घालीन लोटांगण
कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदीनं चरण,
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे,
प्रेमे आलिंगन आनंदे पूजन,
भावे ओवाळीन म्हणे नामा
ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे).
मिसळपाव