Skip to main content

शितोळे (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी रविवार, 27/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
''कुठे चालले ? सातारा का?'' ''नाई सांगलीला'' . ''अरे वा ! मी पण !'' 'त्यात काय अरे वा ?' बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले . ''तुम्हाला प्रवासात झोप येते? '' ''हं '' ''बरंय बाबा !'' शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता. जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही. भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते . ''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक !

“ये है बंबई मेरी जान.”

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 27/09/2015 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
ये है बंबई मेरी जान काही दिवसांपुर्वी मुंबईला आलो होतो. गोरेगावच्या एका रस्त्यावरून जाताना सहजच बाजूला असलेल्या बस स्टॉपकडे दृष्टी गेली आणि सर्व प्रथम नजरेत भरला तो एका जाहिरातीतला अक्षय कुमार, त्याच्या सुंदर निळ्या शर्टासहित. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि नजरेत चमक. आणि दुसर्याच क्षणी दिसला तो त्याच्या छत्र छायेत गाढ निजलेला मनुष्य. त्या बस स्टॉपच्या अरुंद बेंचवर, वरील स्टीलच्या बारला धरून शांतपणे झोपला होता. पण शांतपणे तरी कसं म्हणता येईल ?

बाप्पाचा नैवेद्य : वाटली डाळ

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 27/09/2015 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
अनंत चतुर्दशी, बाप्पा घरी जायला निघणार आज. निरोपाच्या प्रसादात वाटली डाळ हवीच, नाही का? या वाटल्या डाळीची पाककृती मीच पूर्वी मिपावर दिली आहे. पण आज जी वाटली डाळ इथे देते आहे ती प्रसादाची असल्याने त्यात कांदा घालायचा नाही.

बाप्पाचा नैवेद्य : पातोळ्या आणि पातोळे

लेखक पैसा यांनी रविवार, 27/09/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
पातोळ्या आणि पातोळे हा कोंकणातला आवडता प्रकार आहे. साधारण नागपंचमीला, गौरीच्या नैवेद्यात, दसर्‍याला म्हणजे जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात तेव्हा पातोळ्या हौसेने केल्या जातात. गोव्यातले कॅथॉलिक ख्रिश्चन लोकही त्यांच्या सांजाव सणाला आवर्जून पातोळ्या करतात. सुकूर पर्वरीला १५ ऑगस्टला पातोळ्यांचे फेस्त (जत्रा) भरते. पातोळ्या प्रकार १) साहित्यः १ वाटी तांदूळ नारळाच्या एका वाटीचे ओले खोबरे खोबर्‍याच्या अर्धा गूळ किंचित मीठ पाणी वेलची पूड/जायफळ पूड आवडीप्रमाणे हळदीची पाने कृती: तांदूळ सुमारे ४/५ तास भिजत घालावेत.

श्श..... सांभाळून बोला! भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 27/09/2015 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1  "हलो... हलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हलो..... एकता आहात का तुम्ही? हलो........" फोन कट करून मैथिली खो-खो हसत सुटली. वर्धा, अभी, राजन, मंजू सगळे तिच्या हसण्यात सामील झाले. एकटी अवनी शांत होती. "काय झाल तुला अवनी?" हसण थांबवत मैथिलीने अवनीला विचारले. "मैथिली मला असले pranks आवडत नाहीत. काय हा आचरटपणा लावला आहेत तुम्ही? कुठला रस्ता नाही मिळत तुला? मला या वाड्यात फक्त ही एकच रात्र रहायचं आहे ह. पहाटेच निघायचं आहे साधारण पाच पर्यंत. आणि dont worry...  मला रस्ता मिळेल बाहेर पडायचा. तुमच तुम्ही बघा.

द स्केअरक्रो - भाग ३०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 27/09/2015 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २९ द स्केअरक्रो भाग ३० (अंतिम भाग) (मूळ लेखक मायकेल कॉनेली) कार्व्हर तिथे असेल असा मला संशयसुद्धा आला नव्हता पण आता तो माझ्या मागे उभा होता. “तू रिपोर्टर आहेस त्यावरूनच मला समजायला हवं होतं. एक नंबरचे सिनिकल असता तुम्ही लोक. मी आत्महत्या करीन यावर तुझा विश्वास न बसणं साहजिक आहे.” बोलता बोलता त्याने माझ्या हातातली गन काढून घेतली आणि माझ्या शर्टाची कॉलर धरून माझा चेहरा भिंतीवर दाबला. तो माझी झडती घेत असल्याचं माझ्या लक्षात आलं. “ही गन एजंट वॉलिंगने दिली वाटतं तुला?

एका अनोळखी प्रदेशात - २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली.

श्रीगणेश लेखमाला १० : कंपनी सेक्रेटरी

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 27/09/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाणिज्य शाखेत पदवी घेणार, हे मी आठवी-नववीत असताना मला कळून चुकले होते आणि सी.एस. करणार हे अकरावीमध्येच कळले होते; त्याचे कारण माझे नियोजन खूप सुबद्ध होते आणि ध्येय खूप उत्तुंग होते आणि त्याच्याकडे मी खूप आधीपासून वाटचाल सुरू केली होती, असे लिहिण्याचा मला खूप मोह होतो आहे. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की आठवी-नववीतच माझ्या गणितातले भ्रमांचे भोपळे फुटायला लागले (म्हणजे उत्तर पत्रिकेवर भोपळ्यांची संख्या लक्षणीय असायची) आणि पट्टीच्या साहाय्यानेसुद्धा एक सरळ रेष काढताना नाकी नऊ यायचे. त्यामुळे गणिताची गरज असणारे इंजीनियरिंग आम्ही आयुष्यातून वजा केले.

स्क्रिन शॉट भाग -४

लेखक राजू यांनी शनिवार, 26/09/2015 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत ..... मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." पुढे चालु.....
स्क्रिन शॉट भाग -४ पुढे चालू ह्या मेसेज,स्क्रिन शॉट, नंतर सेम टू सेम प्रोफाइल्सने अमित साठी आजचा दिवस या वेळे पर्यंत तरी एका मागोमाग एक धक्के देणाऱ्या भूकंपाचा ठरला होता.

नका घेऊ गळफास

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 26/09/2015 18:32 या दिवशी प्रकाशित केले.

नका घेऊ गळफास



किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!

जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!

छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
काव्यरस