Skip to main content

नविनच

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 07/01/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे हे जरा नविनच होते चिंब होऊनही मी धुंद न होणे हे जरा नविनच होते . हा कुठला नवा खेळ? . दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो 'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो ढग फुटून 'तो' असा काही बरसतो त्या गंधाने मी आकंठ मोहरतो . नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो सचैल भिजून भान हरपतो कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते मनात वसंत रुंजी घालाया लागतो मग आजच असे का व्हावे? . हा वर्षाव कोरडा का वाटावा कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा . . हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती तो तुझ्या घराला टाळून आला होता हे जरा नविनच होते....
काव्यरस

साहित्यिक ख़ज़ीना

लेखक शुचि यांनी मंगळवार, 07/01/2014 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला. http://www.belvalkarhousing.com/ या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे. लहानपणी चिवड़ा लाडूचे बोकाणे भरत भरत वाचलेले साहित्य परत वाचावयास मिळते आहे. पुनर्वाचनाचा अत्यंत उच्च आनंद अनुभविण्यास मिळत आहे.

स्थिर अफगाणिस्तान भारताच्या हिताचा

लेखक आतिवास यांनी सोमवार, 06/01/2014 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या प्रसारमाध्यमांत एक विषय चर्चेला असतो – तो म्हणजे ‘अफगाणिस्तानमध्ये काय होणार पुढच्या वर्षी?” यात अनेक उपविषय आहेत. अमेरिकन सैन्य माघारी जाणार का? तालिबानशी शांतता बोलणी होणार का? सत्तेवर कोण येणार? अमेरिका माघारी गेल्यावर जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार? भारत काय करणार? भारत अफगाणिस्तानला मदत करत राहणार का? अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा भारताची कुरापत काढणार का? अफगाणिस्तानमध्ये जे काही घडतं आहे किंवा घडणार आहे, त्याला भारताच्या दृष्टीने खरंच काही महत्त्व आहे का? मी अर्थातच अफगाणिस्तान, पाकिस्तान, तालिबान, भारताचं परराष्ट्रीय धोरण या विषयांची अभ्यासक नाही.

भावनिक गुंता (सल्ला हवाय )

लेखक जेपी यांनी सोमवार, 06/01/2014 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
२००६ साली मी पुण्यात होतो . आमच्या भावकीतील एक मुलगा लातुरात राहता असे .घर ची हालत चांगली नव्हती . हा मुलगा लहान सहान कामे करत असे पण संगती मुळे, बिघडण्यास सुरवात झालती . त्याच्या आईने मला विनंती केली कि मी त्यास पुण्यात बोलवून घ्यावे आणि कुठे तरी कामाला लावावे . मी नकार देऊ शकलो नाही . मी त्याला पुण्यात बोलावून घेतले आणि त्याच्या नोकरी साठी प्रयत्न करू लागलो . मला यश आले नाही पण त्याने स्वतः एक वेल्डिंग हेल्पर ची नोकरी मिळवली . पगार जेमतेम होता पण त्याला पुरेस होता . कंपनीने पुण्यातील रहिवाशी असल्याचा पुरावा मागितला . माझ्या ताई ने त्याचे नाव स्वतः च्या रेशन कार्ड वर घेतले .

अर्थक्षेत्र भाग - ६ - सर्च, रिसर्च, "इम्प्रोव्हाझेशन"

लेखक ज्ञानव यांनी सोमवार, 06/01/2014 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतवणूक हि व्यक्तीसापेक्ष असते. एखाद्या व्यक्तीची आवक - जावक - शिल्लक ह्यानुसार तो कशी गुंतवणूक करावी हा विचार करत असतो. एखादा गायक जसा एखाद्या घराण्याला, गुरूच्या गायनपद्धतीला आपल्या गाण्यातून प्रतिबिम्बित करतो तसेच गुंतवणूकदार हा त्याची मानसिकता आपल्या गुंतवणुकीतून प्रतिबिंबित करतो. एखादा खूप चिकित्सकपणे बाजाराचा अभ्यास वगैरे करून, एखादा कॅलक्यूलेटेड रिस्क घेऊन, एखादा अजिबात विचार न करता अशी गुंतवणूक करतो पण मग त्याला मिळणारे रिटर्न्स देखील तेच प्रतिबिंबित करतात.

नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर: बेजान दारूवाला

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 06/01/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बेजान दारूवाला यांचे प्रेडीक्षण: १)नरु (नरेन्द्र मोदी) वील बी द विनर २)INR(रुपी) विल बी इन बिटवीन ५९ तो ५५ पर डॉलर मिपाकर ज्योतिषतज्ञ व FINANCIAL ANALYST हो, आपले काय मत आहे? कळावे, लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत

Kundalinee -- Made easy

लेखक शरद यांनी सोमवार, 06/01/2014 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी ही भानगडच एकंदरीत अवघड असल्याने त्या वरील लेख अनाकलनीय असल्यास आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. परंतु शरद सरांच्या क्लासमध्ये यावरील सुलभीकरण करणारे एक चिटोरे (leaflet) सापडले. कुंडलिनीबद्दल प्रत्यक्षाप्रत्यक्ष ज्ञान असणारे महाभाग सोडून इतरांकरिता अशा लीफलेट्सचा उपयोग मोठा असतो.

किशोरी...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 06/01/2014 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास २४ तास झालेत पण अजून त्याचा विसर पडत नाही... कित्येक वर्षांनी झालेली भेट...पुन्हा कधी होईल माहित नही...८२ वर्षांचे वय पण नं स्वरात नं वावरण्यात त्याचा मागमूस... गेटवे ऑफ इंडियाचा परिसर ... आधीचा जमलेला भैरव आणि नंतर सुरु झालेला ललत....पाठीमागे २ तानपुरे आणि त्याच्याही पाठीमागून येणारी मंद सागराची गाज... इतक्या वर्षांची तपश्चर्या प्रत्येक स्वरातून झिरपणारी...त्यातील श्रुतींचे वापर आम्हा पामरांच्या पार डोक्यावरून जाणारे...आपण हे सगळे ऐकतो आहोत अनुभवतो आहोत हि जाणीव लोपलेली ...

एक होती सगुणा

लेखक धन्या यांनी सोमवार, 06/01/2014 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती सगुणा. तिच्या नवर्‍याचे नाव ईश्वर. तिच्या नवर्‍याला आणखी एक बायको होती. तिचे नाव निगुणा. दोघींचंही आपल्या नवर्‍यावर खुप प्रेम होते. पण दोघींच्या प्रेमाची तर्‍हा मात्र पुर्णपणे वेगळी. सगुणेचा सारा भर असण्यावर आणि दिसण्यावर. ती आपले नवर्‍यावरील प्रेम आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून व्यक्त करायची. त्याला चांगलं चुंगलं करुन खाऊ घालायची. त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायची. तो समोर दिसला नाही की बैचैन व्हायची. निगुणेचं सारंच उलट. तिचं प्रेम करणं कुणाला दिसायचं नाही. कारण ती ते शब्दांमधून व्यक्त करायची नाही. नवरा सतत आपल्या समोर असायला हवा असा तिचा मुळीच अट्टाहास नसायचा.

मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 05/01/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १) नारदमुनी उवाच: गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला. तिकडे वनवासी लोकांपैकी धीवर जातीच्या प्रमुखाची ‘काली’ नामक कन्या मासे विकण्यासाठी हस्तिनापुरात जात असे.