Skip to main content

निरंक

लेखक ए ए वाघमारे यांनी शनिवार, 29/10/2016 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
निरंक ०१ मोठ्या कष्टाने त्याने पापण्या उघडल्या. खूप दिवसांनंतर. त्याला तरी निदान तसंच वाटलं. आधी नुसतंच झावळ झावळ. मग हळूहळू दिसू लागलं. छत? हो, छ्तच. कुठे आहोत आपण? हे काही आपलं घर नाही. छताच्या प्लास्टरचे असे पोपडे पडलेले. लोखंडी सळ्या अशा गंजत उघड्या पडलेल्या. छे! हे आपलं घर नाही! त्याने मान वळवून पाहण्याचा प्रयत्न केला, तो ती एकदम ओढल्यासारखी झाली. गळ्याभोवती काहीतरी गुंडाळलेलं होतं. मग अचानक नाकात वळवळ झाली. तेसुद्धा जागं झालं. त्याने शिंक आवरायला हात नाकाकडे नेला, तोच तोसुद्धा कशानेतरी ओढला गेला. एकदम मोठा लोखंडी खडखड आवाज झाला. शिंक आलीच नाही.

धाडसी बँक दरोडा

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी शनिवार, 29/10/2016 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
धाडसी बँक दरोडा सात ऑक्टोबर १९२३ची सुस्तावलेली सकाळ. न्यूयॉर्क, ब्रुकलीनमध्ये ८६व्या स्ट्रीटजवळील विसाव्या अ‍ॅव्हन्यूवर असलेल्या वेस्ट एंड बँकेत नेहमीप्रमाणे सुरळीत व्यवहार सुरू होते. पण एका रिकाम्या काउंटरजवळ दोन तरुण हळू आवाजात आपापसात बोलत होते. बँकेत लोक येत होते, जात होते, कुणी पैशांचा भरणा करीत होते, तर कुणी पैसे बँकेतून काढून घेत होते. त्यामुळे या दोन तरुणांकडे कोणाचेही लक्ष असण्याचे कारण नव्हते. तिन्ही कॅशियर पैसे देण्याघेण्यात मग्न होते. कोर्‍या करकरीत नोटांच्या मोजण्याचे आवाज येत होते. त्यामुळेच कुजबुजत बोलणार्‍या ह्या दोन तरुणांकडे कोणाचे लक्षच नव्हते.

दंगल

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शनिवार, 29/10/2016 00:11 या दिवशी प्रकाशित केले.

दंगल
भाग १ (सुरुवात) :-
अ‍ॅन ऑफिसर्स वाईफ.

अस्मिता आळस देत कूस बदलती झाली, तेव्हा राजेश उठला होता. तिच्या झोपी गेलेल्या पण शांत चेहर्‍यावर मिलनाची गोडी विलसत होती, तिचे ते रूपडे डोळ्यात साठवत राजेश उठला अन अलगद पावलांनी बाथरूममध्ये गेला, त्याने स्वतःला न्याहाळले. दाढी अंमळ वाढलीच होती. त्याने हळूच ट्रिमर सुरू केले.

डोळे

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 29/10/2016 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
डोळे अप्रतिम लावण्य लाभलेली आणि सागराच्या निळाईप्रमाणे डोळे असलेली सोनाली लहानपणापासून खूपच हुशार मुलगी होती. तिचे आई-वडील साधे मध्यमवर्गीय पालक होते. मात्र सोनालीची स्वप्नं खूप वेगळी होती. तिच्या आईची इच्छा होती की सोनालीने बी.एड. करावं आणि एखाद्या शाळेत चांगली नोकरी करावी. वडील तिला नेहमी म्हणायचे की मुलींनी बॅँकेत नोकरी केलेली चांगली. मात्र सोनालीने आई-वडिलांच्या मनाविरुद्ध एक खूपच वेगळं करियर निवडलं होतं आणि त्या तिच्या निवडीचं फळ आज तिला मिळालं होतं. सुरुवातीला फारसं समजत नसल्याने, बी.एड. करू अशा विचाराने तिने बी.ए. करायला सुरुवात केली होति.

डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 29/10/2016 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स नमस्कार मंडळी. मी डॉ. वाटमारे. गेली कित्येक वर्षं मी साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये काय मिक्स करतो ह्याचं रहस्य मलाच काय, पण स्वतःला फार मोठा रहस्यसंशोधक, सत्यान्वेषी समजणार्‍या माझ्या मित्राला - म्हणजेच ढेरपोट गोम्सलासुद्धा उलगडलेलं नाही. त्याचं आडनाव तसं गोमासे, परंतु तो स्वतःला शेरलॉक होम्सच्या व्यवसायातला समजतो, म्हणून त्याने गोमासेचं गोम्स असं करून घेतलं. माझ्या मते हा माणूस सत्यान्वेषी नाही, तर सत्यविध्वंसक आहे. या माणसाला एकच सत्य माहीत आहे - 'पैसा' आणि पैसा देणारा जे सांगेल तेच याचं सत्य. एवढे पैसा पैसा करूनही हा माणूस मात्र भिकारडाच आहे.

