Skip to main content

पावसाळी भटकंती - कमळगड

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 25/06/2023 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांसोबत पावसाळी भटकंती - कमळगड मिपाकरांसोबत आता भटकंतीचे योग जुळुन येणे दुर्मिळ होत चालले आहे . बहुतांश लोकं आपापल्या व्यापात , संसारात मग्न आहेत , काहींची वयं झाली , काही राज्याबाहेर गेले , काही देशाबाहेर गेले , काही मनाबाहेर गेले. त्यामुळे आता जास्त फिरणं होत नाही , झालं तरी लिहिणं होत नाही . लिहिलं तरी कधी काय सेन्सॉर केले जाईल ह्याची शाश्वती नाही . प्रवासवर्णन भटकंती वगैरे तर नाहीच नाही ! बाकी माझं आपलं एक वैयक्तिक मत आहे की भटकंती किंव्वा प्रवासवर्णन कसं असलं पाहिजे की आपलं लेखन वाचुन , फोटो पाहुन इतरांना वाटलं पाहिजे की यार हा ट्रेक करायला हवा , ह्या ग्रुप सोबत आपण जायला हवं .

मदत हवी आहे - दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे राहण्यास जागा

लेखक Trump यांनी शनिवार, 24/06/2023 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे. कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा. १. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे. २. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी. ३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी. ४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे. ५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. ६.