भीडस्तपणा, स्वानुभव व प्रश्न
भीडस्तपणा व अधिसत्ता(dominance) यान्च्या संघर्षातून निर्माण होणारे काही प्रश्न.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.
श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं?
अंधार क्षण भाग ४ - मारिया प्लेटोनाउ (लेख २०)
अंधार क्षण - मारिया प्लेटोनाउ
जानेवारी १९९१ मध्ये ' अ ब्रिटिश बिट्रेयल ' (ब्रिटिशांनी केलेला विश्वासघात) हे वृत्तचित्र बीबीसीवरुन प्रसारित झालं. या वृत्तचित्राचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता मी होतो आणि मला त्याच्यामुळे बराच त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला. ब्रिटनमधल्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे ज्येष्ठ नेते लाॅर्ड आल्डिंग्टन यांनी या वृत्तचित्राच्या प्रसारणालाच आक्षेप घेतला. एवढंच नाही तर त्यांनी बीबीसीच्या अध्यक्षांकडे याबाबत रीतसर लेखी तक्रार दाखल केली.
अकारण
पेशावर येथील १६ डिसेंबर २०१४ रोजी शाळेतील मुलांवर झालेल्या प्राणघातक अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध...
नांदूर-माध्यमेश्वरचे पाहूणे
सध्या थंडी मस्त पडली आहे. कुठे हॉटेलात तर कुठे तळ्याकाठी कुठे डोंगरावर तर कुठे लेण्याच्या सानिध्यात कट्टे करण्याचे मिपाकरांचे कट शिजताहेत. काही अलोट गर्दीत पार पडलेत. चुकलेले हळहळत बसलेत. मीपण येत्या रविवारचा हुकमिएक्का आयोजित भिगवण कट्टा हुकतोय म्हणून कासावीस झालो आहे. खरोखर किती बदललोय मी. मिपावर आल्यापासून कट्टाप्रेमी होत चाललोय. एकटाच भटकणारा मी आता वेगळे अनुभव घेतो आहे. आता जास्ती लांबण न लावता मुद्द्याकडे येतो.
नांदूर-माध्यमेश्वर या पक्षितीर्थाबद्दल ऐकून होतो.
एकटा
बघतो आहे वाट ती आता तरी येईल,
आलीच अगदी वेळेवर तरी पुढे काय होईल...
तिचे ते डोळे अन् ती मोहक अदा,
ते रेशमी केस पाहून झालोय मी फिदा...
तिच जागा आणि वेळ पाळण्याचा विक्रम मी रचला,
"पेहली नझर का प्यार" वर विश्वास माझा बसला...
इतकं सगळं झालं तरी बोलणं काही होत नाही,
समोर जरी आली तरी लक्ष मात्र देत नाही..
सरली अशीच दोन वर्षे आता तरी बोलावं,
थेट समोर जाउन आता प्रपोजच करावं...
मग विचार केला की कसे तिचे मन वळवू,
समोर जाऊन बोलण्यापेक्षा पत्रानेच कळवू...
एक छान पत्रं मी लिहिले अन् हिमतीने नेउन दिले,
न वाचताच तिने ते फाडून फेकूनही दिले...
ती निघून गेली अन् डोळ्यासमोर अंधारी पसरली,
पाहिलेली लाखो स्व
बळीराजाची बोगस बोंब!
लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-sho…
काही मुद्दे असे की शेतकर्यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत.
झटकून टाक ती राख...
जो बोलत नाही त्याचे ऐकून घेतले जात नाही.
जो बोलतो त्याचेच ऐकले जाते.
जो देत राहातो त्यालाच मागितले जाते.
जो देत नाही त्याला मागितले जात नाही.
जो घाबरतो त्यालाच जास्त घाबरवले जाते.
जो घाबरत नाही त्यालाच सगळे घाबरतात.
जो हक्क गाजवतो, त्याचे कर्तव्य विसरले जाते.
जो कर्तव्यच करत राहातो, त्याचे हक्क विसरले जातात.
जो टीकाच करतो त्याचेवर कुणी टीका करायला धजावत नाही.
जो प्रशंसाच करतो त्याचेकडून टीका ऐकण्याची सवय राहात नाही.
तुम्ही फक्त हसतच राहाल तर लोक तुमचे रडणे ऐकणार नाहीत.
तुम्ही फक्त रडतच राहाल तर लोक तुम्हाला कधीच हसू देणार नाहीत.
तुम्ही भिडस्त राहून लोकांना तुमचा फायदा घेवू देऊ नका.
तुम्ही काही
पेशावरमधील शाळेवर हल्ला - पेरले तेच उगवले
आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे.
'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे.
मिसळपाव