Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] "पोय्ये पोय्ये"

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 07/08/2015 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
"पोय्ये ... पोय्ये..., १० - १२ वर्षाचा गोडुला जीव ! त्याला मोबाईल नकोय, का वरणभात. "काकु.. काय ओरडतोय हा" "पोय्ये म्हणजे पोहे, मिळाले नाहीत. म्हणुन दन्गा! "काय रे नाव तुझ?" ढ्म्पुडी लाजून आईच्या कुशीत शिरतोय. "त्याला नाही कळत, स्पेशल चाइल्ड," "....." "मी पोहे आणते उद्या." . ढ्म्पुडीला पोय्ये आणलेत. रुममध्ये कुणीच दिसेना, डिस्चार्ज? समोरुन स्ट्रेचर, ढ्म्पुडीची आई रड्तेय, माझ्या छातीत धस्स .... खुप वेळाने ढ्म्पुडीची आई मला शोधत आलिये "अग पोहे आणलेस का ? ढ्म्पुडी सुकलाय पण हसुन दुखर्‍या पायाला बोट लावतोय, बाबा खिन्न भकास. " हेवी डायबेटीक, पायाला जखम....गुड्घ्यापासुन खाली पाय ... !!!! .....

[शतशब्दकथा स्पर्धा] !! व्दिधाता !!

लेखक माझीही शॅम्पेन यांनी शुक्रवार, 07/08/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
कित्ती दिवासाने भेटूया म्हणाली .. "बाहुबली दाखवशील?" रात्री वॉट'स अप वर मेसेज आला , कशीतरी धडपड करून तिकीट मिळवल .. अगदी लाल चुटूक ड्रेस आणि तशीच मस्त लिपस्टिक, सतत डोळ्यावर येणार्‍या रेशमी बटा , नुसता जीव वरखाली होत होता .. .. मध्यंतरात मानसने अगदीच न राहवून आश्लेषाला विचारल काय ठरवूया आपण आता ? .. थोडस कृत्रिम हसून म्हणाली थांबरे नक्की काय सांगू तुला माहीत आहेना मी कोण आहेते मग पुन्हा पुन्हा असा प्रश्न का करतोस?

[शतशब्दकथा स्पर्धा] किंकाळी

लेखक सिध्दार्थ यांनी शुक्रवार, 07/08/2015 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
१९७५ च्या आसपास. काळ्या आभाळाची सावली नजीक येत होती. तिला आज घरी जाण्यास उशीर झाला होता. अंधार वाढू लागल्याने ती जनावरांना घेऊन गावाकडे निघाली. वाटेत एक नदी होती. दुपारच्या जास्त पावसाने पाणी वाढले होते पण पूल नसल्याने नदीत पाय ठेवण्यावाचून पर्याय नव्हता. चार जनावरांच्या शेवटून ती दहा वर्षाची पोर नदीत उतरली. एका मोठ्या विजेच्या कडकडाटा बरोबर पावसाच्या सरी येऊन अंग भिजवू लागल्या. नदीच्या मध्यापर्यंत आल्यावर तिचा तोल गेला. ती प्रवाहाबरोबर वाहू लागली. नाका तोंडात पाणी गेले.

[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 07/08/2015 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून? नकोच, खरंच कुणाची वाट पहात असेल.’ पुन्हा लॅपटॉपकडे वळला. तेवढ्यात पुन्हा ती वळलेली जाणवली, पुन्हा त्याला अडखळून नजर पलिकडे मागे! आता मात्र लॅपटॉप बंद करून तो उठला.

सत्यकथा .. अध्याय - ३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 07/08/2015 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- सत्यकथा .. अध्याय १ आणि २ सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले.

[शतशब्दकथा स्पर्धा] जात

लेखक म्हया बिलंदर यांनी गुरुवार, 06/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी साहेब हातात कागदपत्रांचा गठ्ठा सावरंत, जुनाट शाळेच्या अंधाऱ्या वर्गात शिरतात. छोटा साहेब तीथे बसलेल्या आठ दहा जनांना उद्देशुन बोलु लागतो "सरकारने नियम काढलाय की सगळ्यांना आपली जात म्हाईत पैजे आणि सगळ्यांना जातीचे दाखले भेटले पैजेत. म्हणुन सगळ्यांनी, साहेब विचारतील ती म्हाईती नीट द्या…" त्याला मधेच थांबवत मोठ्या साहेबाने समोर बसलेल्या एकाला ईशाऱ्यानेच बोलावलं आणी पान खात विचारलं "नाम?" "रामा" "बापाचा नाम?" "तुरबा" कागदावर काहीतरी लिहुन साहेब तो कागद रामा कडे देत सांगतो "सोमवारको तलाठी कडे जाउन हेचावर जात लिहुन घे आणी मंगलको तालुका हापीसला जा." रामा थोडावेळ तिथेच उभा "समजला नाही का?

आमची 'कर्म'फळे

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 06/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन.
काव्यरस

[शतशब्दकथा स्पर्धा] सोलमेट

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 06/08/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
लेक्चरला निघालेल्या अर्णवला थांबवून नेहाने विचारले, "आज संध्याकाळी पिक्चरला जाऊयात ? " "सॉरी आज मी देव सरांकडे नोट्स घेण्यासाठी जाणार आहे, चल बाय." हिरमुसल्या नेहाकडे न बघता तो पुढे निघाला. अतिशय हुशार आणि देखण्या अर्णवच्या मागे अनेक मुली होत्या पण तो सगळयांपासून लांबच रहायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून काहीतरी अनपेक्षितसं त्याच्यासोबत घडत होतं.. तुकडया- तुकडयांतील त्याचं आयुष्य, एका व्यक्तीने एखाद्या जिग्सॉ पझल प्रमाणे एकसंध जोडून त्याला परिपूर्ण केलं होतं. अर्णव प्रेमात पडला होता. पहिल्यांदाच.

माझी मुक्ताफळे

लेखक chetanlakhs यांनी गुरुवार, 06/08/2015 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
"यह प्यार किस चिड़िया का नाम है किस पेड़ पर रहती है आजकल जाने क्यों लोग हमारे अल्फाजों को प्यार समझ रहे है आजकल" "बेवफा न आप थे ना हम, बस वक्त का तकाजा था" "शब्द सरळच असतात..आपण त्यात अर्थ शोधतो" "दर्द हमेशा शायर के दिल का ही होता है" "दिल धड़क रहा है सांस फूल रही है दिल बीमार है उनका क्योंकि उसमे रूह नहीं है" "बड़ी शिद्दत से उन्हें मनाया था रूबरू हुए तो धड़कनो ने काम तमाम कर दिया उसकी दर पर आज फरियाद लेकर गए उसने दिल की धड़कनो की दुहाई दी" "अब मौत से खेल शुरू हुआ और जिंदगी लुटती चली गयी उनकी बंद आंखे देखकर नींद उड़ गयी प्यारी मुस्कान देखकर उनके दिल का हाल समझ आया" "नींद ने आज गुस्ताख़ी की है आ

विंडोज १०: एक धावता आढावा

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 06/08/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
विंडोज १०: एक धावता आढावा माइक्रोसोफ्ट कंपनीच्या या नव्या ओपरेटिंग प्रणालीची घडणीची सुरुवात मागच्या वर्षीच झाली होती आणि जानेवारी २०१५ नंतर ती काही लोकांना वापरण्यास देण्यात आली. आता २८/२९ जुलैला ती अधिकृतरित्या सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आली.