Skip to main content

पणती

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 20/10/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक चिमुरडी पणती दिसली रस्त्यावर पणत्या विकणारी पाटी-पुस्तक-शाळेवाचुन व्यवहारी गणिते शिकणारी नऊ-दहा वर्षांची इवली चंद्रकोरशी नाजुक, सुंदर चतुर, कुशल संभाषण हसरे व्यवहाराला परखड, कणखर 'ताई, काकू घ्या ना पणत्या हलक्या, सुंदर, सुबक, टिकाऊ शोभिवंत रांगोळीसाठी दीपमाळ ही नवीन देऊ? या पानांच्या आणि फुलांच्या शंख-शिंपल्यांच्या, मोरांच्या सोनेरी, रंगीत मण्यांच्या वेगवेगळ्या आकारांच्या खासच निवडुन देते सगळ्या भाव नका पण पाडू खाली आम्हां गरिबांच्या कष्टाचा तुमच्यावाचुन कुठला वाली? मोल असे माती-पाण्याचे कलाकुसर अन् कौशल्याचे स्नेह-वात घालाल तुम्ही तर जीवन होइल साफल्याचे' बोलुन गोष्ट

माझ्या पुष्पसख्या

लेखक नूतन यांनी सोमवार, 20/10/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रसिद्ध बंगाली लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांचे ’अरण्यक’ हे (मूळ बंगाली भाषेतील ) पुस्तक वाचनात आले.य़ा पुस्तकात कथानकाच्या अनुषंगाने, भागलपूर,बिहार येथील मोहनपूरा रिझर्व्ह फौरेस्ट मधील वनश्रीचे नितांतसुंदर वर्णन केले आहे. ते वाचून मला माझ्या शाळकरी वयातील झाडाझुडपांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.) हा साधारण १९६७-६८ च्या दशकाचा काळ. सुशिक्षित मध्यम वर्ग वाडे किंवा चाळीत बिऱ्हाड करुन रहायचा हा काळ. तर आम्हीही अशाच एक चाळीत रहात होतो. म्हणायला जरी ती चाळ असली तरी ते एक टुमदार, कौलारू एकमजली घरच होतं.

कणकीचे लाडू

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 20/10/2014 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! यंदाच्या फराळात हे कणकीचे लाडू करून बघा.

संवाद एका नटासोबतचा - मंदार पुरंदरे

लेखक पैसा यांनी सोमवार, 20/10/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री मंदार पुरंदरे सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री पुरंदरे यांना धन्यवाद!) ***************** मूळ पोलिश कविता : Rozmowa z Aktorem ( रोझमोवा झ आक्तोरेम ) मूळ पोलिश कवि: Ildefons Gałczyński ( इल्देफोंस गौचीनस्की ) संवाद : एका नटासोबतचा ! नुकताच तो इथून गेला , … अजूनही या खोलीत त्याचा वावर जाणवतो आहे त्याची अर्धी सिगारेट मंद धूर सोडते आहे.

संवादिका : रोड टू विन (जिंकण्यासाठी कायपण...)

लेखक प्रास यांनी सोमवार, 20/10/2014 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------------------------- "बर्गोमी, काय करायचं बोल! शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का लागता कामा नये, काय?" "ए माल्डिनी, काय बोलतोयस? कसला धंदा? आणि हे फॅमिली, फॅमिली काय प्रकार आहे?" "अरे दोनादोनी, सांग रे याला! लक्ष्य कधी नव्हे ते येवढं जवळ दिसतंय आणि हा मात्र.... ए, घुसळ रे याला, तू चेंडू घुसळतोस तसं." "बर्गोमी, सध्या माल्डिनी पुझो वाचतोय रे..." "हो का रे, मग काय आता पाब्लो माल्डिनीच्या ऐवजी डॉन कॉर्लिओनी म्हणायचं का तुला?" "अरे नाय रे! मी पुढच्या मॅचबद्दल विचारतोय. काय करायचंय?" "असं आहे बघ, उद्या मैदानावर जायचं.

