द स्केअरक्रो - भाग २९
द स्केअरक्रो भाग २८
द स्केअरक्रो भाग २९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
अजून पाच मिनिटांनी मी हायटॉवर ग्राऊंडमध्ये बसलो होतो. अजिबात गर्दी नव्हती. तिघे-चौघे कॉलेज विद्यार्थी वाटावेत असे तरुण-तरुणी समोर लॅपटॉप ठेवून बसले होते. मी रॅशेलसाठी आणि माझ्यासाठी कॉफी घेतली आणि इतर लोकांपासून जरा दूरच्या टेबलवर बसलो. इथे वायफाय फुकट होतं. मी माझा लॅपटॉप चालू केला आणि रॅशेलची वाट पाहायला सुरुवात केली.
अशीच पंधरा-वीस मिनिटं निघून गेली. मला आता थोडी काळजी वाटायला लागली. तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसला तर?
मिसळपाव