न्यु यॉर्क "सफर"!
म्हात्रे काकांनी न्यु यॉर्क सफरीला सुरवात केली आहेच.काकांच्या विमान प्रवासापेक्षा थोsssडासा वेगळा माझा प्रवास होता. आमचीही सफरच, फक्त हा "सफर" वेगळ्या अर्थाने आहे! भावना अगदी ओथंबुन वहात आहेत म्हणुन ही वीट धागा म्हणुन वेगळी काढत आहे. ;)
अर्थातच ही वीट म्हात्रे काकांच्या चरणी अर्पण!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वीट पहिली!
कधी कधी माणसाचं नशिबच जोरात असतं. मागच्या वर्षी माझंही होतं. नवरा अमेरिकेला आल्याने मलाही २ महिने अमेरिका पहायला मिळाली. दोन महिने शुद्ध तुपातली निव्वळ ऐश!!
पण त्याहुनही महत्वाचं म्हणजे नवरा!!! गेले पाच महिने आम्ही भेटलो नव्हतो.
मिसळपाव
