Skip to main content

मंत्रिमंडळे - शैक्षणिक मिक्स अँड मॅच की मिसमॅच ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 06/07/2016 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात चिकित्सा सद्य केंद्रीय भाजपा मंत्रिमंडळाची केली असली तरी आधिच्या इतर पक्षीय सरकारांमध्ये अथवा कोणत्याही पक्षीय राज्यसरकारांमध्ये वेगळी स्थिती होती/असते असे नसावे पण तो वेगळ्या अभ्यासाचा विषय असावा. तुर्तास सद्य मंत्रिमंडळाची चर्चा. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या निवड आणि नेमणूका राजकीय हेतु डोळ्या समोर ठेऊन होतात, विशिष्ट मंत्रालयांसाठी अथवा कारभारासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञच अथवा अनुभवी असावेत असे नाही, एखाद्या पक्षास / पंतप्रधानास नव्याने अथवा बऱ्याच वर्षांनतर जनतेचा कौल मिळतो कुणाला मंत्रि करावे हा त्यांचा अधिकार आहेच त्या बाबत दुमत नाही.

अकुंच्या - पकुंच्या ....

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 05/07/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे, तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना. काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला. च् च् च् करत तिला दोन्ही हातानी वर उचलले, तिच्या नाकाला आपले नाक रगडले. हा तिचा आवडता खेळ.

एक संघ मैदानातला - भाग १६

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 05/07/2016 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरला ८ ने मारून गटातून विजयी म्हणून बाहेर पडलो त्यामुळे जरा मस्त वाटत होत, पण त्याचबरोबर दीप्ती आणि दादा अजूनही येताना दिसत नव्हते म्हणून काळजी वाटत होती. सोलापूरला काढू शकू असा विश्वास असल्यामुळे दिप्तीला आज आराम द्यायचा असं आम्ही ठरवलं आणि चहा घेण्यासाठी म्हणून स्टेडियम मधून बाहेर आलो. काल घरी फोन लागला नव्हता म्हणून चहानंतर घरी फोन करायचा असं ठरवलं. चहा घेतानाच लांबून दादा आणि दीप्ती दिसले. तिच्या हाताला बँडेज वैगरे नव्हतं. अंकूने दोघांना चहासाठी टपरीवर आणलं. " वाचली रे पोरगी.. " " म्हणजे ? काय झालं ?" " अगं.. म्हणजे मोठी इंज्युरी नाहीये... मला वाटलं प्लास्टर वैगरे होतंय की काय...

सॉफिस्टीकेटेड

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 05/07/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सॉफिस्टीकेटेड ही दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी दादर पश्चिमला कॅमेरा दुरुस्तीसाठी गेलो होतो. तेथे प्लाझा सिनेमासमोर तृप्ती म्हणून एक उत्तम हॉटेल आहे. याचे मालक श्री भागवत हे आमचे तसे दूरचे नातेवाईक आहेत. परंतु ते सर्व कुटुंब आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत. तृप्ती हॉटेल हे राजेंद्र आणि श्रीरंग हे दोन चुलत भाऊ चालवतात. ती जागा त्यांची वडिलोपार्जित असून त्याचा त्यांनी अतिशय सदुपयोग केला आहे. मी त्या हॉटेलच्या समोरून चाललो असतात श्री राजेंद्र भागवत बाहेर उभे होते. ते आमच्या कडून पैसे घेते नाहीत आणि कुणाकडून काहीही फुकट घेऊ नये ही आमची घरची शिकवण.

