Skip to main content

द्रौपदी वस्त्र हरण

लेखक साहना यांनी रविवार, 27/03/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही.

सुधागड - एक 'नाईट ट्रेक'

लेखक हकु यांनी रविवार, 27/03/2016 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : खालील लेख हे एक स्वानुभव कथन आहे. यात कुठलीही कल्पनारम्यता नाही. सर्वसाधारणपणे रात्रीच्या चांदण्यात गड चढून पार करणे ही night ट्रेक ची व्याख्या. आजवरच्या मी केलेल्या इतक्या ट्रेक्स पैकी फक्त २ च वेळा हा असा योग माझ्या वाट्याला आला. पहिला म्हणजे २००४ साली केलेला माहुली आणि त्यानंतर दहा-साडेदहा वर्षांनी केलेला हा सुधागड. पण या ट्रेक ला नाईट ट्रेक म्हणण्यासाठी हे एकच कारण पुरेसं नव्हतं. जितक्या ठळक घटना या ट्रेक मध्ये घडल्या होत्या त्या सर्वांची साक्षीदार होती ती म्हणजे 'रात्र'! आणि म्हणून त्याही अर्थाने घडलेला हा एक नाईट ट्रेक.

चोरी

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 27/03/2016 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
उंच टेकडीवरचे जुनाट दगडी मंदिर. सीमेंट च्या रस्त्याने मंदिराच्या टेकड़ीला गोल चक्कर घातलेली. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट झाडी आणि नंतर तब्बल दहा फूटी भिंतीचे कुंपन. आत जायला दोन मोठाली प्रवेश द्वार. एका प्रवेशद्वाराला खेटुनच असलेल्या सिसाच्या डेरेदार झाडाखाली म्हातारी आणि तिचा नातु गोधड़ीवर लोळत पडलेली. "ये आजे! उथ ना! मया लय भुत लादली" पेंगुळलेल्या आजीला त्यानं दोनदा हलवलं पण तिना काहीच प्रतिसाद दिला नाही. मग तो झाडाच्या सावलीतून बाहेर आला. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या कठड्यावर उभा राहुन त्यानं मंदिराच्या पायऱ्याकड़े बघितले. लोकांची वर्दळ वाढलेली.

कुंजविहारी हसे का मनी -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/03/2016 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
कुंजविहारी हसे का मनी - निद्राधीन ती राधा बघुनी नयनी उतरे शाममुरारी हळूच नकळत स्वप्न होऊनी स्वप्नामधली राधा बावरी गेली सगळे सत्य समजुनी हसे खुदुखुदू झोपेमधुनी खट्याळ कृष्णाची मोहिनी देशी रे किती त्रास तू मजला वदते राधा जात मोहुनी मोरपीस मग अलगद गाली कान्हा हसतो लबाड फिरवुनी खोड्या वाढता म्हणते राधा जा तू आता निघून येथुनी स्वर राधेला गोड ऐकवी मुरलीधर हळु पावा काढुनी नयने उघडी राधा अपुली मधुर सूर ते पडता कानी आत्ता होता कुठे कन्हैया शोधत हसते घरभर फिरुनी लबाड आणि खट्याळ लीला आठवे राधा स्वप्नी रंगुनी .. . http://mee-videsh.blogspot.in/
काव्यरस

पेट्रोल

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 26/03/2016 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्तू भिजवे, आपलं नाव, का इचारलं? काय काम हाय?" मी त्या हवालदाराच्या डोळ्यात राग ओततच बोललो. तो शुंभासारखा माझ्याकडे बघतच राहिला. मग जरा जवळ येऊन त्यानं तोंडाचा वास घेतला. "ये चल रे, येडं दिसतय कोणतर" किक मारत फटफटीवरचा खाकीतला दुसरा माणूस म्हणाला. "मुस्काड फोडीन, कुठं गेलता येवढ्या रात्रीचं?" आता मात्र यानं हातंच उगारला होता. मी छाताड उघडं टाकून त्याच्यापुढं ताठ उभा होतो. " पिच्चर बघायला गेलतो " यावेळी मी ठरलेलं उत्तर दिलं, तेही खालच्या आवाजात.

हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शनिवार, 26/03/2016 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
1 . --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)

मागील पानावरून ............ चादर ट्रेक तसं पाहिला गेला तर १०० किलोमीटर पेक्षा लांब आहे. पदुम पर्यंत येउन जाउन २०० किलोमीटर पेक्षा जास्त होतं.

हार नही जीत नही जहा प्यार है...

लेखक मराठी कथालेखक यांनी शनिवार, 26/03/2016 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
एका सत्यकथेचा काल्पनिक उत्तरार्ध ट्रेन येण्याची वेळ झालीच होती. आळस झटकत अनिल तयारीत उभा राहिला. आजूबाजूला नजर टाकत असतानाच मोठाली बॅग संभाळत येत असलेल्या त्या स्त्रीकडे त्याची नजर गेली. तिचंही त्याच्याकडे लक्ष गेल आणि नजरभेट झाली. काही क्षण दोघे थबकले. नंतर स्वतःला सावरत त्याच्या बाजूने निघून ती पुढे गेली आणि काही अंतरावरच उभी राहिली. अनिलला क्षणभर काही सुचलं नाही , त्याने अस्वस्थ होवून पुन्हा एकदा तिच्या दिशेनं पाहिलं. शंकेला काही वाव नव्ह्ताच ..निशा.. हो, निशाच होती ती.

बडबड गीत - पंखा मेरा दोस्त

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 26/03/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमची छकुली आता ४० दिवसाची झाली. आजकाल तिला नवीन छंद लागला आहे. पंखा सुरु झाला कि ति पंख्याकडे पहात राहते, उगाचच आपल्या मनात हसते. कडे वर घेतले तरी तिच्या नजरा पंख्यावारच टिकलेल्या असतात. पंख बंद करताच तिचा सायरन सुरु होतो. झक मारून पुन्हा पंखा सुरु करावा लागतो. कधी कधी विचार येतो पंख्याला पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील. पंखा मेरा दोस्त पण बोलतच नहीं. फिरू फिरू करतो घुमू घुमू करतो घूं घूं करूत तो नुसताच फिरतो. हातवारे करते किती स्माईली-स्माईली देते गाढव लेकाला पण काही कळतच नाही. मला पाहून तो हसतच नाही. पंखा मेरा दोस्त पण बोलतच नाही.

बोट - अग्निशमन (Fire Fighting)

लेखक स्वीट टॉकर यांनी शनिवार, 26/03/2016 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही. भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization) खूप असतं. असायला हवं देखील.

जंजिऱ्या

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शनिवार, 26/03/2016 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
जंगली तो सिद्दी , तुझा अधिपति होतो मालक होऊन तुझा , सागरी स्वार होतो माजलेला सिद्दी , जेव्हा किनार्यावर येतो त्रास देऊन जनतेला , सारं लुटुन नेतो याच त्रासातून सूटका व्हावी शिवाजी राजा इर्षा धरतो तेव्हाच सिद्दीला साथ देऊन जंजिऱ्या , अजिंक्यतेचा गर्व तू करतो राजा आमचा चालून येतो , सिद्दी तुझा आसरा घेतो कुशीत तुझ्या शिरून जातो , आक्रमनाने बेजार होतो माघार घेता घेता , मध्येच कुणी पुढे येतो ताब्यात घेऊन तुला , मालिक तुझा होतो हतबल झालेला हां सिद्दी मग बादशहाकडे आर्जव करतो बादशहाचा मांडलिक होऊन जंजिऱ्या , अजिंक्यतेचा गर्व तू करतो शह देण्यासाठी , राजा पदमदुर्ग उभारी राजपुरीच्या उरावर , द