Skip to main content

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/08/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

लोणीभक्ती आणि पराठे

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी मंगळवार, 25/08/2015 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः मातृभक्ती आणि मराठे या देहाची लोणीभक्ती, लोणीप्रेम वादातीत आहे. लोणी देवो चवः, लोणी देवो सवः, पराठे देवो भवः असे म्हणतानाच पराठ्याबरोबरच्या लोण्याच्या चवीचे महत्त्व सुभाषितकाराने सांगीतलेलं आहे. लोण्याचा सुवर्णकाळ, शतके ज्यांनी लोकांच्या पोटावर राज्य केलं असे 'अमुल' त्यांची ती अमुलकन्या सुरभी, आपल्या पराठ्यावर चापुन लोणी लावत असे. लोणीप्रेमावतंस पराठापती *** पराठावाले. ह्यांच्या बालपणापासुनचं प्रत्येक पराठ्यांवर त्यांच्या पाकसम्राज्ञी आईसाहेबांचा प्रभाव आढळतो.

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित पुरुषांसाठी कोकीळ व्रत

लेखक दमामि यांनी मंगळवार, 25/08/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहे. हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात.

( दीडशे रे.....)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 25/08/2015 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
दीडशे रे.......... एक शाळा होती सुंदर तीत मुले होती शंभर मग आणखी आले पन्नास किती किती झाले रे? दीडशे रे दीडशेला भागू मी की, दीडशेने गुणू मी भागू गुणू, भागू की गुणू गुणू भागू, गुणू की भागू दीडशे रे तो सट्टे कसकसले लावे अन्‌ हरतो हो लावे अन्‌ हरतो हो मग किती सेशन गेले, अन्‌ पैसे पण गेले रे पण आशेवर लढला, अन्‌ खेळतच राही रे तो डाव खेळ-खेळला, हरला हरला आणि हरला बिल थकले उधार झाली, उधारीत हाय ती खाल्ली जहरासाठी पैसे नव्हते रे दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे दीडशे रे बांधून ये रिक्षाला काटेरी तारांना पंचर कर रिक्षाची चाके रे छोले तर ती खाते ना आणि कुलचे पण खाते ती आणि चावून ती अनरसे सांबार पण गिळते

रानफुलांच्या वाटेवर

लेखक जागु यांनी मंगळवार, 25/08/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षा ऋतू जीवनधारांचे सिंचन करत येतो आणि मातीच्या गर्भात असणार्‍या प्रत्येक बीज, कंदांना नवजीवनाचे अंकूर देतो. पावसाचे आगमन हळू हळू डोंगर, रानवाटा हिरव्यागार करत जातात. जून जुलै मध्ये रानावनातील कोवळी हिरवळ बाळसं घेत असते. साधारण ऑगस्ट पासून ह्या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुले गवत, झुडपे, वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलांच्या बहराचे. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले कासचे पठारही आता फुलू लागेल.

नाकतोडा......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2015 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
नाकतोडा...... मी लहान होतो, म्हणजे असेन सात आठ वर्षांचा. त्यावेळेस माझ्या आजोबांकडून पंचतंत्रातील गोष्टी ऐकताना मी अगदी त्यात रंगून जात असे. माझे आजोबा मला नुसतेच गोष्टी सांगून थांबत नसत तर त्या गोष्टींचे तात्पर्य अगदी तपशीलात जाऊन सांगत असत. अर्थात मला त्यात काही विशेष रस नसे. यातील एक गोष्ट मला चांगलीच लक्षात राहिली होती ती म्हणजे ‘नाकतोडा व मुंगी’ ही गोष्ट. लक्षात राहण्याचे कारण म्हणजे आजोबा या गोष्टीचे तात्पर्य सांगताना त्यांच्याच आयुष्यातील घटना सांगत.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 25/08/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

TIFRAC भारताचा पहिला संगणक

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/08/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
TIFRAC च्या विकासाच्या टीममधे, फिजीक्समधे पोस्टग्रॅज्यूट झालेले, आणि ज्यांचं इलेक्ट्रोनीक्समधे स्पेशलायझेशन झालेले असे काही लोक, तसेच रेडीयो इन्जीनियरींग मधले डिप्लोमा घेतलेले असे लोक होते. शिवाय त्यांना अमेरिकन युनिव्हर्सीटीमधे संगणाच्या दृष्टीने झालेल्या विकासाची पुरी माहिती घ्यायला मुभा होती. TIFR च्या लायब्ररीमधे वाचण्यासाठी त्या विषयावर भरपूर ग्रंथ होते. ह्या प्रोजेक्टसाठी त्यवेळचे १६ लाख रुपये बजेटमधे मंजूर झाले होते.

[शतशब्दकथा] शिवी- भाग २

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 24/08/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते. "मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला. मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली! गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले.

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 24/08/2015 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे. हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते.