Skip to main content

मश्रुम्स विथ गार्लिक सॉस/डिप (Sautéed Mushrooms with Garlic Sauce)

लेखक मधुरा देशपांडे यांनी मंगळवार, 17/02/2015 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीतील नाताळच्या मार्केट्स मध्ये मिळणारा चटपटीत असा हा खाद्यप्रकार. कडाक्याच्या थंडीत हे मश्रुम्स, सोबतीला ब्रेड आणि ग्लुवाईन हे कॉम्बिनेशन म्हणजे निव्वळ सुख. याचे मूळ जर्मन नाव Champignons mit Knoblauchsoße. Champignons म्हणजे मश्रुम्स आणि Knoblauchsoße म्हणजे लसूण, दही, क्रीम यापासून केलेला एक डिपचा प्रकार. नाताळ मार्केट्सच्या स्टॉल्स वर बघून कसे करतात याचा अंदाज आला होता, सोप्पा वाटला. आंतरजालावर अजून थोडी शोधाशोध केली. त्यावरून मी केलेली पाककृती येथे देत आहे. यात तुम्ही आवडीनुसार बदल करू शकता.

कॉफ़ी

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/02/2015 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
कॉफ़ीत एक नशा असते... ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने..

आत्म"मुक्ति!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/02/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी??? प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा? मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा. मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे? पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे??? तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू. शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू! सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का? जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का? मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको.. निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको. अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता? तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता. मी म्
काव्यरस

१४ फरवरी (प्रेम दिन) - दोन क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 16/02/2015 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते. या प्रकरणांचा अंत काय होईल, विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका तिच्या साठी सर्व सोडले, पण तिने .... गुलाबी काटा ह्रदयी डसला. जीव भौंऱ्याचा नाहक गेला. बहुतेक मुलींच्या नशिबी .... रस पिउनी भौंरा उडाला. कळीच्या नशिबी विरह वेदना.

ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी'......एक लघूकथा. स्पर्धेसाठी नाही.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/02/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
Human Shadow on Divine Beauty... या गोष्टीचे नाव इंग्लिशमधे का आहे याचे उत्तर फार सोप्पे आहे. ज्या चित्रामुळे ही गोष्ट घडली त्या तैलचित्राचे नाव ब्रुनो फर्नांडिसने, म्हणजे ज्याने हे चित्र रंगविले होते, इंग्लिशमधे ठेवले होते. जे झाले ते लिहिले आहे त्यामुळे अलंकारिक भाषेला वाव नाही.....असो.... दिल्लीच्या नॅशनल आर्ट गॅलरीमधे देशातील अत्यंत प्रगल्भ अशा चित्रकारांच्या तैलचित्रांचे चित्रांचे प्रदर्शन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गेली कित्येक वर्षे भरत आहे.

एक शोध.. एक गुण....

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/02/2015 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
विजय, प्रकाश, प्रसाद आणि राजेश लाहानपणापासूनचे मित्र. अगदी शाळे पासूनचे. ज्या वयात मैत्री फ़क्त मैत्रिसाठी असते. तिला कोणतेही कारण चिकटलेले नसते; त्यावयातले मित्र. पुढे जरी चौघांचेही मार्ग बदलले तरी ही शाळेतली मैत्री अतुट राहिली होती. विजयने कायद्याचा अभ्यास केला आणि पुढे हायकोर्टात जज्ज झाला. प्रकाशने चार्टड अकाउंटेंसी सुरु केली होती; आणि आता तो सरकारचे अकाउंट्स बघत होता. मोठ्या पोस्टवर होता तो. प्रसादने बराच प्रयत्न केला शिक्षण घेण्याचा. पण त्याला शिक्षणात गोडी नव्हती. शेवटी त्याने त्यांच्या लोनावळयाच्या घराचा कयापालट करून तेथे लॉजिंग बोर्डिंग सुरु केले.

आर आर पाटील

लेखक विकास यांनी सोमवार, 16/02/2015 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
R R Patil महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर अर्थात आबा पाटील यांचे आज निधन झाले. वाचल्याप्रमाणे, गेले तीन महीने ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी केल्या गेल्या, करण्याचा प्रयत्न झाला. त्यात सुरवातीच्या काळातील संत गाडगेमहाराज अभियान असोत अथवा नक्षलवादग्रस्त भागात अनेक चांगली कामे तयार करून विश्वास संपादन करणे असोत अथवा डान्सबारबालांवरील बंदी असोत... काही वेळेस ते जनतेच्या टिकेचे धनी देखील झाले, विशेष करून २६/११ च्या हल्ल्यानंतरचे त्यांचे एक(च) पण अनाठायी वक्तव्य...

फायर एक करणे ३ (अंतिम)

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 16/02/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
फायर एक करणे २ अमेरिकेतील कोणत्याही क्षणी पिंक स्लीप / युरोपातील कायद्याच्या चौकटीत राहून बऱ्यापैकी पारदर्शक प्रक्रियेतून येणारे फायरिंग / जपान मध्ये 'शक्यतो नाहीच' असे फायरिंग (ऐकिव माहिती नुसार) इथे संबंधित देशात प्रदीर्घ नोकरी करणाऱ्यांनी प्रकाश टाकावा हि अपेक्षा (डेप्युटेशन वर गेलेल्यांना फार तपशील कळू शकत नाहीत ह्या गृहितकावर).....ह्यात आपण भारतात कुठे तरी मध्ये आहोत ...म्हणजे कायद्याचे संरक्षण असेल तर कामात कुचराई / कायद्याचे संरक्षण नसेल तर सत्ताधार्यांची मनमानी ..

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग ३ ओरिजनल प्रेम पत्र ...

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/02/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत पंजाबातून जातात तेंव्हाच्या कथा भागातील मजेदार प्रसंग सादर... पठाणकोट डमताल ..

१८५००

ओरिजिनल प्रेम पत्र!

पान२२५ ...आता नुसतचं बसून काय करायचं म्हणून म्हटले झाडावर चढता येते का पाहू... प्रचंड'सालढोम' इतर वृक्षांच्या गर्दीत पांढराफटक वेगळा वाटत होता. सगळ्या अंगाला त्याच्या गुळगुळीत बुंध्याचा पांढरा भुस्सा लागू लागला. वर जायला ही फारसा आधार नव्हता. म्हणून नाद सोडला. तेवढ्यात बुंध्याच्या चुंबळीसारख्या खोलगट गाठीत हाताला एक खोचून ठेवलेला कागद लागला.