Skip to main content

पाऊस

लेखक bhavana kale यांनी मंगळवार, 06/09/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल खूप दिवसांनी तुला पावसात चिंब भिजताना पाहिलं.. आणि छत्री मध्ये असूनसुद्धा माझा मन भलतंच शहारलं....... जोरदार वाऱ्याने त्यात अजून कहर करावा छत्रीचे तीन तेरा वाजवून त्याने आपला इरादा स्पष्ट करावा.... समोरचा अथांग सागर जणू पावसाने कुशीत घेतलेला आता नजरेसमोर फक्त तू... आणि नजरेत तुझ्या प्रेमाचा ओलावा... समोरून बेफाम लाटा.. वरून चिंब धारा.. पायाखाली गुदगुल्या करणारी वाळू अन सर्वांगला शहारणारा वारा... पूर्ण निसर्गचं आपल्या साथीला असतांना कॅमेरा क्लिक ची गरजच कशाला... निथळलेला तुझा तो चेहरा माझ्या नजरेत मी कधीच टिपलेला... पापण्यांवर जमलेले थेंब हळुवार गालावरून ओघळत होते.... उगाच केसांना दिले