गो केकू गो! -२
“मुरुगन, यू देअर? ऐक तुझ्यासाठी काम आहे. प्लान असा आहे, मुंबई वरून अमेरिका, अमेरिकेतून दुबई, दुबईतून इराक, इराक मधून उझबेकिस्तान. तिकडून अफगाणिस्तान नंतर आउटर मंगोलिया, मधेच एक वेळ ऑस्ट्रेलिया, पुन्हा अफगाणिस्तान...”
एव्हढे आढेवेढे, एव्हढा द्राविडी प्राणायाम. ग्रेमॅनचे प्लानिंग हे असं असतं.
केकूही आता शिकलाय. किराणा भुसार दुकानात तो हेच डावपेच वापरतो. आधी हवा पाण्याच्या गप्पा. नंतर लक्स, पार्ले-जी, शाम्पूचे सशे अशी सटर फटर स्टेशन घेत गाडी एकदम बासमती तांदुळावर, “बासमती काय भाव?” दुकानदार चमकून खरा भाव बोलून जातो. असो.
“ते समजलं. शेवटी कुठे जायचं ते बोला.”
“ओके, शेवटी पाकिस्तान.
कथेला नाव सुचवा
बऱ्याच दिवसांनी टेकडीवर मॉर्निंग वॉक ला आलो होतो. थोडी चढण मग थोडीफार सपाटी, पुन्हा चढण आणि वर पठार. पठारावर तास भर चाललं कि घरच्या वाटेला लागणं हा कोव्हीड आधीचा नित्यक्रम होता. कोव्हीड मध्ये व्हेंटिलेटर वरून सुखरूप आलोय. अजूनही काही त्रास आहेत असे वाटते. आधीचा तोच स्टॅमिना परत कमावण्यासाठी टेकडीवरचा मॉर्निंग वॉक पुन्हा सुरु केला.
लोकसहभागातून आधीची माळरान टेकडी भरपूर झाडे लावून फुलवलेली दिसली. लौकर उगवणारी, मोठी होणारी बरीच झाडं नजरेस पडली. निरनिराळे पक्षी त्यांचे मनमोहक आवाज सारं काही सुखावणारं होतं. टेकडीवर, टप्या टप्यावर ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवलेल्या दिसल्या.
ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे (ऐसी अक्षरे... मेळवीन -१२)
सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात.
गो केकू गो! -१
गो केकू गो!
“रावडी केशव कुलकर्णी(केकू)”
Fully Configured.
Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session.
ID No. ID zx 120 2792023 T=00
“Go Keku. Go.”
बत्तीसगडचा राजवाडा. राजकुंवर केशव कोचावर पहुडले आहेत. पायाशी एक क्लास वन दासी केशवच्या पायाच्या नखांना पॉलिश करून “सर” आणत आहे. केशव विचार करतोय. काल रात्री तर हीच होती ना. हीचं नाव काय बरं असावं? काही का असेना. दिसायला काही वाईट नव्हती. गोरा पान रंग. चाफेकळी अपरं नाक. कुरळे कुरळे काळे भोर लांबसडक केस.
पण केशव अफाट बोअर्ड. सुंदर सुंदर ललना ही नेहमीची गोष्ट झाली होती.
मोदक-२
मोदक!
मोदक -१
मोद-आनंद करणार्याला तर देतो ते दुसर्यांना वाटून आणखीन आनंद वाढवायचे कारणही देतो.यंदाचे काही मोदक.
•रवा आणि खवा दोन्ही स्वतंत्र तुपात भाजून,नंतर गुळ खोबरे सुकामेवा खसखस वापरून बनवलेले
------बदाम मोदक
------पिकलेल्या केळ्याचे मोदक

पीए नामा: किस्सा ए साक्षर अशिक्षिताचा
(काल्पनिक किस्सा)
हा दहा बारा वर्षांपूर्वीचा किस्सा. आपल्या देशात बी.टेक + एमबीए केल्यावर ही जर केम्पस सिलेक्शन झाले नाही, तर उत्तम पगाराची नौकरी मिळणे अवघड. याशिवाय सप्लाय ही डिमांड पेक्षा भरपूर जास्त आहे. अधिकांश तरुणांना कमी पगारावर नौकरी करावी लागते. त्याने कमी पगाराची नौकरी करण्यापेक्षा जास्त पगाराच्या सरकारी नौकरीसाठी तैयारी सुरू केली आणि त्याला सरकारी नोकरी लागली. त्याच्या सेक्शन मध्ये साहजिकच तो सर्वात जास्त साक्षर होता. सेक्शन ऑफिसर ही त्याच्या पेक्षा कमी साक्षर होता. सेक्शन मधल्या समस्यांचे समाधान करत कार्य करणे/कर्मचाऱ्यांकडून करवून हे सेक्शन ऑफिसरचे दायित्व असते.
श्रीगणेश लेखमाला २०२३ - भिंतीवरील चेहरा
भिंतीवरील चेहरा
रात्रीची जेवणंखाणं उरकून गावातली तमाम मंडळी त्यांच्या नेहमीच्या पारावर येऊन गप्पा मारत बसली होती. आदल्याच दिवशी झालेल्या अमावास्येमुळे विषय अर्थातच भुताखेतांवर न गेला, तरंच नवल होतं. अज्याने त्याच्या मामाने पाहिलेल्या भुताचा काहीतरी एक किस्सा सांगितला, तर सच्याने त्याच्या आजीची गोष्ट सांगितली. तिला एका अमावास्येच्या रात्री विहिरीत उडी टाकून गेलेली त्यांच्या गावची पाटलीण दिसली होती.
असं प्रत्येकाचं काही ना काही सांगून झालं होतं. त्यामुळे गप्पांचा जोर कमी होत आला होता. तसं राजूचं लक्ष पाराच्या पलीकडे एका दगडावर बसलेल्या माणसाकडे गेलं. गडी गावचा नाही, हे सहज लक्षात येत होतं.
हे वाचा: बगळा
वेलणकर चाफा
नमस्कार मंडळी
माझ्या अनेक आवडींपैकी एक म्हणजे बागकाम. त्यासाठी नेहमी वेळ मिळत नसला तरी सकाळचा चहा घेउन गॅलरीत झोपाळ्यावर बसणे आणि मेहनतीने लावलेल्या बागेतील झाडांची विचारपूस करणे ईतके तरी मी करतोच. कधीतरी विकांताला सगळी हत्यारे परजून कुठेतरी खुरपणे, खते देणे, दोर्या बांधुन वेल वर चढवणे , बांबूच्या कामट्या खुपसुन आधार देणे, कुंड्या बदलणे असे काहीतरी चालु असते. मग गॅलरी मातीने माखली की घरच्यांचा रोष होण्याच्या आत गॅलरी धुणे हेही त्यात आलेच. अर्थात माझे हात माखलेले असल्याने त्यातही मला मदतीला बायको लागतेच.
मिसळपाव