Skip to main content

धनंजय महाराज मोरे -व्यक्ति परिचय

लेखक माहितगार यांनी रविवार, 22/01/2017 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
विकिपीडियाचे नवीन माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत ग्रामीण क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते. असाच एक स्वतः बद्दलचा लेख नवे मराठी विकिपीडियन धनंजय महाराज मोरे यांनी स्वतः बद्दल लिहिला. ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बद्दल स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे. २० जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक कार्यशाळा झाली. (प्रा.डॉ.

स्वरचित महाभारत : भाग शेवटचा

लेखक मिडास यांनी रविवार, 22/01/2017 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा गाव मागे टाकून खूप वेळ झाला होता. चालून चालून त्यांच्या पायात गोळे आले होते. थोडाच वेळ आधी बर्फ पडून गेला होता. हवेतला गारवा वाढंतंच चालला होता. आणि अचानक धीरगंभीर आवाजात कोसळणारा जलप्रपात समोर आला. मंत्र टाकल्यासारखे सगळे एकाच जागी खिळून राहिले. तशी जायला दोन दगडांची वाट होती. पण एखादी उडी मारायला लागली असती. पण त्यांच्या काकडलेल्या शरीराला ती उडी सहन झाली नसती. इथून पुढे जाणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. द्रौपदी तर मटकन खालीच बसली. मग भीमानेच एक बऱ्यापैकी मोठा दगड त्या दोन दगडांवर रचला आणि त्या कामचलावू दगडावरून त्यांनी तो धबधबा पार केला.

विंगेत गलबला - सतीश राजवाडे येत आहेत हो!!!

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 22/01/2017 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
*/

नमस्कार. आपल्या मिपाच्या 'गोष्ट तशी छोटी'साठी सतीश राजवाडे यांची मुलाखत तुम्हा सर्वांपुढे ठेवताना मला खूप आनंद होतो आहे. पंधरा जानेवारीला, म्हणजे गेल्या रविवारीच 'ती सध्या काय करते'च्या टीमची मुलाखत live ऐकण्याचा आणि बघण्याचा योग आला. मी दुसऱ्याच दिवशी सतीशजींना आपल्या मिपा संकेतस्थळाची माहिती दिली आणि या सिनेमाबद्दलचा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचायची विनंती केली.

जाहिरातस्य कथा रम्यः

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 22/01/2017 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
*/

Stories are the creative conversion of life itself into a more powerful, clearer, more meaningful experience. They are the currency of human contact. - Robert McKee असं म्हणतात की रोटी, कपडा, मकान या तीन मूलभूत गरजांसोबत मनुष्यप्राण्याची आणखी चौथी एक मूलभूत गरज आहे, ती म्हणजे गोष्टी सांगणे, गप्पा मारणे. गोष्टी सांगणे, ऐकणे, वाचणे न आवडणारा मनुष्यच नव्हे.

आई

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 21/01/2017 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा ती सोबत असते तिची किम्मत नसते तिच्या instructions.. कामं सांगणे अगदी नको वाटते 'किती ग तेच तेच सांगशील? आता मी मोठी झाले... थोडं थांबशील?' शिकणार आहे ग घरातली कामं थोड मला भटकू तर दे... तुझं ऐकतेच आहे; पण हव तस जगु तर दे... ए मैत्रिणीचा वाढ दिवस आहे गिफ्ट काय देऊ? तू किती ग ओल्ड फॅशन्ड मी थोडा शॉर्ट ड्रेस घेऊ? ए बाबांना पटवशिल? हो म्हणायला सांगशील? रात्रि थोssडा उशीर होईल... तू सांभाळून घेशील? ऐक न... त्याने मला विचारलय चिडवू नकोस ह... पण मला ते आवडलय हो ग बाई...
काव्यरस

तीन सेकंदाचा जीव

लेखक अद्द्या यांनी शनिवार, 21/01/2017 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
बुधवार ची संध्याकाळ हि काही प्यायला बसण्याची वेळ नव्हे . शनिवार रविवार समजू शकतो . पण बुधवार ? एक तर दुसरे दिवशी ऑफिस ला जायचं असतं. त्यामुळे मनसोक्त पिता येत नाही . तीर्थ घेतल्या सारखं सालं एक एक घोट घेऊन गप्प बसावं लागतं . घरी जायला जास्ती वेळ करून उपयोग नाही . किंवा मग काही बाही कारण सांगावं लागतं घरी . म्हणजे . कैच्याकाय कारणं सांगणे हे नवीन नाही माझ्यासाठी . मी कुठे मोठा राजा हरिश्चंद्र लागून गेलोय ! तो पण माणूस मूर्ख होता च्यायला . पण म्हणून .. बुधवार संध्याकाळ ? झालं असं कि कॉलेज ग्रुप मधला एक कार्टा २ वर्षांनी भारतात आला . आणि आला तो आला आठवड्याभरात लग्न ठरवून मोकळा झाला .

किस्सा झाला ना राव!

लेखक नाटक्या यांनी शनिवार, 21/01/2017 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
*/

नमस्कार मंडळी, रंगकर्मी म्हणून रंगमंचावर काम करता असताना बऱ्याच वेळेला काहीतरी गफलत होते आणि त्यामुळे नाट्यगृह हसण्यात बुडून जाते, पण नटांसाठी नामुश्कीची वेळ ओढवते. पुलंच्या भाषेत "प्रेमपत्र कितीही गोड, 'गो'च्या पुढे शंभर नवग्रह काढून लिहिलेलं असलं तरी त्याचं जाहीर वाचन नेहमीच हशा पिकवतं". असेच काही किस्से.... स्वतः अनुभवलेले, पाहिलेले आणि काही दिग्गजांकडून ऐकलेलेदेखील. १.

विंगेत गलबला - निपुण अविनाश धर्माधिकारी काऊच वर येतायेत!!! -

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 21/01/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
*/

पहिल्यांदा पिरा ने जेव्हा निपुणची मुलाखत घ्यायची आहे असं सांगितलं तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं आणि एवढ्या मोठ्या कलाकाराची मुलाखत घेता येईल याचा आनंद होता. टेन्शन याच्यासाठी की या आधी मास कॉम करताना प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या, पण अशी व्हिडिओ मुलाखत घेण्याचा काहीच अनुभव नव्हता. शेवटी मुलाखतीचा दिवस उजाडला, (त्याच्या आधीचे किस्से म्हणजे एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहेत ते परत कधीतरी ).

माय फेअर लेडी

लेखक पिशी अबोली यांनी शनिवार, 21/01/2017 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
*/

तसं पाहायला गेलं, तर दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक. तो राजा, खराखुरा. त्याला खऱ्याखुऱ्या राजाचीच भूमिका पार पाडायची आहे. ती तशी काल्पनिकच. पण तिला काल्पनिक जगात आणखी एक काल्पनिक भूमिका जगायची आहे. पण दोघांचा उल्लेख एकत्र करायचं कारण? त्याला द्यायचा होता एक परफॉर्मन्स. तिलाही द्यायचा होता एक परफॉर्मन्स. हे परफॉर्मन्स दोघांच्या आयुष्यातले अतिशय महत्त्वाचे आहेत हे दिसतंय.