दोघी … (भाग ३)
दोघी … (भाग ३)
भाग ३
पुढे काही दिवस लोटले . सुलभा आणि किरण भेटल्या नव्हत्या बऱ्याच दिवसात . फोनवरच एकदोनदा बोलणे झाले तेवढंच . एके दिवशी संध्याकाळी सुलभाने घरात आदित्य च्या लग्नाचा विषय काढला . तिने आदित्य ला आधीच किरण बद्दल विचारले होते . तेव्हा त्याने जरा लाजूनच 'पुढे जायला काही हरकत नाही' असे सांगितले होते . आई ने स्वतःच त्याला किरण बद्दल विचारल्यामुळे त्याला तर जणू मनातले ओठावर आले होते आपसूकच . अर्थात तो आई पुढे तसं दर्शवत नव्हता पण सुलभा ला ते कळल्यावाचून राहिला नाही . मग काय , किरण ला तर ती ओळखत होतीच आणि किरण ने आपली सून व्हावं असं तिला मनापासून वाटत होतं .
मिसळपाव