आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ७
२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला.
रिपल्स बे, जुलै २९
या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं.
मिसळपाव