पुणे पासपोर्ट ऑफिसचा त्रास
मानसिक त्रास
काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती.
१.व्यवस्थित भरलेला फॉर्म
२.रीसीट
३.आधार कार्ड
४ पॅन कार्ड
५. शाळा सोडल्याचा दाखला
६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट
७. अॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी)
८.अॅनेक्चर ए ( जन्मगाव )
९. लाइट बिल
१०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने)
वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते.
प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले .
गोष्टी एकेकाच्या!
बढाया मारणे, समोरच्याला कमी लेखणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण हे करत असताना बऱ्याच वेळा लोकं भानंच ठेवत नाही. मला याविषयी आलेले काही अनुभव खाली मांडतो आहे.
वधु संशोधनाचे दिवस होते त्यावेळेची गोष्ट. नागपूरला 'पाहण्याचा' कार्यक्रम ठरला. त्यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाले. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात साधारण चाळीशीत असणारे मुलीचे काका आले. ते रेल्वे मध्ये कुठल्याश्या विभागात क्लरीकलला होते. ओळख झाल्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरवात केली.
"तुमचं इंजिनीरिंग कुठल्या विषयात झालंय ?"
"मेकॅनिकल!”(मनात: बायोडाटा बघितला नाही का बे?)
"अरे वा!
सार्वजनिक, 'सार्वजनिक दृश्यमान', 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध', आणि 'सार्वजनिक अधिक्षेत्र'
Public, Publilcly visible, Publilc accessible, Public domain यांच्यासाठी मी अनुक्रमे सार्वजनिक, 'सार्वजनिक दृश्यमान', 'सार्वजनिकरीत्या उपलब्ध', आणि 'सार्वजनिक अधिक्षेत्र' हे शब्द वापरले आहेत.
"सार्वजनिक, सार्वजनिक उपलब्ध, सार्वजनिक अधिक्षेत्र इत्यादी संकल्पनांची 'सार्वजनिक दृश्यमान' या सोबत गल्लत होताना दिसते, कायद्याच्या चष्म्यातून पाहताना यातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे.
दिवस असे कि (भाग १)
भारतात आल्यावर अनेक मंगल कार्यक्रमांना जायची वेळ आली.अशा प्रसंगी सहभागी व्हायला मला देखील मनापासून आवडत.त्यातून मंगल कार्य कुणा घरच्याच जवळच्या नातेवाईकाच असेल तर मग बघायलाच नको.अगदी हक्काने जाण होत.यावेळी देखील असच अगदी जवळच मंगल कार्य होत.माझ्या बहिणीच्या मुलाची मुंज.नात्याने चुलत असली तरीही मनाने सख्खी बहिण असल्याने घरचंच कार्य होत.शिवाय सुट्टी देखील पुरेशी होती मग काय चांगला ८ दिवस मुक्काम ठोकला ताईकडे.
अहल्येची रामायणातील दुसरी कथा
श्री. विवेक पटाईत यांचा अहल्येवरचा लेख वाचावयाला सुरवात केल्यावर सुखावलो होतो. श्री. विवेक मूळ रामायणावरून, तेथील संदर्भ देऊन, लिहत असल्याने "कादंबरीती"ल व्यक्तीचित्रे वाचतांना खटकणारे वाचावे लागणार नाही असे वाटत होते. पण पुढे पुढे गेलो तसे जाणवले की "अरे, हे तर आपण वाचलेल्या "रामायणा"तील नाही." आता रामायण व महाभारत यांचे खंड हाताशीच असतात. बालकांड, सर्ग ४८-४९ वाचावयास सुरवात केली आणि काहीच जुळेना. वैतागलोच. मिपा बंद असल्याने त्यांचा लेख समोर ठेवून तपासणेही शक्य नव्हते. पण शेवटी त्यांनीच आमच्या बंद कुलुपाची चावी दिली.
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७
मागिल भाग..
"तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो.
पुढे चालू...
=====================
"गगन...सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश.... देई अभय...गगन...सदन..."
"आत्मू... अरे तुझी ती गाणी किती वस्तू कुठे कुठे विसरायला लावतात रे........!!!
रोगप्रतिबंधात्मक उपाय
जीवन सदैव आनंदात घालवणे प्रत्येकाला प्रिय असते व प्रत्येकजण त्यासाठी सदैव धडपडत असतो.
परंतु कुटुंबातील एखाद्या जवळील व्यक्तीला जर अचानक काही आजार जडला किंवा आजारपणामुळे महिनोंमहिने त्रास सुरु असेल तर कुटुंबातील सर्वांच्या आनंदावर विरजण पडते.
मिसळपाव