Skip to main content

'बॉक्स ऑफिस..', ‘हाऊस फुल्ल..' या शब्दांचा जन्म..

लेखक ग्रेटगणेश यांनी मंगळवार, 28/04/2015 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
'शब्दनाद'...मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे जन्म, उगम आणि अर्थांचा शोध घेणारे सदर.. 'बॉक्स ऑफिस..', ‘हाऊस फुल्ल..!’ आपल्या हिन्दी-मराठी चित्रपट सृष्टीशी संबंधीत 'बॉक्स ऑफिस' हा शब्द चित्रपट वेड्यांना अतिपरीचित आहे. तित्रपटाचं यश-अपयश त्याच्या तिकीट बारी वरील विक्रीने जोखतात व या तिकीट बारीलाच 'बॉक्स ऑफिस' असं आज म्हणतात. हा शब्द कसा अस्तित्वात आला याची एक मनोरंजक कथा नुकतीच माझ्या वाचनात आली. या शब्दाचा जन्म ब्रिटीशांच्या लंडन मधला.

अरब जगतातील प्रताधिकार नियमांची स्थिती आणि आंतरजालाच्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय ज्युरीस्डीक्शन

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 28/04/2015 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकाही अरब देशात कधी राहीलो नाही, (नाही म्हणायला दोन-चार दिवसांचा अनुभव गाठीशी आहे, तेवढाच). अर्थात आंतरजाल कोणत्याही देशातून पाच मिनीटांसाठी वापरल आणि प्रताधिकारीत मजकुराची देवाण अथवा घेवाण केलीत की देश-विदेशांचे प्रताधिकार कायदे तुमची पाठराखण करू लागतात. काही आंतरराष्ट्रीय करारांमुळे बहुतांश देशांचे कायद्यांमध्ये साम्य असले तरीही फरकही बर्‍यापैकी आढळतात. थोडी फार मिपाकर मंडळी अरब देशातून असतील त्यांच्याकडून त्या त्या देशातील प्रताधिकार विषयक त्यांना काही माहिती आहे का ? असल्यास जाणून घेण्यास आवडेल.

नशीब - भाग १

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 28/04/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कावेरी एक खेडेगावात राहणारी सामान्य मुलगी, वयात आलेली, गहुवर्णी, मैत्रीणीसारखा कुणी राजकुमार शहरातुन यावा आणि आपल्याला त्याच्या राजमहालात घेउन जावा अशी स्वप्न बाळगणारी. मागे तीन बहीणींचा गोतावळा असलेली. कावेरीचं शिक्षण दहावीपर्यंत झालं होतं, त्यानंतर ती आईला घरकामात मदत करत होती. वडील शेती करत होते तसेच त्यांनी थोड्या जागेत पालेभाज्या लावल्या होत्या, ते गावात विकण्याचे काम कावेरी बरेचदा करत असे.

'कॉटन ग्रीन' स्टेशन..हे नाव या स्थानकाला कसं प्राप्त झालं ?

लेखक ग्रेटगणेश यांनी मंगळवार, 28/04/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
'शब्दनाद'...मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे जन्म, उगम आणि अर्थांचा शोध घेणारे सदर.. 'कॉटन ग्रीन' स्टेशन.. हार्बर रेल्वेमार्गावरील एक स्टेशन. 'कॉटन ग्रीन' स्टेशनच्या नांवातच काॅटन असल्याने त्याचा कापसाशी संबंध असावा हे तर उघडच आहे मात्र त्यातील 'ग्रीन'चा अर्थ काय हे कळत नव्हते, त्याचा शोध धेतला असता मस्त मनोरंजक माहिती हाती लागली.. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी व भायखळा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या पूर्वेस हार्बर लाईनवर येतं. इंग्लंडमधील कापड गिरण्यांना लागणा-या आपल्या देशातील कापसाची निर्यात हार्बर लाईनच्या पूर्वेस असणा-या बंदरातून व्हायची.

तोरण्याचा रात्रीचा ट्रेक

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 28/04/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझे मित्र ट्रेकला बऱ्याचदा जातो. पण रात्री सहसा नाही. आणि उन्हाळ्यात तर नाहीच. शक्यतो दिवसा आणि पावसाळ्यात. म्हणजे ट्रेक, पावसात भिजणे, हिरवळ, वारे या सगळ्यांचा आनंद घेता येतो. पण एखाद्या डोंगरावर रात्रीचा मुक्काम करणे, रात्री चंद्रप्रकाशात भटकणे अशी इच्छा बऱ्याच दिवसापासून होती. एकदा माझे मित्र हरिश्चंद्रगडावर जाउन राहिले होते, पण तेव्हा मला जाता आलं नाही. त्यावेळी ते दिवसा किल्ला चढले होते आणि रात्री तिथे मुक्काम केला होता. त्यांनी केलेली मजा ऐकुन पुढच्या वेळी जायचंच असं माझ्या मनात मी ठरवलं होतं.

