असा मी अबब मी - २
"तर मित्रांनो आणि शत्रूंनो, मोठ्यांनो आणि छोट्यांनो, शहाण्यांनो आणि गधड्यांनो, दोन आठवड्यांपूर्वी ठरल्याप्रमाणे आता सज्ज व्हा कीर्तनाला! आजचे आख्यान आहे नॅनोपुराण आणि आजची मुख्य कीर्तनकार आहे मेऽडमॉयशेऽऽल ग्रेसी ऊर्फ माझी स्वीऽऽट स्वीऽऽट आई. साहाय्यकाच्या भूमिकेत इथून आहेत माझे ग्रेट पप्पा ऊर्फ मिस्टर रिची आणि आमचे महामूर्ख ज्येष्ठ बंधू आदित्य. अर्थात जिच्यामुळे आपण नॅनोगाडी चालू करतो आहोत ती माही देखील हजर आहे." सारा.
"अगोदर पप्पूचे होऊंजात का क्वान्टम मेकॅनिक्सवर? मग सोपं जाईल." ग्रेसी.
"लेडीज फर्स्ट मावशी. तृणमूल कॉन्ग्रेस कुठली. नॅनोगाडी अडवतेस काय?
मिसळपाव