Skip to main content

महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 15/02/2015 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ? मुलाखत आणि नोकरी वरून कमी करणे हे विषय आणि त्या वरील प्रतिक्रिया वाचून बरेच दिवस मनात रेगन्ळेल्या विषयाला हात घालू पाहतोय. ध्याग्याचा उद्देश एकांगी टीका करण्याचा नाही तर अनेक जुन्या आणि जाण्यात्या मित्रांशी चर्चा करताना हा विषय नेहमी चर्चेत येतो आणि उलट-सुलट वाद होतात , माझे अनुभव सांगतोय ह्या अनुषंगाने तुमचे अनुभव तुम्ही मांडू शकता. १.

चॉकलेटचा बंगला ऽऽ

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 15/02/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट चा बंगला अजून आठवतो का हळूच मनात खरं खरं सांगा बरं गोष्ट राहील आपल्या आपल्यात... लहानपण जर जपलं असेल . बिस्किटांची गच्ची दिसेल टॉफीच्या दारामधली झुपकेवाली खार दिसेल ... लेमनच्या खिडकीमधून . उंच उंच झोका दिसेल झोक्यावर बसलात तर मैनेचा पिंजरा दिसेल चॉकलेट डे च्या दिवशी आज पुन्हा ऐकदा बंगला दिसला तुझीच वाट पहात होतो असं म्हणून हळूच हसला ... चॉकलेट च्या या बंगल्यामध्ये तुम्ही सुद्धा जाऊन या बालपणीच्या आठवणी त फेरफटका मारून या!
काव्यरस

एक परंपरा

लेखक चिनार यांनी रविवार, 15/02/2015 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक परंपरा शनीवार आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शनीवार होता. शाळेची वेळ ११.३०-२.३. पण त्या दिवशी शाळा दहाC मिनिटे लवकर सोडण्यात आली. कारण २.३० वाजता एक क्रिकेट सामना सुरु होणार होता. एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी शाळेची वेळ अधिकृतरीत्या बदलणं हि काही साधीसुधी गोष्ट नव्हे, पण तसा निर्णय घेतला गेला कारण २.३० वाजता सुरु होणारा सामना साधासुधा नव्हता, तो होता विश्वकप १९९६ चा उपान्त्यपूर्व सामना. आणि प्रतिस्पर्धी होते भारत वि. पाकिस्तान!!! आम्ही धावत घरी आलो. आपली पहिली ब्याटिंग होती. सचिन आणि सिद्धुनी सावध सुरुवात केली. त्यांचा जम बसला असा वाटताक्क्षणिच सचिन आउट झाला. छातीतली धडधड वाढली.