झिरना गेट......
झिरना गेट......
हवालदाराची जबानी.....
‘हो साहेब मलाच सापडले ते प्रेत. मी नेहमीप्रमाणे लाकूडफाटा गोळा करण्यासाठी सकाळी बाहेर पडलो होतो. टेकडीच्या माथ्याआधी एक देवराई व बांबूचे बन लागते तेथेच दिसले मला ते.
ही टेकडी कुठे आहे ? आपल्या या फरासखान्यापासून जो रस्ता रामपूरकडे जातो त्या रस्त्यावर आर्धा मैल आत ! ती देवराई जरा एकांतातच आहे.’
‘जरा सविस्तर सांग ’ गोरा साहेब म्हणाला.
‘तो माणूस पाठीवर उताणा पडला होता. त्याच्या अंगात निळी बाराबंदी व डोक्यावर भरजरी मुंडासे होते. छातीवर आरपार गेलेला घाव स्पष्ट दिसत होता.
मिसळपाव