Skip to main content

<प्रवीण तोगडिया, बिल्डिंग आणि धमकी>

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 21/04/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". मुस्लिमांचा 'प्रश्न' सोडवायचा आहे ना? मग मुस्लिमांना हिंदू वस्त्यांमध्ये घरं घेऊ देऊ नका. तसं नाही केलं तर सुरुवातीला एखादी मुस्लिम व्यक्ती जास्त किमतीने घर घेईल आणि आजूबाजूच्या परिसरात इतर मुस्लिम कमी किमतीची घरे घेऊन स्थायिक होतील. अशी धमकी प्रवीण तोगडिया यांनी दिल्याचं वृत्त आज 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं. बिहारी भाजपा नेते गिरीराज यांचा मोदीविरोधकांचे स्थान पाकिस्तानात आहे हा "विनोद" ताजा असतानाच तोगडियांच्या नवीन वाचाळतेमुळे भाजपा आणि संघाची पुन्हा एकदा दातखीळ बसली आहे. '४८ तासांत याने घर खाली ने केल्यास घरावर दगड, टायर आणि टोमॅटोचा मारा करा.

ब्रोकोली सॅलॅड

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 21/04/2014 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच.

जर मोदी पंतप्रधान झाले तर....

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 21/04/2014 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे. मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल.

किलर फ्रॉम हैद्राबाद - १

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 21/04/2014 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
आताचं आंध्र प्रदेश राज्यं जिथे आहे, त्याचा बराचसा भाग ब्रिटीश आमदानीच्या काळात ब्रिटीशांचा साथीदार असलेल्या निजामाच्या हैद्राबाद संस्थानाचा भाग होता. तत्कालीन म्हैसूर राज्याच्या उत्तरेला असलेले आणि हैद्राबाद च्या दक्षिणेचे अनंतपूर, कुर्नूल, नंदयाल हे तेलुगू भाषिक जिल्हे मात्र मद्रास प्रांतात मोडत होते. त्याकाळात हा सर्व भाग विकासापासून संपूर्णपणे वंचित होता. वर्षाचे दहा महिने उन्हाळा (आणि उरलेले दोन महिने असह्य भाजून काढणारा उन्हाळा!) आणि जेमतेम पडणारा पाऊस यामुळे इथलं आयुष्यं फारच खडतर होतं.

ऑरेंज कुकिज

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 21/04/2014 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः अडीच वाट्या मैदा ३/४ वाटी साखर २२५ ग्राम बटर किंवा दोन स्टीकस बटर (रुम टेम्परेचरला असलेले) १ अंडे १ टेस्पून संत्र्याचा रस १ टेस्पून किसलेले संत्र्याचे साल १/२ टीस्पून किसलेले आले १/४ टीस्पून मीठ .

आज कुछ तुफानी करते है…

लेखक बोबो यांनी सोमवार, 21/04/2014 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
------------------------------------------------- म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं . परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं.

तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय

लेखक जातवेद यांनी रविवार, 20/04/2014 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय हे तोक्यो मधल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे संग्रहालय सकुरासाठी प्रसिद्ध असणार्‍या युएनो उद्यानाजवळ आहे. इथे एकूण ५ प्रदर्शन इमारती आहेत. १. होंकान (मुख्य ईमारत) - इथे जपानशी संबंधीत वस्तू मांडलेल्या आहेत. २. तोयोकान - इथे इतर भारतासकट सबंध आशियामधिल वस्तू आहेत. ३. ह्योकेकान - ही इमारत मेजी घराण्यातील युवराज तैशो याच्या लग्नासाठी सन १९०९ मधे बांधली होती. सध्या तिथे काही नाही. ४. हेसेकान - इथे पुरातत्वशास्त्राच्या वस्तू आहेत. आणि ५.

व्यवहारज्ञान (२)

लेखक मनीषा यांनी रविवार, 20/04/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मि. ऱ्होडस ची नाराजी बहुदा मि. पथेरिकच्या नजरेस आली नसावी, अथवा त्याने जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष केले असावे. ते पुढे सांगत होते, "असं बघा मिस. मार्पल.. बर्नचेस्टरच्या डिस्ट्रिक्ट ज्यूरीने हा खून कोणी एक किंवा अनेक अनोळखी व्यक्तींनी केल्याचे सांगून त्यांनुसार चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी पोलीसांच्या दृष्टीने प्रमुख संशयित हा मि. ऱ्होडसच आहे. त्यामुळे त्याला काळजी वाटते आहे की कोणत्याही क्षणी त्याला अटक होईल. त्याच्यासाठी एक - सर माल्कम ओल्ड यांना केस देण्यात आली आहे. ते अशा प्रकारच्या केसेस चे तज्ञ समजले जातात.

संतूर आणि पं. शिवकुमार शर्मा - एक अनोखी स्वरयात्रा

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 20/04/2014 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
संतूर - जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर परंपरा होती, पण काश्मिर नरेशांच्या पदरी असलेल्या राजपुरोहितांच्या घराण्यात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेल्या पं. उमादत्त शर्मांच्या मनात मात्र या वाद्याच्या भविष्याबद्दल काही वेगळेच मनसुबे आकार घेत होते. वास्तविक पाहता त्या काळात तरी राजपुरोहितांच्या घराण्यात गाणे बजावणे या प्रकाराला फारशी प्रतिष्ठा नव्हती. राजपुरोहिताने गाणे बजावणे करणे शिष्टसंमतही नव्हते.

प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

लेखक पेट थेरपी यांनी रविवार, 20/04/2014 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली.