Skip to main content

कलिया बदाम

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 16/07/2014 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बकर्‍याचे मांस (मटण) - १/२ किलो दही - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप) डालडा - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप) खवलेला नारळ - १०० ग्रॅम (एक ते सव्वा कप) मसाला वेलची - ३ नग दालचिनी - १ इंचाचे ५ तुकडे लवंगा - ६ नग कांदा - २ नग मध्यम आकाराचे. तिखट - दिड लहान चमचा. (टि स्पून) आख्खं जीरं - अर्धा लहान चमचा (टि स्पून) आलं - २ इंच बदाम - ८० ग्रॅम ( कपभर) मीठ चवीनुसार. तयारी: बकर्‍याचे मांस स्वच्छ धुवून निथळवून त्यात फेटलेले दही मिसळा आणि मुरण्यासाठी तासभर बाजूला ठेवून द्या.

वाट ईथे स्वप्नातील...

लेखक स्वप्नांची राणी यांनी बुधवार, 16/07/2014 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्य अस्ताला गेला तेव्हा पारा शून्याच्याही खाली गेला, आणि हा म्हणे कॅनडातला 'उन्हाळा' होता. उद्या सक्काळी सक्काळीच उठून एका विलक्षण सफरीला निघायच होतं. पण रात्रीचा हा थंडीचा कहर पाहून ती सहल रद्द करावी की काय असं वाटू लागल. खर म्हणजे टॉरान्तोहून निघालो तेव्हा तिथे स्वच्छ उन पडल होतं. पण आम्ही अल्बर्टा ला पोचलो आणि एकदम गारठलो. त्यातून ते बोचरे गारेगार वारे...! अल्बर्टा ला 'लहरी हवामानाचा प्रदेश' म्हणतात आणि सध्याचं त्याचं हे रूप त्याच नाव सार्थ करत होतं. आता फक्त गाढगुडूप झोपावं अश्या विचारात असतानाच फोन वाजला, "हाय, झोपला नाहीत ना?

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.

विसंगती - सुसंगती

लेखक आतिवास यांनी बुधवार, 16/07/2014 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच. मला स्वत:ला विवेकानंद अवघड कधीच वाटले नव्हते, वाटत नाहीत.

द ईएमआय ट्रॅप

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 16/07/2014 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान. lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत.

बालगुन्हेगारी कायद्याचा पुनर्विचार

लेखक अक्शु यांनी बुधवार, 16/07/2014 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी नुकत्याच केलेल्या विधानानुसार लैंगिक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन म्हणजे १८ पेक्षा कमी वय असणाऱ्या गुन्हेगारांची संख्या जवळपास ५० टक्के एव्हढी आहे.बालगुन्हेगारी कायद्या अंतर्गत प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा न होता जास्तीत जास्त ३ वर्षांची रिमांड होम देण्यात येते.बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारांना कायद्याची ही कच्ची बाजू माहिती असल्यामुळे अशा बाल्गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे म्हटले जात आहे.मनेका गांधी यांनी अशा गंभीर स्वरूपातील बालगुन्हेगारांना प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षेची तरतूद केल्यास बाल्गुन्हेगारीवर

विजयोत्सव!

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 16/07/2014 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
.
१५ जुलै २०१४... बर्लिनचे ब्रांडेनबुर्ग गेट माणसांनी गच्च फुलले होते, हातात जर्मनीचे झेंडे,गळ्यात झेंड्याच्या रंगाच्या प्लास्टिकफुलमाळा, अंगात जर्मनीचा शर्ट..

बाउमकुखन (ट्री केक)

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 16/07/2014 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 15/07/2014 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258 वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-. हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात.

CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 15/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .