Skip to main content

महाराष्ट्राचे केजरीवाल !

लेखक ओंकारा यांनी सोमवार, 10/11/2014 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
>>> उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम.

क्या अच्छे दिन आ गये ?

लेखक hitesh यांनी सोमवार, 10/11/2014 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा . पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ? १. महागाई कमी करु म्हणणार्‍या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ? डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले. रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले. प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !

पूर्वेच्या समुद्रात- १

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 10/11/2014 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या आश्विनी रुग्णालयात काम करीत असताना एप्रिल १९९८ मध्ये एक दिवस मला विशाखापट्टणम च्या तटरक्षक दलाच्या वज्र जहाजावर पोस्टिंग झाल्याचे पत्र मिळाले. मुळात मुंबईत येउन मला एक वर्ष सुद्धा झालेले नव्हते (१० महिनेच झाले होते). शिवाय मी क्षकिरण तज्ञ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर परत एम बी बी एस चे काम करण्यासाठी का पाठविले ते कळत नव्हते. आमच्या एका महानिदेशकाच्या (DIRECTOR GENERAL) डोक्यातील सुपीक कल्पनेची हि फलश्रुती होती कि प्रत्येक बढती नंतर डॉक्टरने सुद्धा परत समुद्रावरील नोकरीचा अनुभव घ्यायला पाहिजे.

जॉर्डनची भटकंती : ०८ : मृत समुद्र आणि परतीची कथा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 09/11/2014 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६...

आल्प्सच्या वळणांवर - भाग ८ - आरं नदी आणि ग्रिंडेलवाल्ड (अंतिम)

लेखक मधुरा देशपांडे यांनी रविवार, 09/11/2014 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७ इंटरलाकेन नंतरचा दिवस ना पाउस ना उन असा होता.

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५

लेखक मार्गी यांनी रविवार, 09/11/2014 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४ सर्व वाचकांना धन्यवाद! जम्मू क्षेत्रातील मदतकार्य . . आज आपत्ती येऊन गेल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हे लिहित असताना कोणाला असा प्रश्न पडेल की, आता हे सर्व लिहिणं खरोखर आवश्यक आहे का? इतकी ह्याची गरज आहे का? ह्याची‌ आवश्यकता आहे.

द्रिश्यम/ दृश्यम

लेखक यश राज यांनी रविवार, 09/11/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझे काही मल्लू सहकारी खुप दिवसांपासुन सांगत होते की द्रिश्यम म्हणुन एक खुप सुंदर मल्याळम सिनेमा आहे, त्याने यंव बिझेनेस केला,त्यंव रेकॉर्ड केले व तु नक्की बघ.मी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले.

बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 09/11/2014 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी , ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व जर्मन सरकारने बर्लिन भिंतीचे दरवाजे उघडून पूर्व बर्लिनच्या नागरिकांना पश्चिम बर्लिनमध्ये जायची परवानगी दिली. पुढे एक वर्षाच्या आत दोन्हीही जर्मन राष्ट्रे एकत्र आली.

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !

लेखक ओंकारा यांनी रविवार, 09/11/2014 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
>>> गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय.