Skip to main content

कोपनहेगन - पॅरिस भटकंती -१

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 18/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
युरोप! कधी आपण युरोपात जाऊ असं वाटलंही नव्हतं, मिपा, माबो अश्या साईट्सवर जाऊन आलेल्यांचे अनूभव ऐकणे ह्यापलिकडे कधी युरोपशी संबंधं आला नव्हता. बैलपोळ्याच्या दिवशी बैलासारखं काम करून आल्यावर रूमवर पडलो होतो. मोबाईल हातात धरला नी वाट्सअप पाहीलं “I have enrolled you for ***** advanced training in Denmark in November” बाॅसचा मॅसेज होता. काय?? डेन्मार्क?? माझा विश्वास बसला नाही. पण बाॅसलोक अश्या चेष्टा करत नाहीत. मला विश्वासच बसेना. आपण डेन्मार्कला जाणार. ज्या युरोपच्या सुरस नी चमत्कारीक कथा फक्त ऐकायला मिळतात त्या प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून भयानक आनंदं झाला.

चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था

लेखक रम्या यांनी बुधवार, 17/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
रंगराव पाटील, जगन्नाथ कांबळे आणि मधुकर देशपांडे तिघंही सोसायटी ऑफिस मधील विसपंचवीस रिकाम्या खुर्च्यांकडे बघत बसले होते. अधूनमधून घड्याळाकडे नजर टाकत होते. तासभर होऊन गेला होता. बसून बसून बुडाला मुंग्या आल्या होत्या आणि उठायची तर सोयच नव्हती. जरा खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला की देशपांडे डोळे मोठे करून बघत. 'खबरदार, जागेवरून उठलात तर!' असा त्याचा सरळ अर्थ होता. वेळ सरत नव्हती, खुर्च्या भरत नव्हत्या. देशपांडे उठू देत नव्हते आणि मुंग्या बसू देत नव्हत्या. देशपांडे तर प्रचंड संतापले होते. आणि का संतापू नये?

उनाडलं मन... एक नवी सुरवात.

लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 17/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
कविता लिहायच्या, आपणच खर्च करून कवितासंग्रह काढायचा आणि पुस्तकाच्या दुकानात पुस्तक विकायला ठेवा म्हणून विचारायला गेलं तर “कवितेची पुस्तक कुणी घेत नाहीत म्हणून,” उत्तर मिळणार, मग आपली पुस्तकं आपणच लोकपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा. काही जण विकत घेतातही काही अशीच. ज्यांना आपण पुस्तक देतो ते तरी वाचतात की नाही हा प्रश्न? जर लोकं आपल्या कविता वाचणार नसतील तर का लिहायच्या कविता? हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात घोळत होता, त्यापेक्षा आपण गद्यलेखन केलेलं बरं. गद्यलेखन जरा बऱ्यापैकी लिहीत होतो, लोकांना आवडत ही होतं.

हरीश्चंद्रगड-पाचनई मार्गे

लेखक Bhakti यांनी सोमवार, 15/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
३१ डिसेंबरला हरिश्चंद्रगडला जायचं होत पण त्यादिवशी त्यावर मनाई सरकारकडून झाली.परत ट्रेक कैम्प कडून १४ जानेवारीला हा ट्रेक होणार होता ,मग जायचं ठरलच.ट्रेकला डॉक्टर,अधिकारी,बँकर,पत्रकार पासून विद्यार्थी सर्व वयोगटातले मंडळी होती.सागर आणि प्रियांका ट्रेक लीड करणार होते. या आधी सोपे सिंहगड ,शिवनेरी,रायरेश्वर ,केंजळगड केले होते.पण हरिश्चंद्रगड ‘भटक्यांची पंढरी’ का मनाला जातो ते या ट्रकने उमगले.रात्री ११ ला नगरहून निघालो ,रात्रीचा प्रवास झोप लागलीच कोतुळच्या अलीकडे जाग आली कुट्ट अंधार आणि खिडकीतून पाहिलं तर आकाशातला सप्तर्षी बरोबर येत होता(किंवा कदाचित सप्तर्षीच ओळखता येत असल्याने खच्च भरलेल्या चा

सात वारांची भारतीय पद्धती

लेखक निनाद यांनी सोमवार, 15/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.) तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.