Skip to main content

कोकणची 'तोंड'ओळख

लेखक टक्कू यांनी गुरुवार, 15/10/2015 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं गाव कुठलं? असा लहानपणी दुसऱ्या इयत्तेत असताना बाईंनी प्रश्न विचारला. मी म्हटलं नागाव. घरी येउन आईला सांगितलं तेव्हा ती हसून म्हणाली, 'अगं ते माझं आजोळ आहे. आपलं गाव आंजर्ले. दापोली मधे. यापुढे कुणी विचारलं तर लक्षात ठेव. आपण जाऊ या मे महिन्याच्या सुट्टीत.' खरं सांगायचं तर तेव्हा आपलं गाव (हो ’आपला’ गाव ही रचना सर्रास वापरतात पण ते ’आपलं’ गाव असतं) कोकणात आहे यापेक्षा अधिक माहिती नव्हती पण कोकण खूप खास आहे हे मात्र जाणवलं होतं. पुढे जेव्हा अनेकदा कोकणात जायची वेळ आली तेव्हा प्रत्येक वेळी त्याची खासियत उलगडत गेली.

शेफिल्ड खाद्यसोहळा

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 15/10/2015 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
शेफिल्ड ही जरी "स्टील सिटी" म्हणून किंवा इथे असलेल्या "युनीव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड" आणि "शेफिल्ड हलाम युनीव्हर्सिटी" अशा दोन प्रसिद्ध विद्यापिठांमुळे किंवा "शेफिल्ड युनायटेड" आणि "शेफिल्ड Wednesday" मुळे किंवा "मिडॉहॉल", "पीक डिस्ट्रिक्ट", "ट्राम्स" मुळे ओळखले जाणारे शहर असले तरी शेफिल्डर्स हे तितकेच अस्सल खवैय्ये आहेत आणि त्यांची खवैय्येगिरी, अन्नपदार्थांचा मनापासून आस्वाद घेणं हे इथे भरण्यार्‍या खाद्यसोहळा, फार्मर्स मार्केट, ख्रिस्मस मार्केट मधे चांगलेच दिसून येते :) ह्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या लाँग वीकांताला "शेफिल्ड फुड फेस्टिवल" चे आयोज

ओ कॅनडा

लेखक स्रुजा यांनी गुरुवार, 15/10/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
रुची विशेषांकाची घोषणा करणारा पहिला धागा आला आणि मी उत्साहाने कॅनडा बद्दल लिहायचं ठरवलं. लिहायला बसले आणि लक्षात आलं की हे "खायचं" काम नाही. मग खोदकाम करत गेले तसं हा आवाक्याबाहेरचा विषय निदान नजरेच्या टप्प्यात तरी आला. "शनिवार रविवार घरी जेवलं की फाऊल" ही पुण्याची खोड इथे आल्यावर पण कायम होतीच, ती बर्‍यापैकी कामाला आली. पण गेल्या ३ वर्षातली नुसती निरिक्षणं उपयोगाची नव्हती. कार्यकारण भाव शोधायला हवा होता. तो शोधायला गेले तर एक इतिहासाचा पट उलगडत गेला. मुळात रुढार्थाने कॅनडाचं कुणीच नाही, फर्स्ट नेशन्स शिवाय. सगळे आले ते बाहेरुनच.

स्पॅनिश खाद्ययात्रा

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 15/10/2015 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्पेन... बरेच दिवसांपासुन स्पेनला जायची इच्छा होती. ती ह्या जुन मधे पूर्ण झाली. १-२ महिने आधीपासुनच मी तिथली माहिती मिळवायला सुरवात केली होती. कुठल्याही नविन ठिकाणी गेल्यावर मला तिथले स्थानिक पदार्थ खायला आवडते. गाझपाचो सुप, हॅम आणि स्पॅनिश पायेया हे तीन पदार्थच सगळ्यात जास्त ऐकण्यात होते, पण आम्ही प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळले की फक्त एवढेच नाही तर अजून खूप प्रकार आहेत इथे खाण्यासारखे. आमची १५ दिवसाची ट्रिप ठरली होती. माद्रिद, वॅलेन्सिया, इबिझ्झा आणि बार्सेलोना. आमच्या ट्रिपची सुरवात मॅद्रिद ह्या शहरापासुन होणार होती. आम्ही रात्री ८ वाजता हॉटेलवर पोहोचलो.

जर्मन खाद्यसंस्कृती - मधुरा देशपांडे - स्वाती दिनेश

लेखक मधुरा देशपांडे यांनी गुरुवार, 15/10/2015 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
माह्लत्साईट!! गुटेन आपेटिट!! आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या युरोपच्या केंद्रस्थानी असलेला जर्मनी हा देश. इतिहासातील दोन महायुद्धे, त्यानंतर झालेले पूर्व आणि पश्चिम असे विभाजन, नव्वदीच्या दरम्यान पुन्हा एकत्रितपणे संयुक्त जर्मनी म्हणून आजही स्वतंत्र ओळख असलेला हा देश. बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज अशा गाड्या, फुटबॉल, कुकू क्लॉक ही जशी यांची एक ओळख, तशीच ब्लॅक फॉरेस्ट केक, बिअर आणि बिअर फेस्टिवल, चॉकलेट्स, बेकिंग आणि त्यानुषंगाने येणारे ब्रेड आणि केकचे प्रकार हे जर्मन खाद्यासंस्कृतीचे प्रातिनिधिक स्वरूप.

नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातील रुखवत

लेखक पैसा यांनी गुरुवार, 15/10/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवराची पोथी बर्‍याच वर्षांपूर्वी एका मुलीच्या हातात पाहिली होती. तिला विचारले की ही पोथी तुला कशी वाटली? तर ती म्हणाली की "ही पोथी वाचल्यामुळे लवकर लग्न जमते असं म्हणतात." हे ऐकून मग मी बरीच वर्षे त्या पुस्तकाच्या वाटेला गेले नाही. मला वाटले की काहीतरी लिहिले असेल. पण एकीकडे एकनाथ असे काहीतरी अमूक केल्याने ढमूक होईल वगैरे लिहितील असे वाटत नव्हतेच. नंतर कुठेतरी त्यातल्या जेवणावळीतल्या पदार्थांबद्दल ऐकले. मग धीर करून पुस्तक आणले आणि वाचले. ती झपाटल्यासारखी वाचतच गेले. शके १४९३ (इ.स.१५७१) रामनवमीच्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर आख्यान हा ग्रंथ सिद्ध झाला.

संपादकीय - सानिकास्वप्निल - अजया

लेखक अजया यांनी गुरुवार, 15/10/2015 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो! अनाहिताच्या पहिल्या अंकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आजच्या जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हा रुची अंक घेऊन आपल्यासमोर येत आहोत. अनाहिताचा या वर्षातला हा दुसरा अंक! या अंकाबाबत काही सांगण्याआधी अनाहिता अंक वेगळा का काढतो आपण हे मिपाकरांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल! तर याचे मुख्य कारण आहे अनाहितांना लिहिण्याचा आत्मविश्वास येऊन त्यांना या निमित्ताने मिसळपावच्या मुख्य प्रवाहात सामिल होता येते. एरवी घर, मूल, करीअर या सर्वात गुरफटलेल्या असताना, अनेक जवाबदार्‍या एकटीने खांद्यावर झेलत असताना अनाहितांचा मिपावर सहभाग बर्‍याचदा वाचनमात्र असतो.

मुखपृष्ठ

लेखक अनाहिता यांनी गुरुवार, 15/10/2015 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
Ruchi 2015 मुखपृष्ठ - श्री.नागेश कदम फोटो - सानिकास्वप्निल