घरचा हेर

लेखक रातराणी यांनी शनिवार, 29/10/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
घरचा हेर "किसना, किसना हे" तिरिमिरीत चाललेल्या किसनानं आबांची हाक ऐकून मागं वळून पाह्यलं. पण गडी थांबला नाय. धुसफुसत तसाच चालत राह्यला. वेग वाढवून आबांनी किसनला गाठलं. "असं काय करता किसनराव? चला आता घरी. शांत व्हा." "हं! ह्या!" "किसनराव, चला म्हणतो ना. तथं सूनबाईच्या डोळ्यांचं पाणी राहीना किती वाडुळ. आन तुमी आसं ल्हान पोरावानी तरातरा उठून आलाय. आमी म्हातार्‍या माणसांनी आता तुमच्या मागं कुठंवर पळायचं... घ्या जरा शांततेत. संसार म्हणला की भांड्याला भांडं लागायचंच. " "आबा, तुमी म्हणून म्या ह्या घरात थांबलोय. नायतर कवाच निगालू हुतो पंढरीला." "आता कुठं जाताय आणि पंढरीला.

घरचा भेदी

लेखक Jack_Bauer यांनी शनिवार, 29/10/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
घरचा भेदी मुंबईच्या ताज हॉटेलमधील ती डिनर पार्टी चांगली रंगली होती. कारणही तसेच होते. नॅशनल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शामकुमार यांच्या युनिटने उपग्रहातून जमिनीवरील हालचाली अधिक क्षमतेने आकलन करेल असे प्रोटोटाईप यशस्वीरित्या तयार केले होते आणि त्यांना भारत सरकारकडून पुढील कामासाठी फंडिंगसुद्धा मंजूर झाले होते. आज त्यांच्या युनिटचे हे यश साजरे करण्यासाठी सर्व जण जमले होते. शामकुमार यांनी एक छोटेखानी पण छान भाषण केले आणि टीममधील सर्वांचे आभार मानून ते घरी जाण्यासाठी निघाले. शामकुमार हे नॅशनल इन्स्टिट्यूटच्या सिक्युरिटी आणि रिसर्चचे सर्वेसर्वा.

गॅलरी

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 29/10/2016 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
गॅलरी (प्रेरणा - द ओव्हरलूक - मायकेल कॉनेली) (या दीर्घकथेतील तपशिलांसाठी मदत केल्याबद्दल नीलकांत आणि माम्लेदारचा पंखा यांचे मनःपूर्वक आभार!) जेव्हा कॉल आला, तेव्हा बारा वाजून गेलेले होते. मी अर्धवट झोपेत होतो आणि माझ्या जुन्या स्टिरिओ सिस्टिमवर गाणी ऐकत होतो. काही जुनी गाणी, विशेषतः गझल – अंधारातच ऐकायला छान वाटतात. आजूबाजूला शांतता होती आणि तेवढ्यात फोन वाजला. मी भानावर आलो, रिमोटने स्टिरिओ बंद केला आणि फोन उचलला. “राजेंद्र देशमुख?” “येस सर!” “अमित रॉय हिअर!” बापरे! जॉइंट कमिशनर साहेबांचा फोन! काय झालंय? “एक केस आहे. स्थानिक पोलीस स्टेशनकडून सरळ क्राइम ब्रँचकडे आलीय. मर्डर केस आहे.

गारपार्‍यातली गहनकथा

लेखक आदूबाळ यांनी शनिवार, 29/10/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.

("গড়পারের গহনকথা" या अद्याप लिहिल्या न गेलेल्या मूळ बंगाली कथेचा स्वैर अनुवाद)

दुर्गापूजा वीस दिवसांवर आली होती. कोलकात्याच्या हवेत हळूहळू पूजेचा उत्साह भरायला लागला होता. फेलूदा मात्र अस्वस्थ होता. म्हणजे तसं पाहायला गेलं, तर तो एका जुन्या डिक्शनरीत डोकं खुपसून बसला होता. कव्हरवर मळक्या अक्षरांत 'हॉब्सन जॉब्सन' असं लिहिलं होतं. पण दर पाच मिनिटांनी डोकं काढून घराखालच्या रजनी सेन रस्त्याकडे अस्वस्थ नजर टाकत होता. मी मोबाइलवर गेम खेळत होतो, पण माझं पूर्ण लक्ष फेलूदाकडेच होतं. फेलूदाने मला तर्कशुद्ध विचार करायला शिकवलं होतं.

USS Cyclops

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 29/10/2016 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
USS Cyclops अमेरिका खंडाचा पूर्व किनारा आणि युरोप-आफ्रिकेचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान पसरलेला समुद्र म्हणजे अटलांटिक महासागर. विषुववृत्तामुळे या महासागराचे ढोबळपणे उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागर असे दोन भाग पडतात. यापैकी उत्तर अटलांटिकचा दक्षिण-पश्चिमेचा भाग म्हणजे कॅरेबियन समुद्र. या समुद्राचा दक्षिण किनारा म्हणजे ग्वाटेमाला (तुरुंगासाठी कुप्रसिद्ध), होंडुरास, निकाराग्वा, कोस्टारिका आणि पनामा हे देश. पॅसिफिक आणि अटलांटिक यांना जोडणार्‍या पनामा कालव्याचं उत्तरेचं प्रवेशद्वार कॅरेबियन समुद्रातच आहे.