काजूकतलीची गोष्ट

लेखक हृषिकेश पांडकर यांनी मंगळवार, 05/07/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
सहामाही परीक्षांचे निकाल जे लागायचे ते लागून गेले होते.शाळेतील आणि घरातील वातावरण आता निवळले होते.प्रगती पुस्तकावर पालकांची सही करून पुन्हा ती शाळेत पोहोचली होती.थोडक्यात काय तर सहली,स्पोर्ट्स आणि स्नेहसंमेलन सुरू होण्याअगोदर असलेला विसावा आम्ही अनुभवत होतो.ऑक्टोबरचा शेवट असल्याने शाळेचे स्वेटर घालायचे दिवस चालू होते.शनिवारी असलेली सकाळची शाळा नकोशी झाली होती.अर्थात शाळा नकोशी होण्यापेक्षाही सकाळचे उठणे असह्य होत होते.कारण शाळा नकोशी व्हावी अशी वेळच कधी आयुष्यात आली नव्हती. सातवीत होतो त्यामुळे अजूनही हाफ चड्डीचा गणवेश होता.पुढच्या इयत्तेपासून म्हणजे आठवीपासून पूर्ण चड्डी असायची.सक

ग्रीर गारसन-तिने ग्रेगरी पैक सोबत लग्नाला नकार दिला होता

लेखक महामाया यांनी मंगळवार, 05/07/2016 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अाठवणीतला हॉलीवुड/ पाच-ग्रीर गारसनची स्पष्टवादिता मिस्ट्रेस म्हणून नायिका कामावर रूजू होते, आपल्या स्वभावाने ती घरच्या मंडळींचं मन जिंकून घेते. नायकाचं तिच्यावर प्रेम जडतं व ‘ती’ चक्क त्या घराची गृह स्वामिनी होते. सुखान्त असलेल्या या विषयावर बरेच हिंदी चित्रपट आले, येताहेत.

मोसाद - भाग १२

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 04/07/2016 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मोसाद - भाग ११ मोसाद - भाग १२ १५ नोव्हेंबर १९७१. वेळ – रात्री साधारण १० वाजता. भूमध्य समुद्रात वादळ चालू होतं. मुसळधार पाउस पडत होता आणि एक इझरेली मिसाईल बोट अगदी धीम्या गतीने सीरियन किनाऱ्याच्या दिशेने चालली होती. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून बोट सीरियन हद्दीत शिरली. त्याच्याआधी बोटीवरचे सगळे दिवे मालवले गेले. सीरियाच्या लाताकिया बंदराला वळसा घालून बोट पुढे गेली आणि उत्तरेकडे वळली.

राँग नंबर (पार्ट -२)

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
भेंडी,आजची रात्र पण अशीच जाणार. सालं, मागच्या वर्षी पर्यंत ठीक होते पण, आता ह्यापुढे दरवर्षी हा दिवस त्रासदायकच ठरणार.इतर लोक आपापले वाढदिवस साजरे करत असतांना, आपण मात्र दरवर्षी ह्या दिवशी असेच कुढत बसणार. मागच्या वर्षी ह्याच रात्री, ती बिंधास्त पणे आपल्या बॉइज होस्टेल वर आली होती.येतांना पण एकटी नाही, फूल्ल तिच्या गँग समवेत.तिचा बाप तसा आमच्याकडे शेत मजूरच आणि गावच्या प्रथे प्रमाणे त्यांचे घर पण गावा बाहेरच. जन्मापासुनच ती आणि मी एकत्रच.अगदी बालवाडी ते शाळे पर्यंत.सुरुवाती पासूनच ती एकदम बिंधास्त अगदी आमच्या जातीत शोभेल अशी.धमाल करता-करता, मी पटकन तिला प्रपोज केले. आई शप्पथ कसली लाजली ती.

मागे वळून पाहताना .. काल आज उद्या

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 04/07/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=ameDmBSPciM&t=4332s इथे घमासान चर्चा झाली. चर्चेत सहभागी असलेले बहुतेक लोक... मुंबईकर आहेत आणि त्यांची वयं पाहता त्यांनी बाळासाहेबांची वाटचाल जाणत्या वयात पाहीलेली आहे. चर्चेत अनेक मुद्दे आले. सेनेने सुरुवातीला मराठीचा मुद्दा हातात घेतला. तो मुंबईत मराठी माणसाला अपील झाला. लोकांना बाळासाहेबामधे आपला कुणी तारणहार दिसू लागला.. पुढे १९९३ ची दंगल.