“काल-प्रवास” (टाईम ट्रॅवल)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 20/10/2014 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक: “कालकूपि” (टाईम मशीन) मधून प्रवास करणं; भूत अथवा भविष्यकाळात जाता येणं ही काही तज्ज्ञांच्या मते निव्वळ कविकल्पना आहे. त्यांच्या मते प्रत्यक्षात असं काही घडल्याचा पुरावा नाही; आणि असं काही घडण्याची शक्यताही नजीकच्या भविष्यात दिसत नाही. पण एक तर आपल्याला भूतकाळाचं परिपूर्ण ज्ञान आहे असं समजण्यात आपण चूक करत आहोत. कुणाला माहिती कशाच्या पायावर आपली आजची इमारत उभी आहे ते! ज्ञाताहून अज्ञात अधिक आहे. शिवाय कोणे एके काळी अशक्य वाटणा-या कल्पना आज आल्या आहेत ना अस्तित्वात? मानवी मनाची ताकद तर्काच्या ब-याच पल्याड असते. म्हणून “टाईम मशीन” आज ना उद्या अस्तिवात येईल असं मला वाटतं.

माझा कॅनव्हास.. अर्थात जोहॅनसची गोष्ट.

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 20/10/2014 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
२०१२ सालचा जुलै महिना. ऑस्ट्रियामधल्या प्योर्टशाख इथे जगभरातले कलाकार जमले होते. तिथे उभारलेल्या मोठ्या मंचावर आमच्या सर्वांच्या कलाकृती सादर करून झाल्या होत्या. निकालाची वेळ जवळ येत होती. तिसर्‍या आणि दुसर्‍या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आणि विजेतेपदासाठीची घोषणा करण्यात येऊ लागली.. "आणि यंदाचा आपला विश्वविजेता ठरला आहे... जोहॅनस स्टॉयटर!!" JS1 सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला, मी धावत मंचावर गेलो, ट्रॉफी स्वीकारली..

आरसा

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 20/10/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
अभिजित कुलकर्णी. वय ३४-३५. शिक्षण बी ई (सिव्हिल), एम बी ए (मार्केटिंग). मूळचा सोलापूरचा. नोबल केमिकल्स मध्ये अवघ्या पाच वर्षात बऱ्यापैकी जम बसवलेला, धडाडीचा, आक्रमक आणि घेतली गोष्ट पूर्णत्वाला न्यायचा स्वभाव. सदा हसतमुख. स्टाफशी सलगीने वागणारा पण गरज पडेल तेव्हा डोक्यावर बसून काम करून घेणारा. स्वभाव त्याच्या नाकासारखा सरळ. आतलं बाहेरचं न ठेवणारा. सेल्स मध्ये मल्लू राज्य असताना सुद्धा आपली छाप उमटवणारा अभिजित, प्रस्थापित धेंडांच्या नजरेत सलत असला तरी आपले स्थान बळकट करत होता.

मी अन माझी बंद पडणारी ‘चालू’ यंत्रे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 20/10/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी अन माझी बंद पडणारी ‘चालू’ यंत्रे अखिल ब्रह्मांडात मला दचकावणार्‍या अन धास्ती वाटणार्‍या दोन गोष्टी आहेत. योगायोगाने दोन्ही ‘म’ने सुरु होणाऱ्या. एक, म्हैस आणि दुसरे मशीन. लहानपणी एका म्हशीने आपल्या शिंगांचा इंगा दाखवल्यापासून मी या भारदस्त प्राण्यापासून कमीतकमी दहा फूट अंतर नेहमीच राखून असते. आणि मशीन म्हणाल तर, संगणक आणि मोबाईल ही दोन यंत्रे सोडून इतर यच्चयावत यंत्रजमात सदैव माझी फजिती करायची संधी पहात असतात. कुठलेही नवीन यंत्र दिसले की माझ्या मस्तकात अनेक घंटा खणखणू लागतात, बरेच दिवे उघडझाप करू लागतात अन काही सर्किटे ठेंगणी (शॉर्ट) होतात.