Skip to main content

फ्रेंच राज्यक्रांती - नवीन पुस्तक

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नवीन पुस्तकाबद्दल लिहिताना जरा मनात धाकधुकच आहे, परंतु एका पुस्तकाबरोबर एक पुस्तक भेट म्हणून देणार असल्यामुळे मिपाचे सदस्यांना हे सांगावे म्हणून लिहित आहे. अर्थात पुस्तकाबद्दल माहिती सांगावी हा मुख्य उद्देश नाकारता येत नाही. image host नमस्कार! वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, सांगण्यास आनंद वाटतोय, की फ्रेंच राज्यक्रांती हे पुस्तक छापून हाती आले आहे. एकूण पाने ५३३ झाली आहेत. किंमत आहे. रु.

पाकिस्तान-५

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शुक्रवार, 23/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले. पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर पहील्या दशकापर्यंत प्रजासत्ताक झाला नव्हता, आणि ब्रिटिश अधिराज्याचा भाग होता. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानची महाराणी एलिझाबेथ होती जशी ओस्ट्रेलिया नी कॅनडाची होती. पाकिस्तानात गव्हर्नर जनरल आणि पंतप्रधान होते, पण राष्ट्रपती नव्हते. त्यातही सत्तेचा विचित्र हिशोब होता.

सोम्या बाबा.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 23/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती. "हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं. "रुसलाय," आई म्हणाली. "कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला. "त्याला गाय हवेय," आई म्हणाली. "काय बाई आक्रितच?" "गप शाळेत जाऊन अभ्यास करायचा सोडून गुरं सांभाळायची आहेत," संज्याची आई माझ्याजवळ येत म्हणाली. मी तोंड दुसऱ्या दिशेला फिरवून तसाच झोपून राहिलो. "जेवलाय पण नाय," आई म्हणाली. "काय? ये चल उठ, असं जेवणावर रुसतात व्हय?

गूढ कथा: अक्कल दाढ

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 23/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक कथा) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.

अपहरण - भाग ३

लेखक स्मिताके यांनी बुधवार, 21/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ - https://misalpav.com/node/51954 या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता. "अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा. आम्ही तुमच्या राष्ट्राध्यक्षांचं त्यांच्या पत्नीसहित अपहरण केलं आहे. खंडणी मिळेपर्यंत ते आमच्या ताब्यात राहतील.

द होल ट्रूथ!

लेखक भागो यांनी बुधवार, 21/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा पक्या मला रस्त्यात आडवा गेला तेव्हाच मला समजायला पहिजे होत कि आजचा दिवस काही आपला नाही. “चल, काहीतरी पिऊया.” “नकोरे. अगदी आत्ताच चहा पिऊन बाहेर पडलोय.” “मी कुठे म्हणतोय चहा घे म्हणून. काहीतरी थंडा घेऊ या. लस्सी, कोक, लिंबूपाणी किंवा अमृत कोकम. उन बघ काय राणरणतेय. फारा दिवसांनी पकड मध्ये आला आहेस. खूप गप्पा पेंडिंग आहेत.” दिवस मावळतीला आला होता. आता सुटका नव्हती. पक्या जे काय बोलेल ते ऐकायचे. “पक्या, राजकारण सोडून दुसरं काही बोलणार असशील तर येतो.” “माहिती आहे.” अखेर पक्या मला हॉटेलात घेऊन गेलाच.

कोपनहेगन पॅरीस भटकंती- ४

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 20/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनिंगला गेलो. ट्रेनर ने आज खाण्यासाठी सँडविच मागवले होते त्यात काही वेज होते तर काहीत पोर्क होतं. ह्या एकाच कारणामूळे रिझवानने आणी आमच्या बाॅसने वेज सॅंडवीचही खाण्यास नकार दिला. मी आणी विकासने ते वेज सँडविच खाल्ले. रिजवानने एका इराकी दुकानातून चिकन शोरमा आणलं होतं मी त्यातून एक घास खाल्ला, आवडलं.

द्वेष्टे -भाग 2

लेखक नूतन यांनी रविवार, 18/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पाय-या रेघारेघांच्या सुती कापडानी आच्छादलेल्या होत्या. ॲबोजीनने पहिल्या मजल्यावरील उजळलेल्या खिडक्या बघितल्या ,त्याक्षणी त्याचा थरथरता श्वास अगदी स्पष्ट ऐकू येत होता. जर काही अभद्र घडले असेल तर.... तर मी जिवंत राहू शकणार नाहीं...तो स्वताशी म्हणाला.डॉक्टरांना घेऊन तो आत दिवाणखान्यात शिरला .अस्वस्थपणे तो आपले हात चोळत होता. तिथे असलेली शांतता पाहून तो म्हणाला, 'इथे काही गडबड गोंधळ दिसत नाही त्याअर्थी अजूनपर्यंत तरी सारे ठीक दिसते आहे.' दिवाणखान्यात कसलेहीआवाज किंवा कुणाचीही चाहूल नव्हती. प्रकाशाने उजळलेले ते घर गाढ झोपी गेल्यासारखं दिसत होतं.

द्वेष्टे -भाग 1

लेखक नूतन यांनी रविवार, 18/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध रशियन लेखक अंतोन चेखाॅव यांच्या Enemies/एनिमीज कथेचा हा भावानुवाद. ज्यानी वाचली नसेल त्यांच्यासाठी आणि वाचली आहे त्यांच्यासाठीही.कारण त्यांच्या अनुवादाबद्दलच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील ] सप्टेंबर महिन्याच्या त्या काळरात्री सुमारे दहा वाजता, झेम्स्टवो डॉक्टर (जिल्हा प्रशासनाचा डॉक्टर) किरीलोवचा ,एकुलता एक,सहा वर्षांचा लहानगा अँड्री घटसर्पाने मरण पावला. डॉक्टरची पत्नी आपला लाडक्या मुलाच्या खाटे समोर गुडघे टेकून बसली आणि दुःखातिरेकाने तिने टाहो फोडला. इतक्यात दरवाजावरील घंटी कर्कशपणे वाजली.

पाकिस्तान-४

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 17/02/2024 या दिवशी प्रकाशित केले.
. पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत.