Skip to main content

कॅम्पिंग मधले खाणे

लेखक इडली डोसा यांनी गुरुवार, 15/10/2015 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कॅम्पिंग करायला आम्ही सदैव उत्साही असतो. आम्ही म्हणजे मी नवरा आणि आमची अडीच वर्षाची लेक आणि कधी कधी काही मित्रमंडळी. उन्हाळ्यात तर दर दोन चार वीकेंड नंतर आम्ही कॅम्पिंगला जात असतो. या उन्हाळ्यात आत्तापर्यंत तीन वेळा कार कॅम्पिंग झालं. कार कॅम्पिंग मधे राहण्या खाण्याच्या सगळ्या गोष्टी रहाण्याच्या ठिकाणापर्यंत आम्ही कार मधुन नेतो. पूर्वी बर्‍याच वेळा आळस करून फक्त मॅगी आणि रेडिमेड उपमा पाकिटेच घेऊन जायचो. आता पोरीसाठी नव-नवीन प्रयोग करायला लागलो आहे. यावर्षी एकावेळी आम्ही पास्ता करण्यासाठी लागणारं सगळं सामान घेऊन गेलो.

शेफ परेड

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 15/10/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
स्लोवाकियामध्ये आल्यापासून इथली खाद्यसंस्कॄती, जेवणातील काही प्रमुख पदार्थ शिकायची खूप दिवसापासून इच्छा होती. ती आता पूर्ण होणार होती. फेसबुकवर Internations Bratislava ह्या नावाचा एक ग्रुप आहे. ह्या ग्रुपने २८ एप्रिलला, ब्रातिस्लावा मधे असलेल्या 'शेफ परेड" ह्या कुकिंग स्कूल मधे स्लोवाक कुकिंगचा प्रोग्रॅम आयोजित केला होता. मी ह्या ग्रुपची सदस्य असल्यामुळे मला त्याचे निमंत्रण आले होते. मी लगेचच पैसे भरुन माझी जागा निश्चित केली होती. आता मी २८ एप्रिलची वाट बघत होते. शेफ परेड हे स्लोवाकिया मधील पहिले प्रसिद्ध कुकिंग स्कुल आहे. ह्याची सुरवात २०११ मधे झाली. इथे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात.

डोनट्सचा इतिहास

लेखक जुइ यांनी गुरुवार, 15/10/2015 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
डोनट्सचा इतिहास-जुइ नमस्कार, विशेष अंक काढायचा आहे असे कळल्यावर आणि तोही रुची या विषयाशी निगडित असणार हे कळल्यावर माझी चांगलीच गोची झाली. असे वाटले, अरे आपल्याला तर पाक कौशल्यातील लिहिण्यासारखे काहीच येत नाही. मग या विषयावर आपण काय लिहू शकतो? काही तरी लिहिण्याची खूप इच्छा होती पण विषय आपल्याला झेपणारा हवा असेही वाटत होते. शेवटी एक दिवस चेपू वर एक बातमी दिसली "डोनट डे", अरेच्या ही काय भानगड आहे. मग ती बातमी वाचली आणि ठरले की यावरच आपण लिहायचे. तर जाणून घेऊयात "डोनट डे" ही काय भानगड आहे. ७ जून १९३८ रोजी पहिला राष्ट्रीय डोनट दिवस अमेरिकेत साजरा केला गेला.

अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला...

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 15/10/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.. असं गर्वगीत म्हणत म्हणत कोलंबसाने अमेरिका शोधली आणि तिथून युरोपात परत येताना आपल्या पोतडीत अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आणि वस्तू भरून घेऊन आला. फर्डिनांड महाराज आणि इझाबेला राणीसाहेबांना त्याने आपला हा जादूई नजराणा पेश केला. त्यातल्या साधारण बदामासारख्या दिसणार्‍या गर्द तपकिरी बियांकडे कोणाचं फारसं लक्षही गेलं नाही. आपल्या चौथ्या अमेरिका वारीत कोलंबसाला असं आढळलं की ह्या बियांचा चलन म्हणून वापर होतो आहे. त्याचं कुतुहल चाळवलं गेलं आणि तेथील लोक ह्या बियांपासून पेय बनवतात असं त्याच्या लक्षात आलं.

पिझ्झाची गोष्ट

लेखक अजया यांनी गुरुवार, 15/10/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला आणि माझ्या लेकाला नॅशनल जिओग्राफिकवरचे फूड हिस्टरीवरचे कार्यक्रम बघायला खूप आवडतात. मध्ये एक कार्यक्रम बघताना रोचक शोध लागला की पिझ्झा हा जगात सर्वाधिक खाल्ले जाणार्‍या पदार्थांमध्ये मोडतो! अमेरिकेत तर म्हणे दर तिसरा मनुष्य पिझ्झा खात असतो. मुळातला इटालियन पदार्थ अमेरिकेत जाऊन कसा बरं एवढा प्रसिद्ध झाला याचे कुतूहल वाटून पिझ्झा काय "चीज" आहे बघुया तरी. म्हणून पिझ्झाचा इतिहास शोधायला घेतला आणि साकार झाली ही पिझ्झाची गोष्ट. तसा पिझ्झाच्या चपट्या ब्रेडचा प्रकार फार जुना. अगदी सात हजार वर्षांपूर्वी देखील भाजलेले ब्रेड संशोधकांना मिळालेले आहेत.

मुखवास(पाचक सुपारी)

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 15/10/2015 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
m नमस्कार मंडळी!! झाले का जेवण? टाकलीत का सुपारी तोंडात? मस्त सणावाराचे दिवस आहेत. काही ना काही निमित्ताने रोज गोडधोड खाल्ले जातंय. मग ते पचायला सुगंधी चविष्ट पान वा सुपारी हवीच की! सुरेख पदार्थांनी भरलेल ताट त्याचा आस्वाद घेत घेत केलेले तुडुंब जेवण त्यावर तोंडात टाकायला तांबूल किंवा छानशी सुपारी, सूखच! असे कितीहि छान जेवणानंतर पोट भरले तरी आठवण येते ती मुखवासाची. मुखवास म्हणजे जेवणानंतर पचनासाठी खाल्ली जाणारी सुपारी, तांबूल.

स्वादिष्ट खिरींचा मेळावा

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 15/10/2015 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी झटपट बनणारी, सणावारी, नैवेद्यासाठी बनणारी किंवा खास दिवसांची गोडी राखणारी, अशी ही स्वादिष्ट, चविष्ट खीर. संस्कृतमध्ये क्षीरम म्हणजे दूध आणि क्षीर म्हणजे दूधापासून बनवली जाणारी खीर. ह्या खिरीचे महाराष्ट्रात अनेक प्रकार बनवले जातात जसे रव्याची, तांदुळाची, शेवयांची, गव्हाची, गव्ह्ल्यांची, साबुदाण्यांची, दुधीची, सोजी तर इतर अनेक प्रांतात ही खिरीचे विविध प्रकार बनवले जातात जसे बंगालमध्ये पनीरची खीर म्हणजे छेनार पायेश, पायेश, गुरेर पायेश (खजुराचा गुळ घालून), कमलालेबु खीर (संत्र्याची) खीर. दक्षिणेकडे ही खिरीचे अनेक प्रकार आहेत, पायसम / पायसा असे खिरीला म्हणतात.

तंबिटाचे लाडू

लेखक रेवती यांनी गुरुवार, 15/10/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकार १ साहित्य - दीडशे ग्रॅम सुवासिक तांदूळ, तांदळाच्या पाऊणपट गूळ, एक चमचा तूप, पाच ते सहा वेलदोडे, एक टेबलस्पून तीळ, एक टेस्पू सुक्या खोबर्‍याचा कीस, अर्धा टेबलस्पून खसखस. कृती - या लाडूसाठी तांदूळपिठी तयार करून घ्यावी लागते. सुवासिक तांदूळ कढईत गुलाबी रंगावर भाजून घ्यावेत. मग ते गरम असतानाच बुडतील एवढ्या गार पाण्यात भिजवून ठेवावेत. दहा मिनिटांनी चमच्याने हलवून पाणी ओतून द्यावे व तांदूळ सावलीत एका स्वच्छ कापडावर पसरून ठेवावेत. तीन ते चार तासात ते साधारण सुकतील. अगदी किंचित दमट असायला हवेत. आता त्याची मिक्सरमध्ये वस्त्रगाळ पूड करून घ्यावी. कण्या राहता कामा नयेत.

पराठे, पोळ्या, वडे वगैरे वगैरे

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 15/10/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
भरलेल्या ताटात पोळी पुरी भाकरी यातलं काहीतरी हवंच. शिवाय निरनिराळ्या सणांना बनवल्या जाणार्‍या स्पेशल पोळ्या वेगळ्याच. या लेखात भरल्या ताटातली मानाची जागा असणार्‍या या पदार्थांचे काही प्रकार बघू. १. पालक - कोबी पराठा साहित्यः कोबी - दीड कप (किसून) पालक - १ कप (बारीक चिरून) बेसन पीठ - ३ चमचे गव्हाचे पीठ - १ कप ओवा - १/२ चमचा आले लसूण पेस्ट - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा हळद - १/२ चमचा तेल - २-३ चमचे मीठ चवीनुसार बटर किंवा तूप - भाजण्यासाठी कॄती: १. एका बाऊल मध्ये किसलेला कोबी, बारीक चिरलेला पालक घ्यावा.