ऐक स्वखे त्रिधारा: भाग ४

लेखक नाखु यांनी मंगळवार, 28/04/2015 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्वखी भाग २ नव्याचे नऊ दिवस सरले आणि माझ्या भाषेची अडचण आणि मराठी व्याकरणाची बोंब यामुळे अनर्थाला सुरुवात झाली..

भूतदया!! Human Rights!

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 28/04/2015 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेले महिना-दिड महिना या गोष्टीवर लिहावे म्हणते आहे. पण जो प्रश्न पडलाय; तो नक्की कसा विचारावा ते कळत नाही आहे. भरीत भर म्हणजे वाद घालणे हा आमुचा प्रांत नाही, पण मला जो प्रश्न पडलाय तो काथ्याकुटातच येउ शकतो. तर मंडळी बाली नाईन हे प्रकरण ऑस्ट्रेलियात अतिशय गाजते आहे. त्या बद्द्लची माहिती मी वर लिंक मध्ये दिली आहे. ऑस्ट्रेलीयन लोकांना सगळ्यात स्वस्त हॉलीडेज म्हणुन इंडोनेशीया अन त्यातल्या त्यात बालीचे अतिशय आकर्षण! प्रवास अगदी नगण्य! खर्च तर त्याहुन नगण्य! अन ऑस्सी पासपोर्टला इंडोनेशियात असणारा मान!

आणि यांनी घडविली अमेरिका! ..अंतिम ५) हेन्री फोर्ड

लेखक अमित खोजे यांनी मंगळवार, 28/04/2015 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि यांनी घडविली अमेरिका! हि लेखमालिका मला मिसळपाववरती सादर करू दिल्याबद्दल मी समस्त मिपाकारांचा आणि संपादक मंडळाचा आभारी आहे. माझी मिसळपाववरील हि पहिलीच मालिका. शेवटचा भाग लिहायला काही कारणांमुळे बराचसा उशीर लागला त्याबद्दल मी आपली नम्रपणे माफी मागतो. पुन्हा एकदा या मालिकेविषयी - गेल्या वर्षी २०१४ मध्ये हिस्टरीवर 'The Men Who Built America' ही मालिका बघितली आणि त्या मालिकेची ओळख सर्वांना करून देण्याच्या इच्छेने हि मालिका लिहायला घेतली. अगोदर लिखाणाचा काहीच अनुभव नसल्याने व्हिडिओ ते शब्द असे भाषांतर करताना सुरुवातीला बर्याच चुका झाल्या. भाषा तशी यांत्रिक वाटायला लागली.

लेमन कर्ड कप

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 28/04/2015 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः फिलो शीट्स = १ पॅक अंडी = २ साखर = १ वाटी बटर = १/४ वाटी आणि २ चमचे लेमन = २ फेटलेले क्रिम = १/२ कप कपकेक्सचा ट्रे पुदिना सजावटीसाठी कृती: १. फिलो शीट्सचे छोटे चौकोन कापुन घ्यावेत. ह्या शीट्स लगेच कोरड्या होतात त्यामुळे ते एका ओल्या कापडाने झाकुन ठेवावेत. २. २ चमचे बटर वितळवुन घ्यावे. ३. ट्रेला आतुन बटर लावुन घ्यावे. प्रत्येक चौकोनला दोन्ही बाजुने वितळलेले बटर लावुन घ्यावे. 1 ४.

एका डेटींगची गोष्ट

लेखक अभिशेखि यांनी सोमवार, 27/04/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
समोर किमान पाच हजार तरुण-तरुणी. अक्ख्या तरुणाईला वेड लावणारा गायक आणि त्याच्या सोबतचे अजून चार जण. गेले तीन तास त्यांच्या गाण्यांच्या बोलावर आणि गिटार, ड्रमच्या तालावर तरुणाई डोलत होती. कार्यक्रम शेवटाकडे यायला लागला. अक्ख्या वातावरणात संगीत पसरून गेलं होतं. शेवटचं गाणं सुरु होणार इतक्यात त्या ‘celebrity’ गायकाने त्याला बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चीत्कारणाऱ्या ‘crowd’ कडे बघत गायक म्हणाला ” Thanks Bro, This event was possible only because of you”. क्षणार्धात अक्ख्या गर्दीतून त्याच्या नावाच्या आरोळ्या निघाल्या. तो निवांत हसला आणि गर्दीकडे पाहत त्याने एक फ्लाइंग किस दिला.