिती आहे का .

दुर्ग भांडार अर्थात किल्ले ब्रम्हगिरीचा दुर्लक्षित परंतु रोमांचक भाग

लेखक Hrushikesh यांनी शुक्रवार, 03/01/2014 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिककर असल्यामुळे तसे बरेचदा त्र्यंबकेश्वर, गंगाद्वार, अंजनेरी, वणी येथे जाणे झाले होते. खरेतर यावेळी आमचे खासे मित्र नयनीश अमेरिकेतुन आल्यावर रतनगडाची मागील वेळी फसलेली मोहीम पार पाडायचे ठरले होते. पण संदीप ने अगदी वेळेवर टांग मारल्यामुळे दोघे जाऊ शकतील व जवळ असेल असे एखादे ठिकाण हवे होते.. रामशेज, अंजनेरी यापेक्शा आम्ही मग ब्रम्हगिरीला पसंती दिली. ज्योतिर्लिंग असलेल्या या क्षेत्राला शिवाजी महाराजांचेही पाय लागले होते. सुरत लूटी वेळी महाराजांचा येथे मुक्काम होता. तसेच त्यावेळी ही लुट काही दिवस सुरक्षित ठेवण्याचे काम याच दुर्ग भांडार - ब्रम्हगिरी जोड्गोळीने चोख पार पाडलेले होते.

अलिबाग परिसरात फिरायला जाणेबाबत माहिती हवी आहे.

लेखक स्मिता श्रीपाद यांनी शुक्रवार, 03/01/2014 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शनिवार रविवार दोन दिवस कुटूंबासहित अलिबाग ला जायचे आहे. सोबत दोन छोट्या मुली ( वय वर्षे ३ व १ ) आहेत. अलिबाग चा बीच फरसा चांगला नाही असे ऐकले आहे. पण अलिबाग च्या शेजारील बाकी बीचेस बद्दल चांगले आणि वाईट असे दोन्ही गोष्टी वाचल्या. नागव, अक्शी, किहिम, आवस या पैकी कोणता बीच जास्त सेफ आहे ? तसेच घरगुती पण सर्व बसिक अ‍ॅमेनिटीज असलेले काही हॉटेल्स, रेसॉर्ट्स ई...सुचवु शकाल का? छोट्या मुलींच्या द्रुष्टीने सोयीचे असे काही राहाण्याचे व उत्तम जेवण्याचे ठीकाण असेल तर कृपया सुचवावे. धन्यवाद.