Skip to main content

नवीन उपक्रम : गोष्ट तशी छोटी..!

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी शनिवार, 29/10/2016 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
लाखो करोडो प्रजातींमध्ये नखभर उंचीची, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क स ली ही शारीरिक कुवत नसलेली एक जमात जेव्हा आपलं नगण्य अस्तित्व घेऊन आली, तेव्हा खरं म्हणजे इतर प्राणी तुच्छतेने हसले असतील. अनेक कीटकांपैकी एक.. आत्ता आहे उद्या नसेल असा जेमतेम छटाकभर देह कुणाच्या खिजगणतीतही नसेल. पण कुणालाही न लाभलेलं एक वरदान या प्रजातीला लाभलं होतं - कुतूहल!! अनेक दिग्गज या विश्वात आले, तसे एका कुठल्यातरी प्रलयाला बळी पडून विलयालाही गेले. पण ही जमात आल्यापासून या ना त्या रूपात आपलं अस्तित्व केवळ कुतूहलापायी टिकवून आहे. कुतूहलाचं कोलीत हातात मिळालेल्या या प्राण्याला नस्त्या उचापती फार!!

मिपा दशकपूर्ती - उपक्रम सुचवा

लेखक आदूबाळ यांनी शनिवार, 29/10/2016 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाला यंदा दहा वर्षं पूर्ण होतील. दहा वर्षांत पुलाखालून किती पाणी (आणि कमानीखालून किती टेम्पो) गेले हे आपण सगळेच जाणतो. मिपाच्या या दशकपूर्ती वर्षात काही विशेष उपक्रम राबवून हे वर्ष संस्मरणीय व्हावं अशी इच्छा आहे. हे उपक्रम नेमके काय असावेत, त्याचं स्वरूप, व्याप्ती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा संपादकीय विभागातच काढत आहोत. आपणांस विनंती करतो की आपल्या मनात असलेल्या कल्पना या धाग्यावर विस्ताराने लिहाव्यात.

संपादकीय - पुढां स्नेह पाझरे, मागां चालतीचि अक्षरे ...

लेखक आदूबाळ यांनी शनिवार, 29/10/2016 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { border-style: solid transparent; border-width: 40px; -moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ_QkkZoQ_o9PzwExLVAlGe-dE2fX_uVzuswrqSKEL7EiU_FGjKvbI5_YywjhtMPyXoEDIjAmL8DygqFPOzbLmRz3yjFo0M_rVE02EGU6HlmadOPYDQSh_U6bP0E_2KxH-QZVgjuUHzqnFv3PTY2KhH4z2HbHidww414T36KB3hRpXgEwhsPeL2DjjdXJOLcjlMXb3lXlJc43qqUwNIFghXIOBDwuHQ1YCWQrub10Q9pCR_GPQwcGYy4ReFalR3R1w5tvZGI5bWl4eAJd6W5ajb3rHdiwAMaxl8FQjBLLRzPVr3nsU3yOivGytvz9wbClxM3JGDl4FhXJt6FktG1N5WrvzdsZHbiTe6ulf8KZn0NOTCtyTvSe9XqbhJlJ0M1_9ivKjmX7W7CKJ-Xpw0KrbpHVgJt1qQFe5tXVeLAHT_el2q0bDZwN

अनुक्रमणिका

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 29/10/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { border-style: solid transparent; border-width: 40px; -moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/v25latpucl7jnwEng0YhXPWvVS_mnnIoymOoQ_QkkZoQ_o9PzwExLVAlGe-dE2fX_uVzuswrqSKEL7EiU_FGjKvbI5_YywjhtMPyXoEDIjAmL8DygqFPOzbLmRz3yjFo0M_rVE02EGU6HlmadOPYDQSh_U6bP0E_2KxH-QZVgjuUHzqnFv3PTY2KhH4z2HbHidww414T36KB3hRpXgEwhsPeL2DjjdXJOLcjlMXb3lXlJc43qqUwNIFghXIOBDwuHQ1YCWQrub10Q9pCR_GPQwcGYy4ReFalR3R1w5tvZGI5bWl4eAJd6W5ajb3rHdiwAMaxl8FQjBLLRzPVr3nsU3yOivGytvz9wbClxM3JGDl4FhXJt6FktG1N5WrvzdsZHbiTe6ulf8KZn0NOTCtyTvSe9XqbhJlJ0M1_9ivKjmX7W7CKJ-Xpw0KrbpHVgJt1qQFe5tXVeLAHT_el2q0bDZwN

दिवाळी अंक २०१६

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 28/10/2016 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत. आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे. इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती.

प्रवास

लेखक जॉनी यांनी शुक्रवार, 28/10/2016 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
शरीराने तो बसला होता खडकावर... पण मन कुठेतरी भूतकाळात रमलं होतं... "भें**, कुछ नही होता यार एन सी सी एंट्री से. आना है फौज में तो युपीएससी क्लिअर करो और फिर आओ" टाय ची गाठ सोडत आशुतोष बोलला. हि चौथी वेळ होती अलाहाबाद एस एस बी सेंटर मधून त्याला नाकारलं गेल्याची. "तो भाई कर ना क्लिअर युपीएससी, रोका किसने है?" समदुखी सुमित कुमार वैतागून बोलला. "नहीं हो रही यार...वही तो लफडा है ना" "कोई नै यार..देअर इस ओलवेज ए नेक्स्ट टाईम. चल फिर, मिलते है किस्मत में होगा तो" सर्वसाधारण कुटुंबातून लहानाचा मोठा झालेल्या आशुतोष ने मोठंच स्वप्न पाहिलं होतं तसं. वडील कारकून आणि आई गृहिणी.

सर्जिकल ष्ट्राईक आन मोदी गुर्जीची गोष्ट

लेखक वडगावकर यांनी शुक्रवार, 28/10/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या एक दोन आठवड्यापासून 'सर्जिकल स्ट्राईक' ह्या विषयावरून ईतक्या चर्चा,कुचर्चा,विचर्चा चालू आहेत की डोकं अगदी पिकलं .... पवार साहेब म्हणाले,ह्यात काय, सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही बी केलंय की राव...... ह.भ.प. केजरीवाल महाराज दिल्लीकर म्हणाले पुरावे द्या... (खरं म्हणजे केजरीवाल वहिनी तरी त्यांना सीरियस घेत असतील का?,ही शंका आहे ) प.पु....राहुल गांधी तर खून की दलाली वगैरे...

शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 28/10/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो. पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत. सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य. १. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल. २. राहण्याची सोय केल्या जाईल. ३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल. ४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल. ५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल. ६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे.