ती विलासींनी मदालसा,
ती विलासीने मदालसा,मिठीत कैद होती
अनंग कथा ऐकण्यात, ति जरा गुंग झाली असावी
चुंबीत अधर लाल,लागता हात उरोजास
कोवळी लावण्य कळी ,ती जरा लाजली असावी
घुसता आरपार तो मदन शर हृदयात
रतीसम सुंदरी ,ती जरा घायाळ झाली असावी
कुरवाळीता ,त्या मोकळ्या रेशीम कुंतलास
त्या काम गंधाने, ती जरा बेभान झाली असावी
मधाळ हसून,टाकता कटाक्ष त्या दर्पणात
तो भंगला पाहून,ती जरा चकित झाली असावी
अर्पीता कोवळी कोरी तनू, ह्या पौरुषाला
ती कोमलांगी ,पौरुषा पुढे हरली असावी
Avinash
एक संवाद
" अरे भाई काय मग कस काय ? दिसला नाय दोन दिवस ? "
" काय नाय रे ते जरा दोन दिवस जेलमध्ये होतो ."
" का भाई ? तुमाला आणि जेलमध्ये ? अस काय केल तुम्ही ? "
" अरे काय नाय रे जरा भुक लागली होती आणि दुधाच पातेल कट्ट्यावरच होत . मग काय घातल तोंड आणि पित होतो . आणि मी काय सगळं संपवणार नव्हतो काय त्याला ठेवणार होतो ना . पण नाय साला कायतरी फेकून मारल डायरेक्ट पेकाटातच बसल ना आणि पाठीमागून वार केला ना . हिंमत आहे तर समोरून करायचा ना वार मग सांगितलं असत अपुन काय चीज आहे ते . चांगल बोचकारल असत आणि चावलो पण असतो . मग फिरत बसला असता इंजक्शन शोधत .
माझी जंगलची सैर
काल घरी काहीच काम नव्हत, म्हणुन म्हटल चला आज जंगलात फिरुन येऊ, सोबत माझा मित्र अमित पण होता. आम्ही बाईक वरुन जंगलात जायला निघालो तसा जंगलात जाणारा रस्ता हा काही एवढा खास नव्हता पण बैलगाड्यांच्या जाण्यायेण्याने बऱ्यापैकी गाढ रस्ता तयार झाला होता.
बंधाऱ्याच्या पिचींग वरुन जातांना खाली बघतांना खुप मस्त वाटत होत. बंधाऱ्यात थोडसच पाणी होत . काही मुले त्यात मासे पकडत होते. काही पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते.,
आमच्या गावाकडच्या जंगलात रानातील आंबे खायला खुप मजा येते.
भरतपूर : पक्षांचा स्वर्ग दरबार
फार पहाटही नव्हती सकाळची साडे आठ पाऊणे नऊची वेळ.शेवटचा डबा प्लॅटफॉर्मला टेकला आणि गाडी स्तब्ध झाली.इतकावेळ दारात ठेवलेले सामान खाली ठेवले.उघडे अवयव गारठतील एवढी थंडी नक्कीच होती.धुक्यामुळे स्टेशनची पाटी धुसर दिसत होती.फलाटावर पाय ठेवला आणि गाडीने स्टेशन सोडले.
राजस्थानात असलेले 'ब्रज' प्रदेशातील शहर 'भरतपूर'.स्टेशन मधून बाहेर येताना घोंगडी,स्वेटर इत्यादी वस्त्र लपेटून सोडायला किव्वा घ्यायला आलेली मंडळी,झोपलेले भिकारी,आमच्यासारखे उतरलेले किवा काही चढणारे प्रवासी,४/५ स्टेशन झाडणारे सफाई कर्मचारी,द्रोणामध्ये वडापाव विकणारे २/३ छोटे ठेलेवाले आणि प्रवाशांना इष्ट स्थळी पोहोचवण्यासाठी स्पर्धा करणार
चलती का नाम…पॉम पॉम
"चला रे लवकर…अकरा वाजून गेलेत…बारा पर्यंत पोहोचायचंय ना…त्यात traffic असणार…म्हणजे अजून वेळ लागणार…आवरा आता…" नवऱ्याची ही नेहमीची घाई माझ्या अंगवळणी पडलेली. "अरे जेवायलाच जायचंय ना xxx च्या घरी… पोहोचलो १०-१५ मिनिटं उशीरा तर एवढं काय…मुलांचं आवरून निघेपर्यंत इतके तर वाजणारच ना…त्यात आज रविवार….सकाळी उठण्यापासून सगळ्यांचं सगळंच निवांत…आणि त्यांना पण कुकायला जरा वेळ मिळू दे की…" खांद्याला मोठी bag लटकवून लेकाला कडेवर घेवून पायात शूज अडकवत माझा जरा चिडकाच स्वर लागला.
तलत महमूद- ‘आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’
तलत महमूद ची आठवण....
‘ये तो नहीं कि तुमसा जहां में हसीं नहीं, इस दिल का क्या करूं जो बहलता नहीं कहीं...
कहता हूं इस दिल से और हसीं ढूंढिए कोई, आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’
तलत महमूद नी म्हटलेली दाग ची ही गझल स्वत: तलतच्या बाबतीत देखील खरी ठरते. तलत एकमेवाद्वितीय होता. याचा प्रत्यय त्याची गीते असलेले चित्रपट बघतांना पुन्हां आला.
सर्वेक्षणातून काय दिसलं : पॉर्न बघण्याबद्दल लोकांची मतंमतांतरं
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ही बंदी लागू होण्याआधीच, निर्णय घेतल्यावर काही दिवसांत तो मागेही घेतला. त्या निमित्ताने पॉर्न म्हणजे नक्की काय, ते कशासाठी, ते चांगलं आहे का वाईट, याबद्दल सोशल मिडियामध्ये चर्चा झालेली दिसली. अनेक मुद्द्यांप्रमाणे या प्रश्नाबद्दलही काळं किंवा पांढरं अशीच भूमिका घेतलेली दिसली. पॉर्न विरोधकांची भूमिका साधारणतः पॉर्नमुळे वेगवेगळ्या प्रकारची आणि प्रचंड हानी होते अशी भूमिका.राजमाची : उन सावल्यांचा खेळ आणि काजवे
नेट वरती राजमाची वरील काजव्यांचे फोटो बघून डोळ्यापुढे काजवेच चमकले. म्हणून कालच (२९ मे ) ला राजमाची ला जायचा प्लान तयार केला. नेट वरून कळाले कि, मुंबई ट्रेकरचा पण एक ग्रुप २९ मे लाच येणार होता. त्यामुळे या दिवशी काजवे दिसणार अशी आशा बळावली. कारण हे लोक अभ्यास आणि माहिती गोळा करूनच येत असतात. तसेच गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पाऊन पडण्याची शक्यता होती. असे वातावरण काजवे दिसण्यासाठी आदर्श असते.
पुण्याहून दुपारी ३ ला निघालो. ४ पर्यंत लोणावळ्याला पोहोचलो. तिथे एकाला विचारले कि, राजमाचीला रस्ता कुठून जातो. तर त्याने सांगितले कि, तुम्ही तुंगार्ली वरून जाऊ नका. रस्ता खूप खराब आहे.
घर क्रमांक – १३/८ भाग -१
घर क्रमांक – १३/८
माझा एक मित्र परवाच मला भेटला आणि म्हणाला,
‘‘तुला एक गंमत सांगतो. आम्ही मधे एक झपाटलेले घर पाहिले. इथे पुण्यात !’’ तो माझी चेष्टा करतोय का खरंच सांगतोय हे माझ्या लक्षात येईना. माझा हा मित्र बऱ्यापैकी नावाजलेला शास्त्रज्ञ आहे. मी त्याला डॉ. म्हणूनच हाका मारतो.
‘‘काय म्हणालास ? झपाटलेले ? कोणी भुताने का ? ’’ मी त्याला विचारले.
‘‘हंऽऽऽ मी ते सांगू शकणार नाही. मी फक्त तुला काय झाले ते सांगू शकतो.’’
‘‘ मागच्या महिन्यात मी व माझी बायको नवीन घराच्या शोधात होतो. अर्थात भाड्याच्या. आम्हाला फर्निचर असलेले घर पाहिजे होते.
मिसळपाव