Skip to main content

शेवग्याचे सार

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 24/01/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
शेवग्याच्या शेंगाना डांबेही म्हणतात. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करतात.

खाद्ययात्रा कल्याणची!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 24/01/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.

बर्‍याच दिवसांनी मागच्या आठवड्यात कल्याणला गेलो होतो. थोडी घरची कामे, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि असेच कायकाय मनात होते. सकाळीच पोचलो आणि घरी पोचायच्या आधीच भुकेची जाणीव झाली. आता ईतक्या सकाळी काय बरे खावे? बरं दुपारी एका ठिकाणी जेवायचे आमंत्रण होते, त्यामुळे फार जास्त खाउन चालणार नव्ह्ते. पाय आपोआप पारनाक्यावर ताम्हणकर यांच्या श्री उपहारगृहात वळले. खरेतर तिथे बसायलाही फार जागा नाहिये, पण तिकडे वर्षानुवर्षे मिळणार्‍या एकाच खास चवीच्या ओल्या नारळाच्या कचोर्‍या खाण्यासाठी खवैय्यांची गर्दी असते.