Skip to main content

सेनापती - (कथा)

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 31/08/2015 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे साडेपाच वाजले होते . श्री. रायचंद घाईघाईने मीटींगरुममधुन बाहेर पडले आणी आपल्या केबिनकडे जाउ लागले . दिवसभरातील उरलेली कामे संपवून सहा वाजेपर्यंत घरी निघायचे असा त्यांचा बेत होता . रायचंद हे शहरातील एका नावाजलेल्या जुनीअर कॉलेजमध्ये अ‍ॅडमिनीस्ट्रेशन विभागाचे प्रमुख होते . काही वर्षांपासुन कॉलेजमधील नवीन अ‍ॅडमिशनसची धुराही तेच सांभाळत होते. कॉलेजच्या संचालकांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्यामुळे , कॉलेजचे प्राचार्यसुद्धा त्यांच्याशी दबकुन , नरमाईने वागत असत .

पण आई म्हणते की..............

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 30/08/2015 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
ते तुझे नशीले डोळे त्या तुझ्या नखरेल अदा वर हसताना गालावर पडणारी खळी " हाईट " आहे असं वाटतं की................ चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून पण आई म्हणते की.......... चोरी करणे " वाईट " आहे तुझ्या ओढीने बरसणारा तो........ अन त्याच्यासवे धुंद भिजणारी तु....... तुझी ओलती शहारणारी काया पाहुन आता त्या पावसाचीही हालत थोडीशी " टाईट " आहे असं वाटतं की................ चोरुन न्यावे तुलाच तुझ्यापासून पण आई म्हणते की.......... चोरी करणे " वाईट " आहे तुझ्यासाठी रात्रभर जागणारा तो..... अन चांदण्यांच्या दुलईत शांत निजणारी तु..... झोपेत

अवधूत (भाग-२)

लेखक मांत्रिक यांनी रविवार, 30/08/2015 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ डोक्यात असं विचारचक्र चालू असतानाच अचानक वरून येणा-या घंटेच्या टणटण आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. आरती सुरु झाली वाटतं! त्याची पावले नकळत वेगाने चालू लागली. आत्ताशी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ सुरु झालं होतं. आईची आरती थोड्याच वेळात चालू होईल, त्याच्या आत पोहोचावं, असा विचार करून भराभर पाय उचलू लागला. थोड्याच वेळात तो मंदिराच्या गर्भगृहात पोहोचला. समोर जगदंबेची भव्य मूर्ती उभी. त्याने नम्रपणे नमस्कार केला. फुलांचा द्रोण पुजारीबाबाकडे दिला. कुणा धनिकानं दीपदान सोहळा केलेला होता.

अस्तित्व - ( कथा )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 30/08/2015 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
अमोल नुकताच प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाऊ लागला होता. नवीन शाळा, नवे वातावरण, नवे विषय व या विषयांचा वाढलेला आवाका अशा बदलांना सामोरे गेल्यामुळे अमोलची अभ्यासात बरीच तारांबळ उडत होती. काही महिन्यांतच त्याच्या शिक्षकांच्या दृष्टीने त्याची 'फार हुशार / अभ्यासूही नाही व फार दंगेखोरही नाही' अशा मध्यम विद्यार्थ्यांमध्ये गणना होऊ लागली. अमोलनेही स्वतःची तीच समजूत करून घेतली व तो आला दिवस ढकलू लागला. एकदा त्यांच्या गणिताच्या शिक्षकांनी सर्वांना २० गणिते सोडवायचा गृहपाठ दिला. घरी आल्यावर अमोलने त्यांतली १५ गणिते सोडविली. पुढची ५ गणिते जरा अवघड होती. ती त्याला लगेचच सुटेनात.

