Skip to main content

सल्ला हवा आहे

लेखक _मनश्री_ यांनी सोमवार, 05/09/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती (MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)

जपानी भूतकथा।।।

लेखक क्षमस्व यांनी सोमवार, 05/09/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक मजेशीर जपानी गोष्ट भाषांतरीत करून सांगतो. सहज टाईमपास म्हणून. मुजीना नामक भूतप्रकाराची... आजच्या टोकीयो शहराच्या बाहेर खूप पूर्वी एक जुना किल्ला होता. त्याला लागूनच एक मोठं तळं होतं. हा किल्ला तत्कालीन व्यापाराच्या महत्वाच्या मार्गावर येत असल्याने व तेव्हा रस्त्यावर लाईट्स नसल्याने जेव्हा जेव्हा कुणी या रस्त्याने प्रवास करीत असत ते ते सर्व लोक शक्यतो रात्रीपूर्वीच किल्ल्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत असत.