Skip to main content

'रफाल'

लेखक पराग १२२६३ यांनी शनिवार, 01/10/2016 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे. रफाल डेल्टा विंग बहुपयोगी मध्यम पल्ल्याचे ४++ श्रेणीतील लढाऊ विमान आहे.

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 01/10/2016 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती.

दोन उपास कथा

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 01/10/2016 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकः कोंढवा बोपदेव सासवड मार्गावरील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणातील उपहारगृह. "उपवासाचे काही आहे का?" "बालाजीचे बटाटा वेफर्स आहेत" "एक पाकीट द्या" दोनः पुणे गेस्ट हाऊसमधील रात्रीच्या जेवणाची वेळ. एक वयस्कर जोडपे एका टेबलावर बसलेले. फक्त आजोबा जेवत होते. आजी आजोबांशी बोलत असतानाच आजूबाजूचे निरिक्षण करत होत्या. ते वृद्ध जोडपं हिंदी भाषिक होतं. आजींची नजर भिरभिरत असताना व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या मेनूवर स्थिरावली.

संज्जीं नां

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 01/10/2016 21:32 या दिवशी प्रकाशित केले.

संज्जीं नां

"बाबा संज्जीं नां" "काय?" "संज्जीं नां" "काय ? नीट स्पष्ट बोल , काहीही कळत नाहीये" "संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां" "अगं हा काय म्हणतोय , काही कळत नाहीये " "संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां ...संज्जीं नां ...संज्जीं नां... संज्जीं नां " (आंवं आंवं आंवं SSS ) ______________________________________________________ ऑफिसातुन घरी आलो की कपडे बदलायचे अन टीव्ही समोर येवुन बसायचे. सौ चहा आणुन देई पर्यंत साहेबांकडुन फर्माईशी सुरु होतात अन चहा येई पर्यंत आपला युट्युब जॉकी झालेला असतो... हे आपले रुटीन!

‘चाळ’ आणि मुळाक्षरे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/10/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी तेव्हा इयत्ता सातवीत असेन. मराठी विषय शिकविण्यासाठी आम्हाला रौंदळ आडनावाचे शिक्षक होते. आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ ह्या पुस्तकातील एक धडा समाविष्ट झालेला होता. शिक्षक त्या धड्यातील एकेक उतारा वाचून आमच्या चेहर्‍यावरील प्रतिक्रिया न्याहाळत होते. धड्यातील उतार्‍यात ‘बटाट्याची चाळ’ असा उल्लेख येत होता व त्याला अनुसरून लेखकाचे जे भाष्य होत होते, ते ऐकून आम्ही हसून प्रतिसाद द्यावा अशी शिक्षकाची अपेक्षा होती. तसा प्रतिसाद आमच्याकडून मिळत नव्हता म्हणून शिक्षक वैतागले.

लंडनवारी - भाग २ - छोटालं गाव आणि मोठालं शेत

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 01/10/2016 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
लंडनवारी: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत डिस्क्लेमरः लंडनवारीच्या पूर्वतयारीचा भाग वाचून सहाजिक असं मत होताना दिसलं की हा लाईव्ह ब्लॉग आहे आणि प्रवास होत जाईल तसं त्याचं वर्णन येणार आहे. तसा माझा मानस होता खरं तर. आणि म्हणूनच पूर्वतयारीचा भाग मी लगेच लिहिला. परंतु पुढे प्रवासात लिखाणाला वेळ मिळाला नाही त्यामुळे यापुढील भाग हे मी प्रवासानंतर लिहिलेले असतील.

दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 01/10/2016 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधी- दीपशिखा . इस्टर्न व्हेनिस नावाने प्रसिध्द असलेल्या अलापुडा ह्या केरळमधल्या निसर्गरम्य गावामध्ये, एका रोमन कॅथोलिक कुटुंबात टेसीचा एप्रिल १९६४ मध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळात आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटिज मध्येही ती उत्साहाने भाग घेत असे आणि बक्षिसे, ट्रॉफीज,कप्सही जिंकून आणत असे. उत्तम बॅडमिंटन खेळणार्‍या टेसीला आपण बॅडमिंटन चँपियन व्हावे असेही वाटत असे.

काळरात्र (भाग ४) आयझँक असिमोव्ह

लेखक विचित्रा यांनी शनिवार, 01/10/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
" तुम्ही हे सगळं एवढ्या ठामपणे सांगताय, कि हळूहळू माझाही विश्वास बसायला लागलाय." थरमॉन पुटपुटला. " मी तुझे लेख वाचलेत आणि काही अंशी सहमतसुद्धा आहे." शीरीन म्हणाला. " तसंच तूही आमची बाजू समजून घे." " मग माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या." " जरुर" " इथे नाही." अँटन गुरगुरला."माझ्या निरीक्षकांच्या कामात व्यत्यय नको." ते शेजारच्या कक्षात गेले. सतत भरपूर आणि शुभ्र प्रकाशाची सवय असल्यामुळे दूरवरच्या बीटा तार्याच्या मंद केशरी प्रकाशात उदासवाणं वाटत होतं. शिवाय गारवा वाढला होता. कुडकुडणार्या शीरीनने उत्तेजक पेयाची मागणी केली, पण अँटनने ती नाकारली. तो अजूनही थरमॉनकडे रोखून बघत होता.

किनवा (Quinoa) ढोकळा

लेखक रुपी यांनी शनिवार, 01/10/2016 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
dhokla किनवा (Quinoa) हे प्रथिनांचे उत्तम स्रोत असलेले धान्य आहे. भरपूर प्रमाणात प्रथिने असलेल्या राजगिर्‍याच्याच कुटुंबातल्या या धान्याला आहारात जमेल तेवढ्या जास्त प्रमाणात समाविष्ट करण्याचा आजकाल बर्‍याच जणांचा कल असतो. आकाराने बाजरीच्या आणि रंग ज्वारीच्या दाण्यासारखा असा याचा दाणा असतो.

(रिहॅब चे दिवस भाग ६ )!!

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 01/10/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच लोकांनी विचारलेलं व्यसनाच्या काळात काय झालं . खरं सांगू काही झालं नव्हतं कारण पैसे होते त्यामुळे काही आयडिया करून पैसे मिळवावे कुठेही बसून प्यावी असंही नव्हतं. पित असतानाही काम चालू होतं. प्रामाणिकपणे ते नोकरीला असो कि व्यवसायात . होणाऱ्या बायकोसोबत इथे आलो कि भारतभर फिरत होतो . व्यसन चालू असतानाही. वैयक्तिक मला काही नुकसान झालं नाही रिहॅब चे २ महिने सोडले तर . पण किती वेळा बायको विचारायची वरुण तू ठीक आहे. नीट वागतो. विश्वासही आहे. पण आमच्या मनात त्यावेळी हि फिरताना किती भीती असते माहित आहे का ? निरुत्तर व्हायचो तेव्हा . वेड्यात काढायचो तिला.