आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ११
केप कॉलबॉर्न इथे पोहोचल्यावर अॅमंडसेनने सुटकेचा नि:श्वास टाकला!
तो म्हणतो,
"इथून पुढे जाताना सतत पाण्याची खोली मोजण्याची आवश्यकता नव्हती! आमच्या जहाजापेक्षा कितीतरी मोठी जहाजं इथपर्यंत येऊन परत गेली होती! जॉन रे, कॉलीन्सन, मॅक्क्युलर आणि इतरांच्या मेहनतीतून तयार झालेले अनेक नकाशे आता आम्हाला उपलब्ध होते! अज्ञात सागरातून मार्ग काढण्याची यापुढे आवश्यकता नव्हती!"
शिडाच्या उपकरणाची दुरुस्ती केल्यावर उरलेला दिवसभर त्यांनी तिथे आराम केला.
मिसळपाव