द स्केअरक्रो - भाग ‍२२

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 30/08/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २१ द स्केअरक्रो भाग २२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) आदल्या रात्री जेवताना आम्ही पाण्यासारखी रम प्यायली होती. त्यामुळे सकाळी उठल्यावर दोघांचंही डोकं बऱ्यापैकी दुखत होतं. पण कसेबसे आम्ही बाहेर पडलो आणि वेस्टर्न डेटाच्या रस्त्याला लागलो. थोडाफार वेळ होता, त्यामुळे आम्ही आधी हायटॉवर ग्राउंडमध्ये जाऊन गरमागरम कॉफी घेतली.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

एकांत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 29/08/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोणते हे फूल, वा काय त्याचे नाव? विचारतो ना सांगतो तो स्वतः शी बोलतो! कळी आज लाजते फूल उद्याला हासते पाहतो! ना बोलतो, तो स्वतः शी हासतो! रंग हिचा केशरी गर्द तिचा सोनेरी स्पर्शतो ना तोडतो तो स्वतःशी रंगतो! ...... ..... फूल त्याच्या अंतरीचे किती कसे कळलावे? डोलते ना थांबते वाऱ्यातून हुरहुरते!
काव्यरस

दुष्काळवाडा......... भाग-२ ढगात अडकला कृत्रिम पाऊस

लेखक pradnya deshpande यांनी शनिवार, 29/08/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
हजारो कोटींची तातडीची मदत जाहीर करण्यापेक्षा कोटीत कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी राहते. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न म्हणून मायबाप राज्य सरकारने मराठवाड्यासाठी कृत्रिम पावसाचे केंद्र मराठवाड्याला दिले. पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केले. जुलैच्या पहिल्या महिन्यात झालेल्या या घोषणेला प्रत्यक्षात यायला ऑगस्टचा पहिला आठवडाच उजाडला.

श्रीमन्महाभारत -उपसंहार

लेखक शरद यांनी शनिवार, 29/08/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमन्महाभारत - उपसंहार प्रत्येक गोष्टीला लोकप्रिय होण्यास तिचा काळ यावा लागतो. उदा. मुंबईतला लालबागचा राजा, सिद्धीविनायक, पुण्यातील दगडुशेट गणपती वा शिर्डीचे साईबाबांचे मंदीर. आजकाल मिपावर चलती आहे "महाभारता"ची चांगली गोष्ट. चार लोक महाभारत वाचणार असतील, त्यातही संपूर्ण (अर्थात मराठी भाषांतर) तर सोन्याला सुगंधच. शिवाय भागवत-कर्वे-कुरुंदकर सोबतीला असतील तर वा-ह-वा ! आज मी यांच्या जोडीला आणखी एका विद्वानाच्या पुस्तकाची भर घालू इच्छितो. भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या "श्रीमन्महाभारत-उपसंहार" या अमूल्य खंडाची.

क्रीडायुद्धस्य कथा - दहा सेकंदांचं युद्ध

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 29/08/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माहित्ये .... सगळे नऊच्या नऊ ग्रह जर एका लायनित आले ना..... त्या दिवशी पृथ्वी खतम होऊन जाणार!" आमचे ८ वर्षांचे ज्येष्ठ मित्रवर्य आम्हा ६ वर्षाच्या पोरांना सांगायचे. ते ऐकून जी टरकली होती म्हणता....त्यानंतरचे बरेच दिवस आकाशाकडे बघून सगळ्या ग्रह तार्यांची पोझिशन तपासण्यात गेले होते. जाम टेन्शन आलं होतं तेव्हा. तेव्हाच्या प्रदुषणविरहित आकाशात नेहमी दिसणारे गुरू, शनी, मंगळ वगैरे एकमेकांपासून हातभर अंतर ठेऊन आहेत बघितलं की हायसं वाटायचं. पल्याड शुक्र, बुध आणि न दिसणारे राहू केतू काही का गोंधळ घालेनात. जोपर्यंत ही नऊ लोकं एकत्र येत नाहीत तो पर्यंत प्रॉब्लेम इल्ले.